पवित्र आत्म्याच्या आगमनाचा
रविवार
१९ मे २०२४
"पवित्र आत्म्याचा स्वीकार करा."
"Receive the Holy Spirit.
✝️
आजच्या पहिल्या वाचनात स्वर्गरोहणानंतर पेन्टेकॉस्टच्या दिवशी सर्व शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला व त्याच्या सामर्थ्याने सर्व प्रेषितगण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले त्याचा वृत्तांत आहे. परमेश्वर पिता, देवपुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने प्रत्येक ख्रिस्ती माणसाला पवित्र आत्मा मिळाला आहे. प्रेषितांनी जसे प्रेरित होऊन प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देऊन सुवार्ता पसरविली तसेच आपल्या प्रत्येकाला सुवार्तेची साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
संत पौल म्हणतो त्याप्रमाणे, ‘आपल्या सर्वांना विविध कृपादाने मिळाली आहेत', त्यानुसार आपण प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. एकच आत्मा, एकच प्रभू आणि एकच देव अशा ऐक्याचे अवयव असलेले आपण पवित्र आत्म्याठायी संचरित होऊन देवाचा गौरव करु या.
पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत झालेल्या शिष्यांना दर्शन दिले आणि आपले कार्य व जबाबदारी शिष्यांवर सोपविली. बंद दरवाज्यातून प्रभू आत आला, देवाची स्वर्गराज्याची सुवार्ता घोषविण्यास शिष्यांना व आपल्या प्रत्येकाला येशूने आज्ञापिले आहे. पवित्र आत्म्याची कृपा प्रभूने त्यांना देत म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा” आणि शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना पापांची क्षमा करण्याचा अधिकार दिला. ख्रिस्तसभेत आजसुद्धा प्रभू येशूचे कार्य त्यामुळेच सातत्याने फलदायी बनत आहे.
✝️
पहिले वाचन प्रे. कृ. २: १-११
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि बोलू लागले."
पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना, अकस्मात मोठ्या सुसाट्यासारखा वाऱ्याचा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या आणि प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले.
त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रांतील भक्तिमान यहुदी यरुशलेममध्ये राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोधंळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालिली ना ? तर आपण प्रत्येक जण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे ? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहुदीया , कप्पुदुकिया, पंत, आसियास, फ्रुगिया, पंफूलिया, इजिप्त आणि कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहुदी आणि यहुदीयमतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषात देवाची महत्कृत्ये सांगतांना ऐकतो.”
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 2:1-11
When the day of Pentecost arrived, they were all together in one place. And suddenly there came from heaven a sound like a mighty rushing wind, and it filled the entire house where they were sitting. And divided tongues as of fire appeared to them and rested on each one of them. And they were all filled with the Holy Spirit and began to speak in other tongues as the Spirit gave them utterance. Now there were dwelling in Jerusalem Jews, devout men from every nation under heaven. And at this sound the multitude came together, and they were bewildered, because each one was hearing them speak in his own language. And they were amazed and astonished, saying, "Are not all these who are speaking Galileans? And how is it that we hear, each of us in his own native language? Parthians and Medes and Elamites and residents of Mesopotamia, Judea and Cappadocia, Pontus and Asia, Phrygia and Pamphylia, Egypt and the parts of Libya belonging to Cyrene, and visitors from Rome, both Jews and proselytes, Cretans and Arabians-we hear them telling in our own tongues the mighty works of God."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १०४:१.२४,२९-३०,३१,३४
प्रतिसाद : प्रभो, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे.
१) हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर !
हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस.
हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत!
तुझ्या संपत्तीने पृथ्वी परिपूर्ण आहे.
२) तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा
ते मरून मातीत मिळतात.
तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात
आणि तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस.
३) परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो !
परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद होवो !
मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो.
परमेश्वराच्या ठायी मला हर्ष होईल.
Psalm 104: 1ab and 24ac, 29bc-30, 31 and 34 (R 30)
Lord, send forth your Spirit, and renew the face of the earth.
