उपवासकाळातील तिसरा सप्ताह
शनिवार दि.९ मार्च २०२४
✝️
कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल."
For everyone who exalts himself will be humbled, but the one who humbles himself will be exalted."
रोमची संत फ्रान्सेस
विधवा (१३८४-१४४०)
संत फ्रान्सेस म्हणत असे, "विवाहित स्त्रीने, आपण प्रथम एक गृहिणी आहोत ह्याचे विस्मरण कधीही होऊ देऊ नये. आपल्या कौटुंबिक कर्तव्यात देवाचा शोध घेता यावा म्हणून प्रसंगी आपले प्रार्थनामय जीवन वेदीपाशीच ठेवून प्रथम आपल्या घरातील कर्तव्ये निष्ठेने पार पाडली पाहिजेत."
दुसऱ्यांच्या अंतर्यामातील विचार ओळखणे, सैतानाचे डावपेच समजून घेणे, साक्षात्कार, दृष्टांत, आरोग्यदान आणि संदेश देणे इ. दाने फ्रान्सेस हिला लाभलेली होती. तब्बल २३ वर्षे देवाने तिला आपल्या रक्षक दुताचा शारीरिक दृष्टांत दिला.
आज होशेय संदेष्टा इस्त्राएली जनतेला त्यांच्या पश्चातपाचा खोटेपणा उघड करुन सांगत आहे. की क्षणिक भक्ती आणि अपूर्ण श्रद्धा ह्यांमुळे देव प्रसन्न होत नाही. परमेश्वर यज्ञाचा नाही तर दयेचा भूकेला आहे,
प्रभू येशू आपल्याला खरा श्रद्धावान, निष्ठावान आणि नीतिमान माणूस परमेश्वरासमोर कसा नम्र व लीन बनतो ह्याचे स्पष्टीकरण देत आहे. परमेश्वराला मोठमोठे यज्ञ व व्यर्थ प्रार्थना नको तर पश्चात्तापी अंत:करण हवे असते. कारण तो दयेचा, क्षमेचा प्रेमाचा व शांतीचा दाता आहे.
प्रभू येशू स्वत: नम्र बनला व आपल्या सर्वांसाठी त्याने दुःखसहन व मरण स्वीकारले. प्रभू येशू स्वत: म्हणत आहे, 'मी नम्र व लीन ! हृदयाचा आहे. ' आपण आपल्यातील अहंकार, स्वार्थ आणि मीपणा दूर सारुन प्रभू येशूला शरण जाऊ या. पश्चात्तापी अंत:करणाने प्रभूकडे दयेची व क्षमेची याचना करू या.
✝️
पहिले वाचन :होशेय ६:१-६
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे." प्रभू असे म्हणतो, "ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील, चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ. कारण त्याने आम्हांला झोडले आहे व तोच आम्हांला बरे करील. त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो दोन दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील; तिसऱ्या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. चला, आपण परमेश्वराला ओळखू. परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यासाठी झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाच्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल."
हे एफ्राइम, मी तुझ्यासाठी काय करू ! हे यहुदा, मी तुला काय देऊ? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उठून जाणाऱ्या दंहिवराप्रमाणे आहे. म्हणून मी त्याच्यावर संदेष्ट्यांच्या हातून कुऱ्ह्याड चालवली आहे. माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे. माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Hosea 6:1-6
"Come, let us return to the LORD: for he has torn us, that he may heal us; he has struck us down, and he will bind us up. After two days he will revive us; on the third day he will raise us up, that we may live before him. Let us know; let us press on to know the LORD; his going out is sure as the dawn; he will come to us as the showers, as the spring rains that water the earth." What shall I do with you, O Ephraim? What shall I do with you, O Judah? Your love is like a morning cloud, like the dew that goes early away. Therefore I have hewn them by the prophets; I have slain them by the words of my mouth, and my judgment goes forth as the light. For I desire steadfast love and not sacrifice, the knowledge of God rather than burnt offerings.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ५१:३-४,१८-२१
प्रतिसाद : मला यज्ञ नको तर प्रेम हवे.
१) देवा, तुझ्या प्रेमाखातर माझ्यावर दया कर
तुझ्या महान दयेस अनुसरून
माझ्या अपराधांचे कलंक पुसून टाक.
मला धुऊन माझा दोष पूर्णपणे दूर कर.
माझ्या पापापासून मला शुद्ध कर.
२) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस,
नाही तर तो मी केला असता.
होमार्पणांची देखील तुला आवड नाही.
देवा, तुला शरण आलेला हा आत्मा हाच माझा यज्ञ.
भग्न व पश्चात्तापी अंत:करण तू झिडकारणार नाहीस.
