Marathi Bible Reading | 2nd Week of Easter Saturday 13th April 2024

पुनरुत्थान दुसरा सप्ताह

 शनिवार  दि. १३ एप्रिल २०२४ 

  तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.”

But he said to them, "It is I; do not be afraid.




संत मार्टिन पहिले  
पोप, वर्तनसाक्षी (६५५)
✝️ 

ख्रिस्त प्रभू आजच्या शुभवर्तमानात पाण्यावरुन चालत येत असतांना पाहून त्याच्या शिष्यांना भीती वाटली. मात्र त्यांना धीर देऊन तो म्हणाला,  आहे, भिऊ नका.' ख्रिस्त प्रभू आज आपल्या सर्वांना सांगत आहे, 'भिऊ नका.' | आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू येशू आपले  संरक्षण करावयास तयार आहे. मनातील सर्व भीती प्रभू येशूवर सोपवून त्याला सर्वस्वी शरण गेल्यास, प्रभू आपल्याला सर्व प्रकारच्या संकटातून वाचविण्यास समर्थ आहे. 
आपण प्रभूवरील विश्वास मजबूत बनवू या. स्वत:वर  तसेच परस्परावरील विश्वास वाढवणेसुद्धा गरजेचे आहे, कारण आपले सर्वांचे जीवन परस्परसंबंधाने विणलेले आहे.  सर्व प्रकारची  भीती बाजूला सारुन देवाला व प्रार्थनेला जीवनात प्रथम स्थान देऊ या.
✝️

पहिले वाचन  प्रेषितांची कृत्ये  ६:१-७
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 
“त्यांनी पवित्र आत्म्याने परिपूर्ण अशा सात पुरुषांची निवड केली. "

शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेल्लेणी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने आणि ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत आणि वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन, फिलीप, प्रखर, नीकानोर, तीमोन, पार्मिना आणि यहुदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.
मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. येरुशलेममध्ये शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 6:1-7
 In these days when the disciples were increasing in number, a complaint by the Hellenists arose against the Hebrews because their widows were being neglected in the daily distribution. And the twelve summoned the full number of the disciples and said, "It is not right that we should give up preaching the word of God to serve tables. Therefore, brothers, pick out from among you seven men of good repute, full of the Spirit and of wisdom, whom we will appoint to this duty. But we will devote ourselves to prayer and to the ministry of the word. And what they said pleased the whole gathering, and they chose Stephen, a man full of faith and of the Holy Spirit, and Philip, and Prochorus, and Nicanor, and Timon, and Parmenas, ad Nicolaus, a proselyte of Antioch. These they set before the apostles, and they prayed and laid their hands on them. And the word of God continued to increase, and the number of the disciples multiplied greatly in Jerusalem, and a great many of the priests became obedient to the faith.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ३३:१-२, ४-५,१८-१९
प्रतिसाद :  प्रभो, तुझ्या प्रेमाची पाखर आमच्यावर असू दे !

 १) सात्त्विक जनहो, प्रभूशी एकरूप होऊन आनंदित व्हा.
 स्तवन करणे सरळ माणसांना शोभून दिसते. 
वीणेवर प्रभूच्या उपकारांचे स्मरण करा, 
दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.

२) प्रभूचा शब्द सत्य आहे. 
त्याचे सारे कार्य टिकाऊ असते. 
त्याला सात्त्विकता व न्याय प्रिय आहेत. 
प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते.

३) प्रभूचे भय बाळगणारे व त्याच्या प्रेमाचे भुकेले 
अशांवर प्रभूची कृपादृष्टी असते,
 मृत्यूच्या दाढेतून तो त्यांचे प्राण वाचवतो, 
दुष्काळात त्यांना जिवंत ठेवतो.


Psalm 33:1-2, 4-5, 18-19

May your merciful love be upon us, as we hope in you, O Lord.

Ring out your joy to the Lord, O you just 
for praise is fitting for the upright.
Give thanks to the Lord upon the harp; 
with a ten-stringed lute sing him songs.

For the word of the Lord is faithful,
 and all his works to be trusted.
The Lord loves justice and right,
 and his merciful love fills the earth.

Yes, the Lord's eyes are on those who fear him,
who hope in his merciful love, 
to rescue their souls from death, 
to keep them alive in famine.R

जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेले आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.
आलेलुया !

Acclamation: 
Christ is risen, who made all things; 
he has shown mercy on all people

शुभवर्तमान  योहान ६:१६-२१
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  “त्यांनी येशूला समुद्रावरून चालताना पाहिले. "

संध्याकाळ झाल्यावर येशूचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलिकडे कफर्णहूम येथे जाऊ लागले, एवढ्यात अंधार पडला. तोपर्यंत येशू त्यांच्याजवळ आला नव्हता. मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला. मग सुमारे कोस सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले, परंतु तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली, तेवढ्यात त्यांना जावयाचे होते त्या ठिकाणी मचवा किनाऱ्याला लागला.
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 6:16-21

When evening came, the disciples of Jesus went down to the lake, got into a boat, and started across the lake to Capernaum. It was now dark, and Jesus had not yet come to them. The lake became rough because a strong wind was blowing. When they had rowed about three or four miles, they saw Jesus walking on the lake and coming near the boat, and they were frightened. But he said to them, "It is I; do not be afraid. Then they were glad to take him into the boat, and immediately the boat was at the land to which they were going.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजची वाचने आम्ही सर्वांनी प्रभूचे अनुसरण करत राहण्यासाठी, त्याच्याशी व त्याच्या आज्ञांशी विश्वासू राहण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी, सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी आणि त्या मार्गावर चालण्या- साठी बोलावत आहेत. आपल्याला दाखवले आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या पवित्र उपस्थितीत यावे आणि त्याच्याशी पूर्णपणे समेट व्हावा आणि पुन्हा एकत्र व्हावे. प्रभूने त्याचा पवित्र आत्मा पाठवला आहे अशासाठी की ख्रिस्तसभेमध्ये आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी, मदत करण्यासाठी आणि आम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी तो आम्हाला नितिमत्तेच्या मार्गाने पुढे नेत असतो. पवित्र आत्मा आमच्या ख्रिस्ती जीवनात व अस्तित्वात आम्हाला मदत व मार्गदर्शन करत आहे. त्याच्या प्रकाशाचे व सत्याचे दीप बनण्यासाठी या जगात त्याच्या प्रेमाचे आणि करुणेचे वाहक होण्यासाठी त्याने आम्हाला प्रेरित केलेले आहे. संजीवन झालेला प्रभू आपल्या जीवनातील विश्वासाच्या प्रवासात आपल्याला मदत आणि मार्गदर्शन करत राहो आणि तो आपल्यापैकी प्रत्येकाला सामर्थ्यवान बनवो, जेणेकरून आपण अनेक आव्हाने आणि परीक्षांना सामोरे जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू व त्यात टिकून राहू. प्रभूचे विश्वासू अनुयायी बनण्यासाठी तो सदैव आपल्यासोबत राहू दे आणि त्याच्या नावाच्या गौरवासाठी आपल्या प्रत्येक प्रयत्नांना आणि आपल्या प्रत्येक चांगल्या कामाला तो आशीर्वाद देवो.

प्रार्थना :-हे प्रभू येशू, सर्व प्रकारच्या भीतीपासून व अनिष्टापासून आमचे संरक्षण कर,आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या