Marathi Bible Reading | 7th Week of Easter Saturday 18 th May 2024

पुनरुत्थान सातवा  सप्ताह  

शनिवार   दि. १८ मे  २०२४ 

 तू माझ्या मागे ये." 

 You follow me!

✝️




 संत जॉन पहिले
परमगुरू, रक्तसाक्षी(५२६) 

.त्यागमय जीवन जगणे, देवाच्या इच्छेला प्राधान्य देणे, क्रुस व वेदनांना स्वीकारणे, प्रभूची वचने पाळून पवित्र जीवन जगणे आणि आपल्या जीवनाद्वारे  देवाची सुवार्ता पसरविणे. येशू ख्रिस्ताच्या मागे चालत असताना आपल्या  जीवनात अनेक संकटे, अडचणी व आव्हाने येणारच, मात्र त्यातून निभावून  जाण्यासाठी प्रभू येशू आपल्याला धैर्याचा व सामर्थ्याचा आत्मा देत आहे..

पहिले वाचन प्रे. कृ.  २८: १६-२०,३०-३१

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

 "पौल रोम शहरात राहिला. तेथे तो देवाच्या राज्याची घोषणा करीत असे."

आम्ही रोम शहरात गेल्यावर पौलला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.
तीन दिवसानंतर पौलने यहुद्यांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, “बंधुजनहो, मी आपल्या लोकांविरूद्ध आणि पूर्वजांच्या संप्रदायाविरुद्ध काही केले नसता मला येरुशलेममध्ये बंदिवान करून रोमी लोकांच्या हाती देण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यावर माझ्याकडे मरणदंडास पात्र असा काही गुन्हा नसल्यामुळे ते मला सोडू पाहत होते, परंतु यहुद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले; तरी मला आपल्या राष्ट्रांवर काही दोषारोप करावयाचा होता असे नाही. ह्याकरता तुमची भेट घेऊन तुम्हांबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हांला बोलावले, इस्त्राएलच्या आशेमुळे मी ह्या साखळीने बांधलेला आहे.” तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 28:16-20, 30-31

When we came into Rome, Paul was allowed to stay by himself, with the soldier who guarded him. After three days he called together the local leaders of the Jews, and when they had gathered, he said to them, Brothers, though I had done nothing against our people or the customs of our fathers, yet I was delivered as a prisoner from Jerusalem into the hands of the Romans. When they had examined me, they wished to set me at liberty, because there was no reason for the death penalty in my case. But because the Jews objected, I was compelled to appeal to Caesar-though I had no charge to bring against my nation. For this reason, therefore, I have asked to see you and speak with you, since it is because of the hope of Israel that I am wearing this chain. He lived there two whole years at his own expense, and welcomed all who came to him, proclaiming the kingdom of God and teaching about the Lord Jesus Christ with all boldness and without hindrance.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ११ :४-५,७

प्रतिसाद : हे प्रभो, सज्जनांना तुझे दर्शन होईल.

१) परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वराचे सिंहासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवांना पाहतात. त्याच्या पापण्या त्यांना अजमावतात.

२) प्रभू सज्जनांची आणि दुर्जनांचीही परीक्षा करतो. पण अत्याचारी माणसांचा त्याला अगदी मनापासून वीट येतो. 

३) परमेश्वर न्यायी आहे. त्याला धार्मिकता प्रिय आहे. सज्जनांना त्याचे दर्शन होईल.



Psalm 11:4, 5 and 7

The upright shall behold your face, O Lord.

The Lord is in his holy temple;
the throne of the Lord is in heaven.
His eyes behold the world;
his gaze probes the children of men. R 

The Lord inspects the just and the wicked; 
the lover of violence he hates.
For the Lord is just and loves deeds of justice; 
the upright shall behold his face. R

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. 
आलेलुया !

Acclamation: 
I will send the Spirit of truth to you, says the Lord; he will guide you into all the truth. 

शुभवर्तमान योहान  २१:२०-२५
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हांला माहित आहे."

पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून “प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे ?" असे म्हणाला होता त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, "प्रभू ह्याचे काय ?" येशूने त्याला म्हटले, "मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय ? तू माझ्या मागे ये." ह्यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वाच्यता बंधुवर्गामध्ये पसरली; तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय ?" असे म्हटले होते. 
जो ह्या गोष्टींविषयी साक्ष देतो आणि ज्याने ह्या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे.
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:John 21:20-25

At that time: Peter turned and saw the disciple whom Jesus loved following them, the one who also had leaned back against him during the supper and had said, "Lord, who is it that is going to betray you?" When Peter saw him, he said to Jesus, "Lord, what about this man?" Jesus said to him, "If it is my will that he remain until I come, what is that to you? You follow me!" So the saying spread abroad among the brothers that this disciple was not to die; yet Jesus did not say to him that he was not to die, but, "If it is my will that he remain until I come, what is that to you?" This is the disciple who is bearing witness about these things, and who has written these things, and we know that his testimony is true. Now there are also many other things that Jesus did. Were every one of them to be written, I suppose that the world itself could not contain the books that would be written.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनयोहानाच्या शुभवर्तमानाचा हा शेवटचा उतारा आहे. ज्यामध्ये शिष्याला संपूर्णपणे वचनबद्ध राहण्यासाठी आवाहन केले जात आहे. वचनबद्धतेची मागणी शिष्यांला अशासाठी केली जाते की त्याने पवित्र आत्म्याचे संपूर्णपणे अनुसरण करावे. वचनबद्धतेची मागणी अशासाठी केली की, त्याने स्वतःला मरावे आणि ख्रिस्ताच्या मागे जावे. संपूर्ण वचनबद्धता मागणी करते ती म्हणजे स्वतःच्या - कार्यावर अविभाजीत लक्ष देण्यासाठी आणि - संपूर्ण वचनबद्धता मागणी करते ती म्हणजे - ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी. आपल्या जीवनात आपण संपूर्णपणे कुणाशी व कशाशी वचनबद्ध आहोत. देवाशी कि जगाशी ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन जगून तुला अनुसरण्यास  आम्हाला कृपा दे, आमेन.


                    पवित्र आत्म्याचा नोव्हेना प्रार्थना

हे माझ्या परमेश्वरा । पवित्र आत्म्या आम्ही तुला नमन करतो, आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत, । हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो हे पवित्र आत्म्या । महान कैवारी, तू गरीबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त । ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हे पवित्र आत्म्या आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत । तू प्रभू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेन्टेकॉस्टच्या दिवशी अवतरलास । व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस! हे पवित्र आत्म्या त्याच दयेने व दानशूरतेने । त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने । उल्हसित कर. हे पवित्र आत्म्या । आमचे अंत:करण । तुझ्या शुध्द प्रेमाने भर । विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक आम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाने भर । परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे । म्हणून पवित्र आशा-आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे । नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. । आमेन!

आमच्या स्वर्गीय बापा व तीन नमो मरिया
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या