Marathi Bible Reading | Ordinary Third Sunday | 21st January 2024

 सामान्यकाळातील तिसरा रविवार  

रविवार दि. २१ जानेवारी  २०२४

(देवशब्द रविवार )

  ✝️ 

"काळाची पूर्णता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा."
The time is accomplished, and the kingdom of God is at hand: repent, and believe the gospel.




आपल्या सर्वना प्रभू येशूने पाचारण करुन देवराज्यात प्रवेश करण्यासाठी  व त्याची सुवार्ता पसरविण्याचे आवाहन केले आहे, पीक खूप आहे, कामगार थोडे आहेत.' प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी प्रभूला आपली गरज आहे. आपण  बुद्धिमान नसतो किंवा आपल्याला जास्त कलागुण नसतील तरी आपण प्रभूचे कार्य आपल्या लहानशा कृतीद्वारे करु शकतो. आपल्या शब्दाद्वारे, कृतीद्वारे व प्रार्थनेद्वारे आपण अनेकांचे जीवन परिवर्तन करु शकतो आणि देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी हातभर लावू शकतो.  

पहिले वाचन :योना  ३:१-५.१

वाचक :  योना या पुस्तकातून घेतलेले वाचन ३:१-५.१०

    परमेश्वराचे वचन योनाला दुसऱ्यांदा प्राप्त झाले ते असे: "ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा आणि मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी करून सांग." तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते, ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत. योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला, "चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल!" तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली; त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोणपाट नेसले.

देवाने त्यांचे वर्तन पाहिले, अर्थात ते आपल्या कुमा्गापासून वळले आहेत हे जाणले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी त्याला अनुताप झाला आणि त्याने त्यांच्यावर ते अरिष्ट आणले नाही.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Jonah 3: 1-5, 10

1 And the word of the Lord came to Jonas the second time, saying:2 Arise, and go to Ninive the great city: and preach in it the preaching that I bid thee.3 And Jonas arose, and went to Ninive, according to the word of the Lord: now Ninive was a great city of three days’ journey.4 And Jonas began to enter into the city one day’s journey: and he cried, and said: Yet forty days, and Ninive shall be destroyed.5 And the men of Ninive believed in God: and they proclaimed a fast, and put on sackcloth from the greatest to the least.10 And God saw their works, that they were turned from their evil way: and God had mercy with regard to the evil which he had said that he would do to them, and he did it not.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र  २४:४-५,६-७,८-९

प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव

१) हे परमेश्वरा, तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सन्मार्गाने मला चालव, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस.

२) हे परमेश्वरा, तू पुरातन काळापासून दाखवलेली आपली करुणा आणि वात्सल्य आठव. हे परमेश्वरा, तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर.

३) परमेश्वरा उत्तम आणि सरळ आहे. तो चुकलेल्यांस सन्मार्ग दाखवतो, तो नम्र जनांस न्यायपथाला लावतो, तो दीनांस आपला मार्ग शिकवतो.

 Psalms Psalms 25: 4-5, 6-7, 8-9

R. (4a) Teach me your ways, O Lord.

4 Let all them be confounded that act unjust things without cause. shew, O Lord, thy ways to me, and teach me thy paths.5 Direct me in thy truth, and teach me; for thou art God my Saviour; and on thee have I waited all the day long.

R. Teach me your ways, O Lord.

6 Remember, O Lord, thy bowels of compassion; and thy mercies that are from the beginning of the world.7 The sins of my youth and my ignorances do not remember. According to thy mercy remember thou me: for thy goodness’ sake, O Lord.

R. Teach me your ways, O Lord.

8 The Lord is sweet and righteous: therefore he will give a law to sinners in the way.9 He will guide the mild in judgment: he will teach the meek his ways.