३) तू प्रसन्न होऊन सियोन नगरावर कृपादृष्टी कर.
येरुशलेमची तटबंदी उभार.
मग यथायोग्य यज्ञ व विविध होमार्पणे यांनी
तू प्रसन्न होशील.
तुझ्या वेदीवर गोहे बळी दिले जातील.
Psalm 51:3-4, 18-19, 20-21ab (R Hosea 6:6)
I desire steadfast love, and not sacrifice.
Have mercy on me, O God,
according to your merciful love;
according to your great compassion,
blot out my transgressions.
Wash me completely from my iniquity,
and cleanse me from my sin. R
For in sacrifice you take no delight;
burnt offering from me
would not please you.
My sacrifice to God, a broken spirit:
a broken and humbled heart,
O God, you will not spurn. R
In your good pleasure, show favour to Sion;
rebuild the walls of Jerusalem.
Then you will delight in right sacrifice,
burnt offerings wholly consumed. R
जयघोष
आज तुम्ही आपली मने कठीण करू नका. तर प्रभूचे म्हणणे ऐका!
Acclamation:
O that today you would listen to his voice! Harden not your hearts.
शुभवर्तमान लूक १८:९-१४
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
आपण धार्मिक आहो असे जे कित्येक स्वत:विषयी भरवंसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानीत होते त्यांनाही येशूने एक दाखला सांगितला: "एक परुशी व एक जकातदार असे दोघेजण प्रार्थना करण्यास वर मांदिरात गेले. परुश्याने उभे राहून स्वत:शी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर ! मी तुम्हांला सांगतो दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Luke 18:9-14
At that time: Jesus told this parable to some who trusted in themselves that they were righteous, and treated others with contempt: "Two men went up into the temple to pray, one a Pharisee and the other a tax collector. The Pharisee, standing by himself, prayed thus: 'God, I thank you that I am not like other men, extortioners, unjust, adulterers, or even like this tax collector. I fast twice a week; I give tithes of all that I get. But the tax collector, standing far off, would not even lift up his eyes to heaven, but beat his breast, saying, 'God, be merciful to me, a sinner!" I tell you, this man went down to his house justified, rather than the other. For everyone who exalts himself will be humbled, but the one who humbles himself will be exalted."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: एका संताने सांगितले आहे की, “प्रार्थना ही माणसाची नम्रता आहे, जी त्याच्या गहन दुष्टपणाची व देवाच्या महानतेची कबुली देते.” आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने नम्रपणे केल्या जाणाऱ्या प्रार्थनेच्या महत्वाकडे आपले लक्ष वेधले आहे. जे दोघे मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते, त्यातील एक परूशी तर दुसरा जकातदार होता. परूशी हा कायद्याचा तज्ज्ञ म्हणून स्वतःला नीतिमान समजत होता. जकातदार हा सार्वजनिक पापी म्हणून लोकांच्या तिरस्काराचा विषय होता. प्रार्थनेदरम्यान परूश्याने मंदिरात एक प्रमुख स्थान घेऊन स्वतःला उंचावत आणि त्याच्यासारखे नसलेल्या इतर लोकांना अपमानीत करण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरूवात केली. श्रेष्ठतेच्या भावनेने प्रार्थना करून व स्वतःची इतरांशी तुलना करून व इतरांचा तिरस्कार करून त्याच्या प्रार्थनेत प्रार्थनेतील मूलभूत घटक, म्हणजे पश्चात्ताप नव्हता. जकातदार मात्र दूर उभा राहिला आणि विनम्रपणे त्यानी देवाकडे विनवणी केली. देवाने मात्र गर्विष्ठ असलेल्या परूश्याची नाही तर नम्रतेने केलेली जकातदाराची प्रार्थना ऐकली. जर एखादी व्यक्ति अहंकार आणि - मी पणाच्या उंच शिखरावर असेल तर ती व्यक्ती आपल्या कर्तृत्वाचे गोडवे गाते आणि त्या व्यक्तीच्या हृदयातून देवाला बाहेर काढले जाते कारण सर्व चांगल्या कामांचा स्रोत म्हणून स्वतःलाच श्रेय दिले जाते आणि जी व्यक्ती खरोखर नम्र असते ती व्यक्ती स्वतःच्या मर्यादा व कमकुवतपणा स्वीकारते व ती व्यक्ती जीवनात देवावर व त्याच्या कृपेवर अवलंबून राहते. जेव्हा मी स्वतःला पाहू शकत नाही, तेव्हा मी येशूला पाहू शकतो.
प्रार्थना : हे प्रभू येशू, मज पाप्यावर दया कर, मला तुझ्या सत्पथाने चालण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️

0 टिप्पण्या