Bless the Lord, O my soul!
O Lord my God, how great you are.
How many are your works, O Lord!
The earth is full of your creatures. R
You take away their breath, they die,
returning to the dust from which they came.
You send forth your spirit, and they are created,
and you renew the face of the earth. R
May the glory of the Lord last for ever!
May the Lord rejoice in his works!
May my thoughts be pleasing to him.
I will rejoice in the Lord. R
दुसरे वाचन : १ करिंथ १२:३-७.१२-१३
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे."
पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही “येशू . हा प्रभू आहे" असे म्हणता येत नाही.
कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते.
कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
Second reading : 1 Corinthians 12:3b-7.12-13
Brethren: No one can say "Jesus is Lord" except in the Holy Spirit. Now there are varieties of gifts, but the same Spirit; and there are varieties of service, but the same Lord; and there are varieties of activities, but it is the same God who empowers them all in everyone. To each is given the manifestation of the Spirit for the common good. For just as the body is one and has many members, and all the members of the body, though many, are one body, so it is with Christ. For in one Spirit we were all baptized into one body-Jews or Greeks, slaves or free-and all were made to drink of one Spirit.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे पवित्र आत्म्या, ये, तुझ्या श्रद्धांवतांची हृदये व्यापून टाक आणि तुझा प्रेमाग्नी त्यांच्या हृदयात प्रज्वलित कर.
आलेलुया!
Acclamation:
Come ,O Holy Spirit, fill the heart of your faithful;and kindle in them the fire of your love.
शुभवर्तमान योहान २०:१९-२३
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. "
त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” असे बोलून त्याने आपले हात आणि कूस दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो." असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, "पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: John 20:19-23
On the evening of that day, the first day of the week, the doors being locked where the disciples were for fear of the Jews, Jesus came and stood among them and said to them, "Peace be with you." When he had said this, he showed them his hands and his side. Then the disciples were glad when they saw the Lord. Jesus said to them again, "Peace be with you. As the Father has sent me, even so I am sending you. And when he had said this, he breathed on them and said to them, "Receive the Holy Spirit. If you forgive the sins of any, they are forgiven them; if you withhold forgiveness from any, it is withheld."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:आजची तिन्ही वाचने पुनरुस्थित खिस्ताच्या प्रेमात राहायला आव्हान करत आहेत. पहिल्या वाचनात यहूदी खिस्ती लोकांनी परराष्ट्रीय लोकांना अपवित्र आणि अशुद्ध मानू नये तर प्रभू येशूसारखे त्यांच्यावर प्रेम करावे आणि ह्याचा एक आदर्श म्हणून पेत्राला पवित्र आत्म्याद्वारे तसेच कर्नेलियसच्या भेटीतून स्पष्ट करण्यात आले. दुसऱ्या वाचनात संत पॉल आपल्याला प्रेम करण्यास आग्रह करीत आहे. कारण देव प्रेम आहे. त्याने सर्वप्रथम आपल्यावर प्रेम केले. आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवून त्याच्या प्रेमाद्वारे आपल्याला नवजीवन प्राप्त झाले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणांस त्याच्या प्रेमात राहावयाचे आवाहन आजच्या शुभवर्तमानात करीत आहे. जसा तो आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रेमात राहतो. तशाचप्रकारे प्रभू येशू खिस्त आपल्या शिष्यांना त्याच्या प्रेमाच्या आज्ञा पाळून त्याच्या व देवापित्याच्या आज्ञेत राहण्यास आव्हान करत आहे. ख्रिस्ताच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रेमात राहण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करतो ? आपल्या समाजातील जाती-भेद नष्ट करण्यासाठी तसेच प्रेमाने जीवन जगण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करत आहोत ?
प्रार्थना : हे पवित्र आत्मा, ये आणि तुझ्या सामर्थ्याने आमच्याद्वारे देवाची सुवार्ता पसरविण्यास आम्हाला सामर्थ्य व कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या