R. Teach me your ways, O Lord.

 पौल  ७:२९-३१

वाचक : पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, "काळाचा संक्षेप करण्यात आला आहे; की, ज्याला पत्नी आहे त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे. जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे, जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे आणि जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करत नसल्यासारखे असावे. कारण ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading: 

First Corinthians 7: 29-31

29 This therefore I say, brethren; the time is short; it remaineth, that they also who have wives, be as if they had none;30 And they that weep, as though they wept not; and they that rejoice, as if they rejoiced not; and they that buy, as though they possessed not;31 And they that use this world, as if they used it not: for the fashion of this world passeth away.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया!
देवाचे राज्य जवळ आले आहे; सुवार्तेवर विश्वास ठेवा.
  आलेलुया!

Acclamation: 

R. Alleluia, alleluia.

15 The kingdom of God is at hand. Repent and believe in the Gospel.

R. Alleluia, alleluia.


शुभवर्तमान  मार्क  १:१४-२० 

वाचक :  योहानलिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

    योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या सुवार्तेची घोषणा करीत गालिलात आला आणि म्हणाला, "काळाची पूर्णता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा."

नंतर गालील समुद्राजवळ जात असताना त्याला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशु म्हणाला, "माझ्या मागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल असे मी करीन. " मग ते लागलेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले. मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्या मागे गेले.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:Mark 1: 14-20

14 And after that John was delivered up, Jesus came into Galilee, preaching the gospel of the kingdom of God,15 And saying: The time is accomplished, and the kingdom of God is at hand: repent, and believe the gospel.16 And passing by the sea of Galilee, he saw Simon and Andrew his brother, casting nets into the sea (for they were fishermen).17 And Jesus said to them: Come after me, and I will make you to become fishers of men.18 And immediately leaving their nets, they followed him.

 This is the Gospel of the Lord 

Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:आज आपण "देवशब्द रविवार" साजरा करीत आहोत. आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की, प्रभू येशूने जेव्हा देवराज्याची घोषणा केली तेव्हा त्याने दोन गोष्टींवर विशेष भर दिलाः "पश्चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा." आपण सर्वजणपापी आहोत आणि आपण पाप करून परमेश्वराला दुखवल्याने आपणास पश्चात्तापाची आवश्यकता आहे. संपूर्ण जग हे सैतानाच्या अधिपत्याखाली आहे, म्हणून आपणास पापांपासून व सैतानाच्या अंधाराच्या साम्राज्यातून सोडवण्यासाठी दयाळू परमेश्वर कृपा देतो, त्यासाठी आपणास पश्चात्तापाची आवश्यकता आहे. पापांच्या गुलामगिरीतून निघून परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी पश्चात्ताप ही पहिली पायरी आहे. पश्चात्तापाबरोबर प्रभू येशू आपणास शुभवर्तमानावर विश्वास ठेवण्यासाठी देखील पाचारण करतो. परमेश्वराचा शब्द हे तारणाचे शुभवर्तमान आहे. आपणा सर्वांना पाप आणि मृत्यू ह्यांपासून सोडविण्यासाठी परमेश्वर मानव झाला आणि त्याने स्वतःला क्रुसावर अर्पण केले. प्रभू येशूच्या रक्तामध्ये आपणास पापांची क्षमा प्राप्त झाली आहे. ह्या सुवार्तेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि ही सुवार्ता सर्व लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. ह्यासाठीच प्रभू येशूने प्रेषितांची निवड केली आणि त्यांना परमेश्वराचा शब्द घोषित करण्यासाठी पाठवले. सर्व प्रेषितांनी अंतःकरणपूर्वक आपले मिशनकार्य पार पाडले आणि आपणास कित्ता घालून दिला आहे की तारणाची सुवार्ता आपण आपल्या जीवनाद्वारे घोषित करावी. माझ्या पापांसाठी पश्चात्ताप करण्यास आणि परमेश्वराच्या शब्दांवर विश्वास ठेवून तो घोषित करण्यास मी तयार आहे का?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सुवार्तेची साक्ष देण्यास मला प्रेरणा व धैर्य दे, आमेन..

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या