हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना प्रभूच्या सहवासात
सुखाचे व भरभराटीचे जावो .
प्रभूजन्मानंतरचा नववा दिवस
मंगळवार दि. २ जानेवारी २०२४
✝️
संत बेसिल महान व संत ग्रेगरी नाझियांझन यांचा सण
पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र २:२२-२८
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते जर तुम्हांमध्ये राहिले
येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्यासारखा कोण लबाड आहे ? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभला नाही; जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता लाभला आहे. तुमच्याविषयी म्हणावयाचे तर, जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते जर तुम्हांमध्ये राहिले तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. हे जे अभिवचन त्याने स्वत: आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय.
तुम्हाला बहकवणाऱ्या लोकांविषयी हे मी तुम्हाला लिहिले आहे. तुम्हांविषयी म्हणावयाचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हांमध्ये राहतो. तेव्हा तुम्हांला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक जो सत्य आहे, खोटा नाही, तुम्हांला सर्व गोष्टींविषयी जे शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हांला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.
तो प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापासून लाजेने माघार घ्यावी लागू नये म्हणून आता मुलांनो, त्याच्यामध्ये राहा.
Who is a liar, but he who denieth that
Jesus is the Christ? This is Antichrist, who denieth the Father, and the Son. Whosoever
denieth the Son, the same hath not the Father. He that confesseth the Son, hath
the Father also. As for you, let that which you have heard from the
beginning, abide in you. If that abide in you, which you have heard from the
beginning, you also shall abide in the Son, and in the Father. And this is
the promise which he hath promised us, life everlasting. These things have
I written to you, concerning them that seduce you. And as for you, let the
unction, which you have received from him, abide in you. And you have no need
that any man teach you; but as his unction teacheth you of all things, and is
truth, and is no lie. And as it hath taught you, abide in him. And now,
little children, abide in him, that when he shall appear, we may have
confidence, and not be confounded by him at his coming.
प्रतिसाद : पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
१) नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा.
कारण त्याने अलौकिक कृत्ये केली आहेत.
त्याने आपल्या हाताने व पवित्र बाहुबलाने
विजय संपादन केला आहे.
२) प्रभूने आपल्या विजयाची द्वाही फिरवली आहे.
राष्ट्रांसमक्ष आपली न्यायपरायणता प्रकट केली आहे.
इस्राएलच्या घराण्यावरील आपले अढळ प्रेम
व निष्ठा यांची त्याने आठवण ठेवली आहे
३) पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या
देवाचा विजय पाहिला आहे. पृथ्वीवरील सर्व लोकहो,
प्रभूचा जयजयकार करा. जयघोष करून आनंदाने गा.
R. (3cd)
All the ends of the earth have seen the saving power of God.
1 Sing
ye to the Lord anew canticle: because he hath done wonderful things. His right
hand hath wrought for him salvation, and his arm is holy.
R. All
the ends of the earth have seen the saving power of God.
2 The
Lord hath made known his salvation: he hath revealed his justice in the sight
of the Gentiles. He hath remembered his mercy his truth
toward the house of Israel.
R. All
the ends of the earth have seen the saving power of God.
3cd All
the ends of the earth have seen the salvation of our God. Sing joyfully to
God, all the earth; make melody, rejoice and sing.
R. All
the ends of the earth have seen the saving power of God.
शब्द देह झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली,
परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
Alleluia: Hebrews 1: 1-2
R. Alleluia, alleluia.
1-2 In
times, past, God spoke to our ancestors through the prophets: in these last
days, he has spoken to us through his Son.
R. Alleluia, alleluia.
यहुद्यांनी येरुशलेमहून याजक व लेवी ह्यांना योहानला आपण कोण आहा असे विचारायला पाठविले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे. त्याने कबूल केले. नाकारले नाही. मी खिस्त नाही असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, "तर मग आपण कोण आहा? एलिया आहा काय ?" तो म्हणाला, "मी नाही." "आपण तो संदेष्टा आहा काय ?" त्यावर त्याने "नाही" असे उत्तर दिले. ह्यावरून ते त्याला म्हणाले, "ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहा, हे सांगा. स्वत:विषयी आपले काय म्हणणे आहे ?" तो म्हणाला, "यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे." आता पाठवलेली ही माणसे परुश्यांपैकी होती. त्यांनी त्याला विचारले, "आपण ख्रिस्त नाही, एलिया नाही व तो संदेष्टाही नाही, तर बाप्तिस्मा का करता ?" योहानने त्यांना उत्तर दिले, "मी पाण्याने बाप्तिस्मा करतो. ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हांमध्ये उपस्थित आहे. तो माझ्यामागून येणारा आहे. त्याच्या पायतणाचा बंद सोडायला मी योग्य नाही." यार्देनच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे ह्या गोष्टी घडल्या.
And this is the testimony of John, when
the Jews sent from Jerusalem priests and Levites to him, to ask him: Who art
thou? And he confessed, and did not deny: and he confessed: I am not the
Christ. And they asked him: What then? Art thou Elias? And he said: I am
not. Art thou the prophet? And he answered: No. They said therefore unto
him: Who art thou, that we may give an answer to them that sent us? What sayest
thou of thyself? He said: I am the voice of one crying out in the
wilderness, make straight the way of the Lord, as said the prophet Isaias. And
they that were sent, were of the Pharisees. And they asked him, and said
to him: Why then dost thou baptize, if thou be not Christ, nor Elias, nor the
prophet? John answered them, saying: I baptize with water; but there hath
stood one in the midst of you, whom you know not. The same is he that
shall come after me, who is preferred before me: the latchet of whose shoe I am
not worthy to loose. These things were done in Bethania, beyond the
Jordan, where John was baptizing.
✝️

0 टिप्पण्या