Marathi Bible Reading | Third Sunday of Easter | 14th April 2024

पुनरुत्थानकाळातील 

तिसरा रविवार 

दिनांक   १४ एप्रि २०२

मीच तो आहे. मला चाचपून पाहा, जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते." 

See my hands and my feet, that it is I myself. Touch me, and see.

✝️


"तुम्हांला शांती असो."

✝️

संत पेत्र आणि त्याच्या सहकारी प्रेषितांनी ख्रिस्त येशूने जीवन जवळून अनुभवले होते. ख्रिस्ताची वचने, चमत्कार व त्याची स्वर्गराज्याची  शिकवण ह्या सर्वांचा त्यांच्यावर खोल परिणाम झालेला होता, मात्र पवित्र आत्म्याची कृपा प्राप्त होताच त्यांनी मोठ्या धैयनि पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष देण्यास सुरुवात केली. ख्रिस्ताचे दुःखसहन व कुसावरील मरण पूर्वनियोजित अशी देवाची योजना होती.
आज ख्रिस्तसभा ख्रिस्ताचे व त्याचा सुवार्तेचे  साक्षीदार बनण्यासाठी आपल्याला आवाहन करीत आहे. तारणाची सुवार्ता इतरांना कळवावी ही जबाबदारी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तिवर सोपवलेली आहे. तारण प्राप्त झाल्याशिवाय या जीवनात आपल्याला खरा आनंद व शांती मिळणार नाही आणि सार्वकालिक जीवनाची आशाही नाही.
आपण ख्रिस्त येशूचे साक्षीदार बनावेत म्हणून आपणाला मिळालेले देवाचे वचन व त्याची आज्ञा पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करु या.

✝️

पहिले वाचन  प्रे.  कृ.  ३:१३-१५.१७-१९
वाचक : प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले, परंतु देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले. "

पेत्र लोकांना म्हणाला, आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव याने आपला सेवक येशू याचा गौरव केला आहे, त्याला तुम्ही धरले आणि पिलाने त्याला सोडून देण्याचे ठरवले असताही त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले. पवित्र आणि नीतिमान अशा त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हांला द्या अशी मागणी केली. तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले; पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले ह्यांचे आम्ही साक्षी आहोत.बंधुजनहो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही, जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु आपल्या ख्रिस्ताने, दुःखसहन करावे असे जे देवाने सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चात्ताप करा आणि वळा. कारण विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे."

प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 3:13-15.17-19

In those days Peter said to the people, "The God of Abraham, the God of Isaac, and the God of Jacob, the God of our fathers, glorified his servant Jesus, whom you delivered over and denied in the presence of Pilate, when he had decided to release him. But you denied the Holy and Righteous One, and asked for a murderer to be granted to you, and you killed the Author of life, whom God raised from the dead. To this we are witnesses. And now, brothers, I know that you acted in ignorance, as did also your rulers. But what God foretold by the mouth of all the prophets, that his Christ would suffer, he thus fulfilled. Repent therefore, and turn back, that your sins may be blotted out."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ४:२,४,७, ९

प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हांवर पाड.
१ ) हे माझ्या न्यायदात्या देवा, मी तुझा धावा करतो तेव्हा माझे ऐक. मला तू पेचातून मोकळे केले आहेस. माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक.

२ ) ज्यांच्यावर प्रभूची प्रीती आहे. त्यांच्यासाठी तो अद्भुत कृत्ये करतो, मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो ऐकेल.

३)  "आम्हाला चांगले दिवस कोण दाखवील" असे म्हणणारे पुष्कळ आहेत. हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड.

४ ) शांतपणे अंग टाकताच मी झोपी जातो कारण हे प्रभू, केवळ तूच मला सुरक्षित ठेवतोस.


Psalm 4:2, 4, 7, 9 ( 7b)
Lift up the light of your face on us, O Lord. 
I called, the God of justice gave me answer; 
from anguish you released me, 
have mercy and hear me! R

Know that the Lord works wonders for his faithful one; 
the Lord will hear me whenever I call him. R 

"What can bring us happiness?" many say. 
Lift up the light of your face on us, O Lord. R 

In peace I will lie down and fall asleep, 
for you alone, O Lord, make me dwell in safety. R


दुसरे वाचन १ योहान :२ : १-५अ

वाचक :  योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"येशू ख्रिस्त आपल्या पापांबद्दल आणि सर्व जगाच्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. "

अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिमान असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.
आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांला कळून येते की, आपण त्याला ओळखतो. "मी त्याला ओळखतो," असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे. त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.

