पुनरुत्थान तिसरा सप्ताह
शनिवार दि. २० एप्रिल २०२४
“प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार ? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत. "Lord, to whom shall we go? You have the words of eternal life,
मॉन्तेपुल्शिआनोची संत आग्नेस
- कुमारिका (१२६८-१३१७)
इटलीतील तुस्कानी येथल्या एका सरदारपुत्राच्या घराण्यात आग्नेस हिचा जन्म झाला. आध्यात्मिक बाबतीत ती बालपणापासूनच चारचौघींमध्ये उठून दिसे. वयाच्या केवळ ९व्या वर्षीच ती फ्रान्सिस्कन सिस्टरांच्या कडक शिस्तीच्या संघामध्ये दाखल झाली. प्रोसेनो येथल्या नवीन डॉमिनिकन कॉन्व्हेंटची प्रमुख अधिकारी म्हणून तिची निवड ती फक्त १५ वर्षाची असतानाच झालेली होती. ह्यावरून तिच्या धार्मिक जीवनाच्या उंचीची कल्पना येईल. ह्याच कॉन्व्हेंटच्या पायाभरणीत पोप निकोलस पाचवे ह्यांच्या आज्ञेवरून तिने दोन वर्षे अथक परिश्रम घेतले होते.
तिचे हे नेत्रदीपक यश पाहून मॉन्टेपुल्शियानोच्या स्थानिक रहिवाश्यांनी आपल्याही गावात डॉमनिकन संघाचे एखादे कॉन्व्हेंट सुरू करावे म्हणून तिच्याकडे तगादा लावला. त्यांच्या प्रेमाखातर व आग्रहास्तव इ.स १२९८ साली तिने एक कॉन्व्हेंट तिथे सुरू केले व तिच्या मृत्यूपर्यंत १९ वर्षे ह्या कॉन्व्हेंटमधून परमेश्वराचे प्रेषितकार्य सुरू ठेवले.
संत आग्रेस हिला अनेक रहस्यमय वरदाने लाभलेली होती. तिला अद्भुत चमत्कारांचेही दान प्राप्त झालेले होते. प्रार्थना, शुद्धता याव्यतिरिक्त देवावरील पूर्ण भरवसा हा तिच्यामधील बालसद्दश सद्गुण होता. ह्याच श्रद्धेपायी तिच्याद्वारे अनेक प्रार्थनांची उत्तरे मिळत गेली.
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ९:३१-४२
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ख्रिस्तमंडळाची उन्नती होऊन ती पवित्र आत्म्याच्या समाधानात परिपूर्ण झाली."
सर्व यहुदिया, गालील आणि शोमरोन ह्या प्रदेशातील मंडळीस स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात आणि पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.
मग असे झाले की, पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला. तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्रने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे, ऊठ आणि स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर." तेव्हा तो तात्काळ उठला. त्याला पाहून लोद आणि शारोन येथील सर्व रहिवाशी प्रभूकडे वळले.
आणखी यापोमध्ये टबीथा उर्फ दुर्कस ह्या नावाची कोणीएक शिष्या होती, ती सत्कृत्ये आणि दानधर्म करण्यात तत्पर असे. पुढे ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी दोघा जणांना पाठवून त्याला विनंती केली की, “आम्हाकडे यावयाला उशीर करू नका." तेव्हा पेत्र उठून त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याजवळ असता ती जे अंगरखे आणि जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग प्रेताकडे वळून म्हटले, "टबीथ, ऊठ" तेव्हा तिने डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले. मग सर्व यापोमध्ये हे माहीत झाले आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 9:31-42
In those days: The church throughout all Judea and Galilee and Samaria had peace and was being built up. And walking in the fear of the Lord and in the comfort of the Holy Spirit, it multiplied. Now as Peter went here and there among them all, he came down also to the saints who lived at Lydda. There he found a man named Aeneas, bedridden for eight years, who was paralysed. And Peter said to him, "Aeneas, Jesus Christ heals you; rise and make your bed And immediately he rose. And all the residents of Lydda and Sharon saw him, and they turned to the Lord. Now there was in Joppa a disciple named Tabitha, which, translated, means Dorcas. She was full of good works and acts of charity. In those days she became ill and died, and when they had washed her, they laid her in an upper room. Since Lydda was near Joppa, the disciples, hearing that Peter was there, sent two men to him, urging him, "Please come to us without delay." So Peter rose and went with them. And when he arrived, they took him to the upper room. All the widows stood beside him weeping and showing tunics and other garments that Dorcas made while she was with them. But Peter put them all outside, and knelt down and prayed; and turning to the body he said, "Tabitha, arise." And she opened her eyes, and when she saw Peter she sat up. And he gave her his hand and raised her up. Then, calling the saints and widows, he presented her alive. And it became known throughout all Joppa, and many believed in the Lord.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११६:१२-१७
प्रतिसाद : प्रभूच्या अनंत उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ ?
१) प्रभूच्या अनंत उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ ?
