सामान्यकाळातील दुसरा सप्ताह
मंगळवार दि -१६ जानेवारी २०२४
✝️
The sabbath was made for man, and not man for the sabbath. Therefore the Son of man is Lord of the sabbath also.
आशिया खंडामधून जेवढे महान मिशनरी तयार झाले त्याच्यात धन्यवादित जोसेफ वाझ ह्यांचा फार वरचा क्रमांक लागेल. इ. स. १६५१ साली गोव्यातील बेनोली येथे त्यांचा जन्म झाला. १६७६ साली वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांना धगुरूपदाची दीक्षा देण्यात आली. १७११ साली श्रीलंकेतील कॅन्टी शहरात त्यांना मृत्यू आला.
आपल्या आयुष्याची ३६ मौल्यवान वर्षे धर्मगुरू म्हणून त्यांनी गोवा, कॅनरा आणि श्रीलंका ह्या ठिकाणी ईश्वरी सेवेत व्यतीत केली. समर्पित वृत्तीचा मिशनरी आणि कुशल प्रशासक म्हणून ते नावारुपाला आले. कॅनरा येथील ख्रिस्तसभेमध्ये प्रशासनावरून पाद्रो आदो-प्रोपोगांडा असा वाद निर्माण झाला. तेव्हा फा. जोसेफ ह्यांनी मोलाची कामगिरी बजावली आणि तो वाद मिटविला.
भारतीय मिशनऱ्यांमध्ये ऐक्य आणि त्यांच्या कार्यात एकवाक्यता असावी म्हणून त्यांनी जुन्या गोव्यामध्ये मिलाग्रीस क्रुसाच्या नावाने एक प्रशिक्षण केंद्र उभारले. श्रीलंकेतील आपले मिशनकार्य सदैव चालूच रहावे याकरिता त्यांनी ह्या केंद्रात अनेक मिशनरी घडविले. हे मिशनरी श्रीलंकेव्यतिरिक्त इतर अनेक भागात सुवार्ता प्रसार करीत असत. मात्र श्रीलंकेतील श्रद्धेची ज्योत नेहमी प्रज्वलित ठेवण्यासाठी ते आपल्या परिश्रमाचे तेल त्यात नेहमी ओतून ठेवीत.
जोसेफ वाझ ह्यांचे पवित्र जीवन, अथक परिश्रम, समर्पित आणि उत्साही वृत्ती, आशावादी दृष्टीकोन, धैर्य इ. सद्गुणांमुळे श्रीलंकेतील ख्रिस्तसभेत एक आगळेवेगळे चैतन्य संचारले.
फा. वाझ ह्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गोव्याच्या आपल्या मातृभूमीत ब्रद्धेचे बीज पेरताना संस्कृतीला अजिबात धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेतली. त्याकाळी अस्तित्वात असलेली पोर्तुगीजांची राजवट आणि त्यांच्यातर्फे आलेले पाश्चात्य ख्रिस्ती धर्माचे संस्कार ह्यांचा फारसा प्रभाव गोव्यातील नवख्रिस्तीयांवर पडू शकला नाही. कारण फा. वाझ ह्यांची कार्यप्रणाली चाणाक्ष आणि तितकीच कणखर होती.
'यथा राजा तथा प्रजा' या उक्तीनुसार “ज्यांचे राज्य त्यांचा धर्म” लोकांनी पाळावा ही त्याकाळी एक प्रथाच बनून गेलेली होती. परंतु फा. जोसेफ वाझ आणि त्यांचे सहकारी धर्मगुरू ह्यांनी ही प्रथा खंबीरपणे मोडीत काढली आणि आपल्या स्थानिक संस्कृतीशी व मातीशी इमान राखणारा ख्रिस्ती धर्म त्यांच्याच मातृभाषेत लोकांना शिकविण्यास सुरुवात केली. हे करीत असताना त्यांनी वसाहतवाद्याशी कुठलेही संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे गोव्यातील ख्रिस्ती धर्मतत्वे अबाधित राखण्यात त्यांना यश आले.
इ. स. १७११ साली मृत्यू पावलेल्या फा. जोसेफ वाझ ह्यांना पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी २१ जाने. १९९५ रोजी धन्यवादित म्हणून आल्ताराचा बहुमान दिला.१४ जानेवारी २०१५ रोजी पोप फ्रान्सिस यांनी त्यांना संत पद घोषित केले
✝️
पहिले वाचन १ शमुवेल १६:१-१३
वाचक :शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“शमुवेलने त्याच्या भावांमध्ये दावीदला अभिषेक केला आणि परमेश्वराचा आत्मा त्याच्या ठायी जोराने संचरू लागला. "
परमेश्वराने शमुवेलला म्हटले, "मी शौलला इस्राएलच्या राज्यपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार ? शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहेमकर याच्याकडे पाठवतो. कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे." शमुवेल म्हणाला, "मी जाऊ कसा? शौलने हे ऐकले तर तो मला जिवे मारील." तेव्हा परमेश्वर म्हणाला, "तू आपल्याबरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग, 'मी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे.' मग यज्ञास येण्याचे इशायला आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करावयाचे ते मी सांगेन; मी तुला सांगेन त्याला तू माझ्यासाठी अभिषेक कर." परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमुवेलने केले आणि तो बेथलेहेमला गेला. तेव्हा या नगरातले वडीलजन थरथर कापत त्याला भेटायला आले आणि त्यांनी त्यांना विचारले, "आपण स्नेहभावाने आला आहा काय ? तो म्हणाला, "मी स्नेहभावाने आलो आहे. मी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझ्याबरोबर यज्ञास या." त्याने इशाय आणि त्याचे पुत्र यांना पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले.