1 John 2:1-5a

My little children, I am writing these things to you so that you may not sin. But if anyone does sin, we have an advocate with the Father, Jesus Christ the righteous. He is the propitiation for our sins, and not for ours only but also for the sins of the whole world. And by this we know that we have come to know him, if we keep his commandments. Whoever says "I know him" but does not keep his commandments is a liar, and the truth is not in him, but whoever keeps his word, in him truly the love of God is perfected.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्हाला शास्त्रवचने शिकव. आम्हांशी बोलून आमच्या हृदयात चेतना निर्माण कर. 
 आलेलुया!

Acclamation: 
Lord Jesus, open the Scriptures to us; make our hearts burn with love when you speak to us.


शुभवर्तमान लूक  २४:३५-४८
वाचक :  लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“येशूख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठावे."

प्रेषितांनी वाटेतल्या घटना आणि येशूने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले.
 ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्याच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, "तुम्हांला शांती असो." पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, "तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात आणि पाय पाहा. मीच तो आहे. मला चाचपून पाहा, जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते." असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले. मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यांना म्हटले, "येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय ?" मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्ला.
मग तो त्यांना म्हणाला, "मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली वचने हीच आहेत." मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे," तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि येरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टीचे साक्षी आहा."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Luke 24:35-48

At that time: The disciples told what had happened on the road, and how Jesus was known to them in the breaking of the bread. As they were talking about these things, Jesus himself stood among them, and said to them, "Peace to you!" But they were startled and frightened and thought they saw a spirit. And he said to them, "Why are you troubled, and why do doubts arise in your hearts? See my hands and my feet, that it is I myself. Touch me, and see. For a spirit does not have flesh and bones as you see that I have." And when he had said this, he showed them his hands and his feet. And while they still disbelieved for joy and were marvelling, he said to them, "Have you anything here to eat?" They gave him a piece of broiled fish, and he took it and ate before them. Then he said to them, There are my 
words that I spoke to you while I was still with you, that everything written about me in the Law of Moses and the Prophets and the Psalms must be fulfilled." Then he opened their minds to understand the Scriptures, and said to them, "Thus it is written, that the Christ should suffer and on the third day rise from the dead, and that repentance for the forgiveness of sins should be proclaimed in his name to all nations, beginning from Jerusalem. You are witnesses of these things.


 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजची उपासना वाचने आपल्याला आठवण करून देतात की, प्रभू येशूच्या मृत्यूचा आणि पुनरुत्थानाचा उद्देश आपल्याला आपल्या पापांपासून वाचवण्यास होता. त्यामुळे संजीवन झालेल्या प्रभूच्या जिवंत उपस्थितीतील आपल्या विश्वासाला आव्हान आहे. त्या विश्वासाने त्याच्या अभिवचनांवर आपली आशा बळकट केली पाहिजे. आजच्या पहिल्या वाचनात संत पीटरने प्रभू येशूचा प्रचार करण्याचे कार्य कसे पूर्ण केले याचे वर्णन केले आहे. तो यहुद्यांना देवाकडे वळण्यास सांगतो जेणेकरून त्यांची पापे पुसली जातील. दुसऱ्या वाचनात योहान आपल्याला सांगतो की, प्रभू येशू आपल्या पापांचे प्रायश्चित्त आहे हे कबूल करण्यातच खरे ज्ञान आणि देवाचे प्रेम आहे. ही पोचपावती आपण त्याची साक्ष देऊन आणि त्याच्या आज्ञाचे पालन करून रोज देतो. आजचे शुभवर्तमान आपल्याला विश्वास, शंका आणि संकटांवर विजय मिळविण्यास प्रवृत्त करते. शुभवर्तमान आपल्याला दाखवते की प्रभू येशूने आपल्या शिष्यांना त्याच्या पुनरुत्थानाची खात्री कशी पटवून दिली आणि त्याने त्यांना जगभर त्याचे साक्षीदार बनण्यासाठी नेमणूक कशी दिली ? त्याने त्यांच्यावर पवित्र आत्म्याच्या आगमनाद्वारे देवाची शक्ती प्राप्त करण्यासाठी त्यांना तयार केले आणि त्याने त्यांना पश्चात्ताप आणि पापांची क्षमा करण्याचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. परमेश्वराने दिलेल्या आज्ञांचे पालन न करता कोणी पुनरुत्थित प्रभूची साक्ष प्रभावीपणे देऊ शकत नाही. कारण त्याने स्वतः आज्ञाधारकपणे क्रुसावरचे मरण पत्करले आणि पुनरूत्थित होऊन तो जगापुढे प्रकट झाला.

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या तारणाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन. 

✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या