पुनरुत्थानकाळातील
चौथा रविवार
दिनांक २१ एप्रिल २०२४
मीच उत्तम मेंढपाळ आहे;.'
"I am the good shepherd. The good shepherd lays down his life for the sheep.
"उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. "✝️
प्रेषितांची कृत्ये ह्या आजच्या पहिल्या वाचनात संत पेत्र प्रभू येशू विषयी साक्ष देताना स्पष्ट करीत आहे की, प्रभू येशू हाच संपूर्ण विश्वाचा एकमेव तारणकर्ता आहे. 'त्याच्या नावात व त्याच्या वचनात तारणाचे सामर्थ्य आहे. दुसऱ्या वाचनात आपण सर्वजण देवाची मुले आहोत असे सांगितले आहे. म्हणजेच देवाची प्रीति आपल्या सर्वांना मिळालेली आहे.
प्रभू येशू आज शुभवर्तमानाद्वारे आपल्या सर्वांना सांगत आहे. 'मीच उत्तम मेंढपाळ आहे;.' मेंढपाळ म्हणजे पालन करणारा किंवा काळजी करणारा. प्रभूयेशू आपल्या सर्वांचा काळजी करणारा, पालनहार व रक्षणकर्ता आहे. प्रभू येशू म्हणतो, 'मी आपल्या मेढरांकरिता आपला प्राण देतो.' म्हणजेच प्रभू येशू स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्याला वाचवितो. आपण सर्व त्या परमेश्वर पित्याची मुले आहोत आणि आपण सर्वांनी एक कळप व्हावे म्हणून प्रभू आपल्याला त्याच्या वचनाव्दारे सतत मार्गदर्शन करीत असतो.
प्रभू, आपला मेंढपाळ आपल्याला हाक मारुन शोधत असतो. आपण अशा प्रसंगी त्याची वाणी ऐकली आहे का ? सर्व प्रकारच्या काटेरी झुडूपांतून प्रभू आपल्याला बाहेर काढून त्याच्या कळपात आणण्यासाठी आपल्या जवळ आहे. त्याची मधूर वाणी आपण ऐकू या.
पहिले वाचन प्रे. कृ. ४:८-१२
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. "
पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन यहुद्यांना म्हणाला, “अहो लोकांधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल, तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की, ज्याला तुम्ही क्रुसावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नाझरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला दगड कोनशिला झाला आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. कारण ज्याच्याद्वारे आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.".
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 4:8-12
In those days: Peter, filled with the Holy Spirit said to them, "Rulers of the people and elders, if we are being examined today concerning a good deed done to a crippled man, by What means this man has been healed, let it be known to all of you and to all the people of Israel that by the name of Jesus Christ of Nazareth, whom you crucified, whom God raised from the dead-by him this man is standing before you well. This Jesus is the stone that was rejected by you, the builders, which has become the cornerstone. And there is salvation in no one else, for there is no other name under heaven given among men by which we must be saved."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११८:१.८-९,२२-२३,२६.२८-.२९
प्रतिसाद : बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला.
१) परमेश्वराचे उपकारस्मरण करा कारण तो चांगला आहे,
त्याची दया सनातन आहे.
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा देवाचा आश्रय घेणे बरे.
२) तू माझे ऐकले आहे, तू माझा तारक झाला आहेस,
यास्तव मी तुझे उपकारस्मरण करतो.
बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे.
ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे.
३) परमेश्वराच्या नावाने येणाऱ्याचा धन्यवाद होवो.
परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो.
तू माझा देव आहेस, मी तुझे उपकारस्मरण करीन.
हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन.
परमेश्वराचे उपकारस्मरण करा,
कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे.
Psalm 118:1 and 8-9, 21-23, 26 and 28-29 (22)
The stone that the builders rejected has become the cornerstone,
Give praise to the Lord, for he is good,
his mercy endures for ever.
It is better to take refuge in the Lord than to trust in man;
it is better to take refuge in the Lord than to trust in princes. R
I will thank you, for you have answered,
and you are my saviour.
The stone that the builders rejected has become the cornerstone.
By the Lord has this been done, a marvel in our eyes. R
Blest is he who comes in the name of the Lord.
We bless you from the house of the Lord.