ते आले तेव्हा त्याने अलियाबला न्याहाळून पाहून म्हटले, “परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय." पण परमेश्वराने शमुवेलला म्हटले, "तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापंसत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो." मग इशायने अवीनादावला बोलावून शमुवेल पुढून चालवले. पण शमुवेल म्हणाला, "परमेश्वराला हाही पसंत नाही." मग इशायने शम्मा यास त्याच्यापुढून चालवले. पण शमुवेल म्हणाला, "परमेश्वराला हाही पसंत नाही." या प्रकारे इशायने आपले सात पुत्र शमुवेलपुडून चालवले. शमुवेलने इशायला म्हटले, "यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही." शमुवेलने इशायला विचारले, "तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय?" तो म्हणाला, “एक सर्वात धाकटा राहिला आहे; तो शेरडेमेंढरे राखीत आहे." तेव्हा शमुवेल इशायला म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनाला बसणार नाही." त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुदंर आणि स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, "ऊठ, त्याला अभिषेक कर; हाच तो आहे." मग शमुवेलने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये दावीदला अभिषेक केला • आणि त्या दिवसांपासून पुढे परमेश्वराचा आत्मा दावीदच्या •ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.
हा प्रभूचा शब्द आहे
And the Lord said to Samuel: How long wilt thou mourn for
Saul, whom I have rejected from reigning over Israel? fill thy horn with oil,
and come, that I may send thee to Isai the Bethlehemite: for I have provided me
a king among his sons. And Samuel said: How shall I go? for Saul will hear
of it, and he will kill me. And the Lord said: Thou shalt take with thee a calf
of the herd, and thou shalt say: I am come to sacrifice to the Lord. And
thou shalt call Isai to the sacrifice, and I will shew thee what thou art to
do, and thou shalt anoint him whom I shall shew to thee. Then Samuel did
as the Lord had said to him. And he came to Bethlehem, and the ancients of the
city wondered, and meeting him, they said: Is thy coming hither peaceable? And
he said: It is peaceable: I am come to offer sacrifice to the Lord, be ye
sanctified, and come with me to the sacrifice. And he sanctified Isai and his
sons, and called them to the sacrifice. And when they were come in, he saw
Eliab, and said: Is the Lord’s anointed before him? And the Lord said to
Samuel: Look not on his countenance, nor on the height of his stature: because
I have rejected him, nor do I judge according to the look of man: for man seeth
those things that appear, but the Lord beholdeth the heart. And Isai
called Abinadab, and brought him before Samuel. And he said: Neither hath the
Lord chosen this. And Isai brought Samma, and he said of him: Neither hath
the Lord chosen this. Isai therefore brought his seven sons before Samuel:
and Samuel said to Isai: The Lord hath not chosen any one of these. And
Samuel said to Isai: Are here all thy sons? He answered: There remaineth yet a
young one, who keepeth the sheep. And Samuel said to Isai: Send, and fetch him,
for we will not sit down till he come hither. He sent therefore and
brought him Now he was ruddy and beautiful to behold, and of a comely face. And
the Lord said: Arise, and anoint him, for this is he. Then Samuel took the
horn of oil, and anointed him in the midst of his brethren: and the spirit of
the Lord came upon David from that day forward: and Samuel rose up, and went to
Ramatha.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८९:२०-२२,२७-२८
प्रतिसाद : माझा सेवक दावीद मला मिळाला आहे.
१) पूर्वी तू आपल्या भक्तांशी दृष्टान्ताने बोललास.
तू म्हणालास: “मी एका वीराकडे सहाय्य करण्याचे सोपवले आहे.
लोकांतून निवडलेल्या एकाला मी श्रेष्ठ पदास चढवले आहे.
२) "माझा सेवक दावीद मला मिळाला आहे,
मी आपल्या पवित्र तेलाने त्याला अभिषेक केला आहे.
त्याच्यावर माझा वरदहस्त सदैव राहील
आणि माझ्या हाताने मी त्याला समर्थ करीन.
३) "तो मला म्हणेल, 'तू माझा पिता, माझा देव,
माझा तारणकर्ता दुर्ग आहेस'
मी तर त्याला ज्येष्ठ करीन,
पृथ्वीवरील राजात त्याला सर्वश्रेष्ठ करीन."
