सामान्यकाळातील तिसरा सप्ताह
मंगळवार दि २३ जानेवारी २०२४
✝️
जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई."
For whosoever shall do the will of God, he is my brother, and my sister, and mother.
✝️
संत इमेरेन्तीयाना
कुमारिका रक्तसाक्षी (३०४)
रोमन रक्तसाक्ष्यांच्या यादीनुसार इमेरेन्तीयाना ही आग्नेस (संत) हिची सावत्र बहीण होती. दोघीही सर्वसाधारणपणे एकाच वयाच्या होत्या. आग्नेस ही पूर्णपणे ख्रिस्ती झालेली होती. तर इमेरेन्तीयाना अजूनही धर्मशिक्षण घेत होती.
संत आग्नेसच्या थडग्याजवळ प्रार्थना करीत असताना तिला दगडमार करण्यात आला. त्यात तिचे शरीर ठेचले गेले आणि शरीरातून निघालेल्या रक्ताने ती न्हाऊन निघाली. त्यातून तिला रक्ताचा बाप्तिस्मा मिळाला. संत आग्नेसच्या महामंदिराशेजारीच तिला पुरण्यात आले. नंतर तिचे अवशेष महामंदिरात आणण्यात आले.
✝️
पहिले वाचन २ शमुवेल ६:१२ब-१५.१७-१९
वाचक :शमुवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"दावीदने आणि इस्त्राएलच्या सर्व लोकांनी परमेश्वराचा कोश मोठ्या आनंदाने आणला."
दावीदने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला. परमेश्वराचा कोश उचलणारे सहा पावले चालून गेले तेव्हा दावीदने एक बैल आणि एक पुष्ट गोहा ह्यांचा यज्ञ केला. दावीद सणाचे एफोद कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करीत चालला. दावीदने आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कोश जयजयकार करीत आणि शिंगे फुंकीत वर आणला.
लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले आणि त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दावीदने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेवला; तेव्हा दावीदने परमेश्वराला होमबली आणि शांतिदानार्पणे अर्पिली. होमबली आणि शांतिदानार्पणे केल्यावर दावीदने सेनाधीश परमेश्वर याच्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला. मग त्याने सर्व प्रजेस म्हणजे इस्राएलच्या समुदायातील प्रत्येक स्त्रीपुरुषास एकएक भाकर, मांसाचा एकएक तुकडा, खिसमिसाची एकएक ढेप अशी वाटून दिली. मग सर्व लोक आपआपल्या घरी गेले.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
12b David went, and brought
away the ark of God out of the house of Obededom into the city of David with
joy. And there were with David seven choirs, and calves for victims.
13 And when they that carried the ark of the Lord had gone
six paces, he sacrificed an ox and a ram:
14 And David danced with
all his might before the Lord: and David was girded with a linen ephod.
15 And David and all the
house of Israel brought the ark of the covenant of the Lord with joyful
shouting, and with sound of trumpet.
17 And they brought the ark
of the Lord, and set it in its place in the midst of the tabernacle, which
David had pitched for it: and David offered holocausts, and peace offerings
before the Lord.
18 And when he had made an
end of offering holocausts and peace offerings, he blessed the people in the
name of the Lord of hosts.
19 And he distributed to
all the multitude of Israel both men and women, to every one, a cake of bread,
and a piece of roasted beef, and fine flour fried with oil: and all the people
departed every one to his house.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र २४:७,८,९,१०
प्रतिसाद : हा प्रतापशाली राजा कोण ? हा, परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा होय.
१ अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा; पुरातन दारांनो, उंच व्हा.
प्रतापशाली राजाला आत येऊ द्या!
२हा प्रतापशाली राजा कोण ?
बलवान आणि पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच.
३अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा;
पुरातन दारांनो, उंच व्हा. प्रतापशाली राजाला आत येऊ द्या !
४ हा प्रतापशाली राजा कोण ?
हा सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा होय.
R. (8) Who is this king of
glory? It is the Lord!
7 Lift up your gates, O ye
princes, and be ye lifted up, O eternal gates: and the King of Glory shall
enter in.
R. Who is this king of
glory? It is the Lord!
8 Who is this King of
Glory? the Lord who is strong and mighty: the Lord mighty in battle.
R. Who is this king of
glory? It is the Lord!
9 Lift up your gates, O ye princes, and be ye lifted up, O
eternal gates: and the King of Glory shall enter in.
R. Who is this king of
glory? It is the Lord!
10 Who is this King of
Glory? the Lord of hosts, he is the King of Glory.
R. Who is this king of
glory? It is the Lord!
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Blessed are you, Father, Lord of heaven and earth;
you have
revealed to little ones the mysteries of the Kingdom.
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क ३:३१-३५
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई आहे."
येशूची आई आणि त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्याच्याभोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, "पाहा, बाहेर आपली आई आणि आपले भाऊ आपले शोध करीत आहेत." त्याने त्यांना उत्तर दिले "कोण माझी आई आणि माझे भाऊ ?" मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, "पाहा, ही माझी आई आणि हे माझे भाऊ ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
31 And his mother and his
brethren came; and standing without, sent unto him, calling him.
32 And the multitude sat
about him; and they say to him: Behold thy mother and thy brethren without seek
for thee.
33 And answering them, he
said: Who is my mother and my brethren?
34 And looking round about
on them who sat about him, he saith: Behold my mother and my brethren.
35 For whosoever shall do
the will of God, he is my brother, and my sister, and mother.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आणि त्याच्याठायी जमलेल्या लोकांना सत्य शिकवण्याची एकही संधी सोडली नाही. जेव्हा प्रभू येशूची आई आणि नातलग त्याला भेटण्यासाठी येतात, तेव्हा प्रभू येशू सांगतो कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? येथे प्रभू येशू नातेसंबंधांच्या आणखी एका उच्च वास्तवाकडे आपले लक्ष वेधतो, ते म्हणजे परमेश्वराबरोबर आणि त्याच्या लोकांबरोबर असलेले आपले नाते: “जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई." प्रभू येशू येथे दाखवून देतो की, नातेसंबंध हे केवळ मांस आणि रक्त ह्यांच्याशीस संबंधित नाही, तर ते परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याची इच्छा पाळण्याशी संबंधित आहेत. परमेश्वराने आपणास त्याची मुले म्हणून दत्तक घेतल्याने आपले सर्व नातेसंबंध बदलले आहेत. प्रभू येशू आपणास शिकवतो की परमेश्वर आपला पिता आहे आणि आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहून आध्यात्मिकतेत वाढण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या