You are my God, I praise you. My God, I exalt you.
Give praise to the Lord, for he is good;
his mercy endures for ever. R
दुसरे वाचन १ योहान ३:१-२
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाच्या खऱ्या स्वरूपात आम्ही त्याला पाहू.'
आम्हांला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आम्हांला केवढे प्रेमदान दिले हे पाहा, आणि आपण तसे आहोतच. त्यामुळे जग आम्हांला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसा तो आपल्याला दिसेल.
1 John 3:1-2
Beloved: See what kind of love the Father has given to us, that we should be called children of God; and so we are. The reason why the world does not know us is that it did not know him. Beloved, we are God's children now, and what we will be has not yet appeared; but we know that when he appears we shall be like him, because we shall see him as he is.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया!
Acclamation:
I am the good shepherd, says the Lord; I know my own, and my own know me.
शुभवर्तमान योहान १० : ११-१८
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. "
येशू म्हणाला, “मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो. लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. ह्या मेंढवाड्यातली नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत, ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ, असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 10:11-18
At that time: Jesus said, "I am the good shepherd. The good shepherd lays down his life for the sheep. He who is a hired hand and not a shepherd, who does not own the sheep, sees the wolf coming and leaves the sheep and flees, and the wolf snatches them and scatters them. He flees because he is a hired hand and cares nothing for the sheep. I am the good shepherd. I know my own and my own know me, just as the Father knows me and I know the Father; and I lay down my life for the sheep. And I have other sheep that are not of this fold. I must bring them also, and they will listen to my voice. So there will be one flock, one shepherd. For this reason the Father loves me, because I lay down my life that I may take it up again. No one takes it from me, but I lay it down of my own accord. I have authority to lay it down, and I have authority to take it up again. This charge I have received from my Father."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: पुनरुत्थान काळातील चौथा रविवार उत्तम मेंढपाळ रविवार म्हणून साजरा केला जातो. मागील दोन रविवारी प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतरच्या दर्शनाच्या दृष्टीने ठोस घटनांवर अधिक लक्ष केंद्रीत करीत असताना आजचा व आगामी रविवारचा भर प्रभू येशूच्या त्याच्या येऊ घातलेल्या स्वर्गारोहण आणि पेन्टेकॉस्टच्या पवित्र आत्म्याच्या भेटीबदलच्या शिकवणीवर दिला आहे. प्रत्येक वर्षी या रविवारी आपण प्रभू येशूच्या चांगल्या मेंढपाळाच्या रूपात त्याच्या कळपाची निष्ठेने काळजी घेत असलेल्या प्रतिमेवर विचार करतो. मेंढपाळ त्याच्या कळपाचे नेतृत्व करतो, आहार देतो, पालनपोषण करतो, सुखसोयी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. सुरुवातीला ख्रिस्ती लोकांनी प्रभू येशूला एका चांगल्या मेंढपाळाच्या प्राचीन यहुदी स्वप्नाची पूर्तता म्हणून पाहिले होते. देवाच्या कळपाचा भाग म्हणून परराष्ट्रीयांचाही समावेश करण्याची त्यांची इच्छा होती. आपल्या कळपाचा उत्तम मेंढपाळ म्हणून स्वतःची ओळख करून देत प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात तीन दावे करतो. त्याला त्याच्या मेंढरांची ओळख आहे आणि त्याची मेंढरे त्याचा आवाज ऐकतात हा पहिला दावा, तर दुसरा दावा म्हणजे बाप्तिस्म्याद्वारे तो आपल्या कळपात आपल्याला स्वीकारून आपल्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो आणि तिसरा दावा तो आपल्या मेंढरांना त्याच्या सर्वशक्तीमान पित्याच्या प्रेमळ हातात देऊन त्यांचे रक्षण करतो हा होय. "परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कसलीही उणीव पडणार नाही." जर मी खरोखरच यावर विश्वास ठेवला तर माझे आयुष्य किती वेगळे व अर्थपूर्ण असेल ! जेणेकरून चांगुलपणा व दयाळूपणा माझ्या आयुष्यातील सर्व दिवस माझ्यामागे राहील.
प्रार्थना : हे प्रभू येशू, मला सन्मार्गावरुन चालण्यास व तुझ्या कळपात एक होण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या