: Psalms 89: 20, 21-22, 27-28
R. (21a) I have found David, my servant.
20 Then thou spokest in a vision to thy saints, and saidst: I
have laid help upon one that is mighty, and have exalted one chosen out of my
people.
R. I have found David, my servant.
I have found David my servant: with my holy oil I have
anointed him. For my hand shall help him: and my arm shall strengthen
him.
R. I have found David, my servant.
He shall cry out to me: Thou art my father: my God, and
the support of my salvation. And I will make him my firstborn, high above the kings of
the earth.
R. I have found David, my servant.
आलेलुया, आलेलुया!
हे येरुशलेमे, प्रभूचे गुणगान गा, तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
May the Father of our Lord Jesus Christ enlighten the eyes of
our hearts, that we may know what is the hope that belongs to our call.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क २:२३-२८
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“शब्बाथ मनुष्यासाठी केलेला आहे, मनुष्य शब्बाथसाठी केलेला नाही."
येशू एके शब्बाथ दिवशी शेतांमधून जात असताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले. तेव्हा परुशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी करू नये ते हे का करतात ?” तो त्यांना म्हणाला, “दावीदला गरज पडली, म्हणजे त्याला आणि त्याच्याबरोबर असलेल्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले ? अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या समर्पित भाकऱ्या त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्याबरोबर असलेल्यांनाही कशा खावयास दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय?" आणखी तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ मनुष्यासाठी केलेला आहे, मनुष्य शब्बाथसाठी केलेला नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथचाही प्रभू आहे.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
23 And it came to pass again, as the Lord walked through the
corn fields on the sabbath, that his disciples began to go forward, and to
pluck the ears of corn. And the Pharisees said to him: Behold, why do they
on the sabbath day that which is not lawful? And he said to them: Have you
never read what David did when he had need, and was hungry himself, and they
that were with him? How he went into the house of God, under Abiathar the
high priest, and did eat the loaves of proposition, which was not lawful to eat
but for the priests, and gave to them who were with him? And he said to
them: The sabbath was made for man, and not man for the sabbath. Therefore
the Son of man is Lord of the sabbath also.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:यहुदी लोकांसाठी "शब्बाथ" हा दिवस फार महत्त्वाचा होता, कारण परमेश्वराने त्यांना शब्बाध पवित्र पाळण्याची आज्ञा दिली होती. पण काळाच्या ओघामध्ये शब्बाथाचे खरे महत्त्व डावलून यहुदी अधिकाऱ्यांनी “शब्बाथ विश्रांती" यहुदी समाजामध्ये सक्तीची केली आणि हा विषय एकदम गुंतागुंतीचा बनला. शब्बाथचा दिवस हा परमेश्वराच्या चांगुलपणाचा आणि त्याच्या पवित्र कार्याचे स्मरण करून त्याची भक्ती करण्याचा, परमेश्वराचे आभार स्तवन करण्यासाठी राखून ठेवलेला दिवस होता. त्याचबरोबर दैनंदिन कामे थांबावीत, आवश्यक विश्रांती मिळावी, विशेषकरून जनावरे आणि गुलाम ह्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांनाही विश्रांती मिळावी हा शब्बाथ मागचा हेतू होता. पण शास्त्री आणि परूशी लोकांना शब्बाथचा खरा अर्थ कळलाच नव्हता, म्हणून ते शब्बाथवरून लोकांची अवहेलना करीत होते. प्रभू येशू पवित्रशास्त्रातील एक युक्तीवाद त्यांच्यासमोर मांडतो आणि नियमांपेक्षा मानवी गरजेला खरे प्राधान्य आहे हे स्पष्ट करतो. पवित्र मंदिरात अर्पण केलेली भाकर, फक्त याजकांनीच खावी हा नियम होता, पण दावीद व त्याचे सहकारी ही भाकर खातात, कारण ते भुकेले होते. प्रभू येशू येथे मानवी गरजेची आठवण करून देताना सांगतो की, शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे; मनुष्य शब्बाथसाठी झालेला नाही. शब्बाथ चांगल्यासाठी होता वाईटासाठी नाही. शब्बाथ दिवशी परमेश्वराचे गौरव व्हावे, लोकांचे चांगले व्हावे, त्यांच्या हातून दयाकृत्ये व्हावीत म्हणून शब्बाथ होता. प्रभू येशू स्वतः शब्बाथचा प्रभू आहे, म्हणून त्याने शब्बाथ दिवसाला एक वेगळा अर्थ प्राप्त करून दिला.
प्रार्थना : प्रभो परमेश्वरा, तूच सर्व सृष्टीचा, माणसांचा आणि नियमांचा निर्माणकर्ता आहेस. तुझ्या योजनेप्रमाणे आमचे जीवन संवर्धन कर, आमेन. अनुभवण्यास व तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन
0 टिप्पण्या