First Reading :
2 Cronicles 36:14-16,19-23
In those days: All the officers of the priests and the people were exceedingly unfaithful, following all the likewise abomination of the nations. And they polluted the house of the LORD that he had made holy in Jerusalem. The LORD, the God of their fathers, sent persistently to them by his messengers, because he had compassion on his people and on his dwelling place. But they kept mocking the messengers of God, despising his words and scoffing at his prophets, until the wrath of the LORD rose against his people, until there was no remedy. And they burned the house of God and broke down the wall of Jerusalem and burned all its palaces with fire and destroyed all its precious vessels. The king of the Chaldeans took into exile in Babylon those who had escaped from the sword, and they became servants to him and to his sons until the establishment of the kingdom of Persia, to fulfill the word of the LORD by the mouth of Jeremiah, until the land had enjoyed its Sabbaths. All the days that it lay desolate it kept Sabbath, to fulfill seventy years. Now in the first year of Cyrus king of Persia, that the word of the LORD by the mouth of Jeremiah might be fulfilled, the LORD stirred up the spirit of Cyrus king of Persia, so that he made a proclamation throughout all his kingdom and also put it in writing: "Thus says Cyrus king of Persia, 'The LORD, the God of heaven, has given me all the kingdoms of the earth, and he has charged me to build him a house at Jerusalem, which is in Judah. Whoever is among you of all his people, may the LORD his God be with him. Let him go up."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १३७:१-६
प्रतिसाद : जर मी तुझी आठवण ठेवली नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो !
१. बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो.
हो, तेथे आम्हांला सियोनची आठवण झाली,
तेव्हा आम्ही रडलो. तेथील वाळुजांवर
आम्ही आपल्या वीणा टांगून ठेवल्या.
२. कारण तेथे आमचा पाडाव करणाऱ्यांनी
आम्हांला गाणी गायला सांगितले.
आमचा छळ करणाऱ्यांनी आम्हांला
मौज करायला सांगितले. ते म्हणाले,
आम्हांला सियोनचे एखादे गाणे गाऊन दाखवा.
३. आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे?
हे येरुशलेम, जर आम्ही तुला विसरलो
तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो!
४. जर मी तुझी आठवण ठेवली नाही,
जर मी येरुशलेमला माझ्या सर्व
आनंदाहून अधिक मानले नाही,
तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो !
Psalm 137:1-2, 3, 4-5, 6 ( 6ab)
O let my tongue cleave to my palate if I remember you not.
By the rivers of Babylon
there we sat and wept,
remembering Sion;
on the poplars that grew there
we hung up our harps. R
For it was there that they asked us,
our captors, for songs,
our oppressors, for joy.
"Sing to us," they said,
"one of Sion's songs."
O how could we sing
the song of the Lord on foreign soil?
If I forget you, Jerusalem,
let my right hand wither! R
O let my tongue
cleave to my palate
if I remember you not,
if I prize not Jerusalem
as the first of my joys!
दुसरे वाचन :इफिस २:४-१०
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
बंधूजनांनो, देव दयासंपन्न आहे म्हणून आम्ही आमच्या अपराधांमुळे, मरण पावलेले असताही त्याने आम्हांवरील स्वत:च्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आम्हांला जिवंत केले (कृपेने तुमचे तारण झालेले आहे) आणि ख्रिस्त येशूच्याठायी त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात बसवले. यासाठी ख्रिस्त येशूच्याठायी आम्हा सर्वांवरील त्याच्या ममतेच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याच्या कारागिरीची वस्तू आहो. ती सत्कृत्ये आचरीत आम्ही आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.
Second Reading:
Ephesians 2:4-10
Brethren: God, being rich in mercy, because of the great love with which he loved us, even when we were dead in our trespasses, made us alive together with Christ-by grace you have been saved-and raised us up with him and seated might show the immeasurable riches of his grace in kindness towcoming ages he Jesus. For by grace you have been saved through faith. And this is not your Christ it is the gift God, not a result of works, so that no one may boast. For we doing: are his workmanship, created in Christ Jesus for good works, which God prepared beforehand, that we should walk in them.
जयघोष
देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
Acclamation: .
God so loved the world that he gave his only begotten Son, that whoever believes in him should not perish but have eternal life.
शुभवर्तमान योहान ३:१४-२१
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू निकोदमला म्हणाला, "जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होत, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. ह्यासाठी जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."
देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे. तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो; ह्यासाठी आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
0 टिप्पण्या