सामान्यकाळातील तिसरा सप्ताह
सोमवार दि २२ जानेवारी २०२४
✝️
परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे.
But he that shall blaspheme against the Holy Ghost, shall never have forgiveness,
✝️
संत विन्सेंट पलोटीच्या उत्साहाची वेंग इतकी मोठी होती की त्यामध्ये जणू संपूर्ण जग, प्रत्येक आध्यात्मिक आणि ऐहिक गरज मावू शकली असती. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी त्यांनी धर्मगुरू / धर्मबंधू / प्रापंचिक इत्यादींसाठी "सोसायटी ऑफ कॅथलिक अपोस्टलेट” (फ्लोटियन्स) आणि मुलींसाठी “सिस्टर्स ऑफ कॅथलिक अपोस्टलेट" ह्या संस्था सुरू केल्या. आज प्रापंचिकांना ख्रिस्तसभेत जो सहभाग दिला जात आहे त्याचाच विचार १०७ वर्षापूर्वी फा. विन्सेंट पलोटी ह्यांनी केलेला होता.
पोप प्रायस अकरावे ह्यांनी त्याला ख्रिस्ती कार्याचा अग्रदूत आणि निष्ठावंत कार्यकर्ता अशा शब्दात गौरविले होते. फा. विन्सेंट ह्यांनी कामगारांची संघटना, कृषिविद्यालय, पतपेढी, अनाथालये, मुलींसाठी वसतिगृहे, अशा प्रकारचे सामाजिक प्रकल्पही राबविले. त्यांचा एक युवा मित्र पुढे पोप लिओ तेरावे ह्यांच्या रुपाने सामाजिक जीवनात अवतरला व त्यांनी “रेरुम नोवारुम” हे परिपत्रक लिहिले. त्यात कामगारांची आध्यात्मिकता व नैतिकता प्रकर्षाने वर्णन केलेली आहे.
वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी विन्सेंट ह्यांना २२ जाने. १८५० रोजी मृत्यू आला. शंभर वर्षानंतर पोप पायस बारावे ह्यांनी त्यांना धन्यवादित ही पदवी बहाल केली आणि मग लवकरच त्याची संतीकरणाची प्रक्रिया १९६३ साली पूर्णत्वास गेली. त्यावेळी दुसरी व्हॅटिकन विश्वपरिषद भरली होती.
✝️
पहिले वाचन २ शमुवेल ५:१-७,१०
वाचक :शमुवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ तूच होशील."
इस्राएलचे सर्व वंश हेब्रोनात दावीदकडे येऊन म्हणाले, पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहो. गतकाली शौल आम्हावर राजा असता इस्राएल लोकांची ने आण करणारे पुढारी आपणच होता आणि परमेश्वर आपणाला म्हणाला होता, "माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ आणि अधिपती तूच होशील." या प्रकारे इस्राएलचे सर्व वडीलजन हेब्रोनात राजाकडे आले आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला आणि त्यांनी दावीदला अभिषेक करून इस्राएलवर राजा नेमले. दावीद राज्य करु लागला तेव्हा तो तीस वर्षाचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले. साडेसात वर्षे त्याने हेब्रोनात यहुदावर राज्य केले आणि तेहतीस वर्षे येरुशलेममध्ये सर्व इस्राएल आणि यहुदा ह्यांच्यावर राज्य केले.
राजाने आपले लोक बरोबर घेऊन येरुशलेम येथे त्या देशाचे रहिवाशी यबूसी यांच्यावर स्वारी केली. ते दावीदला म्हणाले, "तुला येथे येणे साधावयाचे नाही. येथले आंधळेपांगळे तुला हाकलून लावतील." त्यांचा भावार्थ असा होता की, दावीदला येथे येणे साधावयाचे नाही. तरी दावीदने सियोन गड घेतला. हेच ते दावीदपूर. दावीदचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सेनाधीश देव परमेश्वर त्याच्याबरोबर असे.
सर्व : देवाला धन्यवाद.
1 Then
all the tribes of Israel came to David in Hebron, saying: Behold we are thy
bone and thy flesh.2 Moreover yesterday also and the day before, when Saul was
king over us, thou wast he that did lead out and bring in Israel: and the Lord
said to thee: Thou shalt feed my people Israel, and thou shalt be prince over
Israel. The ancients also of Israel came to the king to Hebron, and king
David made a league with them in Hebron before the Lord: and they anointed
David to be king over Israel.4 David
was thirty years old when he began to reign, and he reigned forty years.5 In
Hebron he reigned over Juda seven years and six months: and in Jerusalem he
reigned three and thirty years over all Israel and Juda.6 And
the king and all the men that were with him went to Jerusalem to the Jebusites
the inhabitants of the land: and they said to David: Thou shalt not come in
hither unless thou take away the blind and the lame that say: David shall not
come in hither.7 But
David took the castle of Sion, the same is the city of David.10 And
he went on prospering and growing up, and the Lord God of hosts was with him.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८९:२०-२२,२५-२६
प्रतिसाद : माझी सत्यता आणि माझी दया त्याच्यापाशी राहतील.