माझ्या उद्धाराचे पेयार्पण घेऊन मी येईन
आणि प्रभूच्या नावाने धावा करीन.
२) प्रभूला केलेले नवस मी त्याच्या साऱ्या प्रजेसमक्ष फेडीन.
प्रभूच्या भक्तांचे मरण त्याच्या दृष्टीने अमोल आहे.
३) मी तर तुझा दास आहे प्रभू !
मी तुझ्या सेविकेचा पुत्र आहे.
तू माझी बंधने सोडली आहेत.
प्रभूच्या नावाने धावा करीन.
मी तुला आभारप्रदर्शक यज्ञ करीन,
Psalm 116:12-17
R. How can I repay the Lord for all his goodness to me?
How can I repay the Lord
for all his goodness to me?
The cup of salvation I will raise;
I will call on the name of the Lord. R
My vows to the Lord I will fulfil
before all his people.
How precious in the eyes of the Lord
is the death of his faithful. R
Your servant, Lord, your servant am 1,
the son of your handmaid;
you have loosened my bonds.
A thanksgiving sacrifice I make;
I will call on the name of the Lord. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.
आलेलुया !
Acclamation:
Your words, Lord, are Spirit and life, you have the words of eternal life.
शुभवर्तमान योहान ६:६०-६९
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“आम्ही कोणाकडे जाऊ? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत."
येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, "हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?" आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करीत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, "ह्यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर? आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही, मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन अशी आहेत. तरीही विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, “ह्याच कारणास्तव मी तुम्हांला सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही."
ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. येशू बारा शिष्यांना म्हणाला, "तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय ?" शिमोन पेत्रने उत्तर दिले “प्रभो, आम्ही कोणाकडे जाणार ? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो आपण आहा.'
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 6:60-69:
At that time: When many of the disciples of Jesus heard it, they said, "This is a hard saying; who can listen to it?" But Jesus, knowing in himself that his disciples were grumbling about this, said to them, "Do you take offence at this? Then what if you were to see the Son of Man ascending to where he was before? It is the Spirit who gives life; the flesh is no help at all. The words that I have spoken to you are spirit and life. But there are some of you who do not believe." (For Jesus knew from the beginning who those were who did not believe, and who it was who would betray him.) And he said, "This is why I told you that no one can come to me unless it is granted him by the Father." After this many of his disciples turned back and no longer walked with him. So Jesus said to the twelve, "Do you want to go away as well?" Simon Peter answered him, "Lord, to whom shall we go? You have the words of eternal life, and we have believed, and have come to know, that you are the Holy One of God."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: शिष्यांनी सर्व हल्ले, धमक्या, आरोप- प्रत्यारोप, छळवणूक या सर्व त्रासामध्ये दैवी शक्तीच्या साहाय्याने नव्याने जन्मलेल्या ख्रिस्तसभेला धैर्य प्राप्त करून दिले आणि अगदी निर्भिडपणे सर्व संकटांना तोंड दिले. खिस्तसभेचा कुणीही विनाश करू शकत नाही कारण जे परमेश्वराकडून येते ते अविनाशी असते. त्यामुळे ख्रिस्तसभा वाढतच जाणार आणि ती रंजल्या- गांजलेल्यांना मदतीचा हात देण्यासाठी व भुकेल्यांना आशा व विपुल जीवन ह्यांचे दान देत आलेली आहे हे आपण पहिल्या वाचनात वाचत आहोत. सुरुवातीला शिष्यांना देखील प्रभूची शिकवण पटत नव्हती. ते प्रभू येशूची शिकवण नश्वर जगाच्या पातळीवर पाहत होते त्यामुळे काहींनी प्रभूला सोडून देखील दिलं आणि ते परत त्याच्या वाटेने फिरकले नाहीत. तीन प्रश्नांवर आपण सखोलपणे चिंतन करू या. पहिला प्रश्न, मी नक्की ख्रिस्ती म्हणून काय शोधत आहे? मी कशासाठी ख्रिस्ताला धरून राहिलो आहे? माझ्या मनासारखे होते, मला समाधान वाटते, समाधान देणाऱ्या गोष्टी घडतात म्हणून मी ख्रिस्ती राहिलो आहे का? मला पाहिजे ते मिळते म्हणून मी ख्रिस्ती आहे -का? दुसरा प्रश्न, माझ्या जीवनाची सर्व - दालने मी प्रभूसाठी खुली करू शकतो का? - आणि तिसरा प्रश्न म्हणजे मोठ्या गोष्टी लहान पुडीमध्ये मिळतात. (It is said in English, God gives great gifts in small packages), म्हणून मी अन्य देवांकडे वळतो का? परंतु अंतःकरण तृप्त करणारा फक्त प्रभू येशू आहे. म्हणून पेत्राप्रमाणे आपणही प्रभूला सांगू या, “प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र पुरुष आपणच आहात."
प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझे वचन आत्मसात करण्यास व त्यानुसार जीवन
जगण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे वरदान दे, आमेन.
✝️

0 टिप्पण्या