१ पूर्वी तू आपल्या भविष्यवादी मित्रांशी
दृष्टान्ताने बोललास : तू म्हणालास,
"एका महारथीवर मी राजछत्र ठेवले आहे.
लोकांतून निवडलेल्या एकाला
मी श्रेष्ठपदास चढवले आहे."
२ “माझा सेवक दावीद मला मिळाला आहे,
मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे.
त्याच्याबरोबर माझा वरदहस्त सदा राहील
आणि माझा बाहू त्याला बलवान करील.”
३ माझी सत्यता आणि माझी दया
त्याच्यापाशी राहतील, माझ्या नावाने
त्याचा उत्कर्ष होईल. मी त्याचा हात
समुद्रापर्यंत आणि त्याचा उजवा
हात नदीपर्यंत पसरवीन.
Psalms 89: 20, 21-22, 25-26
R. (25a)
My faithfulness and my mercy shall be with him.
Then
thou spokest in a vision to thy saints, and saidst: I have laid help upon one
that is mighty, and have exalted one chosen out of my people.
R. My
faithfulness and my mercy shall be with him.
I
have found David my servant: with my holy oil I have anointed him. For
my hand shall help him: and my arm shall strengthen him.
R. My
faithfulness and my mercy shall be with him.
And
my truth and my mercy shall be with him: and in my name shall his horn be
exalted. And
I will set his hand in the sea; and his right hand in the rivers.
R. My faithfulness and my mercy shall be with
him.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे.
तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Our Savior Jesus Christ has
destroyed death and brought life to light through the Gospel..Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क ३:२२-३०
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हा सैतानाचा शेवट होय."
येरुशलेमहून आलेले शास्त्री म्हणत होते, “येशूला बालजबूल लागला आहे आणि तो त्या भुतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने भुते काढतो.” तेव्हा येशू त्यांना आपणाजवळ बोलावून म्हणू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील ? आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वत:वरच उठला आणि त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार, बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही, बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. त्याला मी तुम्हांला नक्की सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची आणि त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे,” असे ते म्हणत होते म्हणून तो हे बोलला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
22 And
the scribes who were come down from Jerusalem, said: He hath Beelzebub, and by
the prince of devils he casteth out devils.23 And
after he had called them together, he said to them in parables: How can Satan
cast out Satan?24 And
if a kingdom be divided against itself, that kingdom cannot stand.25 And
if a house be divided against itself, that house cannot stand.26 And
if Satan be risen up against himself, he is divided, and cannot stand, but hath
an end.27 No
man can enter into the house of a strong man and rob him of his goods, unless
he first bind the strong man, and then shall he plunder his house.28 Amen
I say to you, that all sins shall be forgiven unto the sons of men, and the
blasphemies wherewith they shall blaspheme:29 But
he that shall blaspheme against the Holy Ghost, shall never have forgiveness,
but shall be guilty of an everlasting sin.30 Because
they said: He hath an unclean spirit.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: संपूर्ण जगावर सैतानाचे वाईटाचे साम्राज्य आहे. सैतान हा देवाचा विरोधी आणि त्याचा कट्टर शत्रू आहे, म्हणून तो आपलाही शत्रू आहे. सैतान जगातील प्रत्येक हृदयावर आणि आत्म्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतो. दुष्टतेची भ्रष्ट शक्ती आपणांस आतून नष्ट करते आणि आपणास पाप व सैतानाचे गुलाम बनवते. सैतानाच्या मोहाला बळी पडून त्याच्या वर्चस्वाखाली अडकून पडणे हा आपल्यासाठी सर्वात मोठा धोका आहे, म्हणून सैतानाच्या साम्राज्यापासून आपणास मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ह्या जगामध्ये आला. शास्त्री लोक प्रभू येशूच्या प्रसिद्धीमुळे द्वेष-मत्सराने भरले होते, म्हणून त्याला बालजबूल लागला आहे व तो भुतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने भुते काढतो असा आरोप त्यांनी केला. प्रभू येशूला कधी अशुद्ध आत्मा स्पर्शदेखील करू शकला नाही, आणि प्रभू येशूवर त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे असा आरोप करणे हे पवित्र आत्म्याविरूद्धचे पाप आहे, जे कदापि क्षमा होणार नाही. प्रभू येशू स्पष्ट करतो की आपण कोणाच्या बाजूने आहोत: प्रभू येशूच्या बाजूने की सैतानाच्या बाजूने? प्रभू येशूठायी जीवन आहे, स्वर्ग आहे, पण सैतानाठायी फक्त वाईट, अंधार आणि नरक आहे. मी कोणाच्या बाजूने जाणार ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेवून तुझ्याशी ऐक्य साधण्यास आम्हाला कृपा दे, आमेन,
✝️
0 टिप्पण्या