Marathi Bible Reading | 7th Week of Easter Friday 17th May 2024

पुनरुत्थान सातवा  सप्ताह  

शुक्रवार  दि. १७ मे  २०२४ 

योहानच्या पुत्रा शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?""Simon, son of John, do you love me more than these!"

✝️



 संत पास्काल बेलॉन
-वर्तनसाक्षी (१५४०-१५९२)
स्पेनमध्ये पेन्टेकॉस्ट या दिवसाला पवित्र आत्म्याचा “पास्का " असे म्हणतात. त्याच दिवशी जन्म झाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या मुलाला पास्काल असे नाव देण्यात आले. त्याला अगदी बालपणापासून पवित्र मिस्साविषयी विलक्षण आदर वाटत असे..
वयाच्या २२ व्या वर्षी तो अल्कान्ताराच्या सुधारणावादी परंतु अत्यंत शिस्तप्रिय संस्थेमध्ये प्रापंचिक धर्मबंधू म्हणून शिक्षण घेऊ लागला. या संस्थेच्या स्पेनमधील विविध शाखांमध्ये त्याने नम्रपणे द्वारपालक म्हणून काम केले. गोरगरीब व अभागी बंधुभगिनी ह्यांच्याविषयी त्याच्या मनात कमालीची कळकळ होती.
अतिपवित्र साक्रामेंतासमोर तो बऱ्याचदा तासन्तास बसलेला आढळत असे. कधीकधी तो साक्षात्कारी अवस्थेत दंग असलेला दिसून येई. अशाच अवस्थेमध्ये त्याला धर्माविषयीच्या चिरंतन सत्याचे अगाध ज्ञान प्राप्त होई. त्याचे शिक्षण अल्प असले तरी आध्यात्मिकतेमध्ये तो पुरेपूर मुरलेला होता. त्यामुळे त्याच्या समकालीन तज्ज्ञांबरोबर तो सारख्याच पातळीवर आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करीत असे. त्याचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी सर्व थरांतील लोक त्याच्याकडे येत.
जीवनात येणारी संकटे, दु:खे, आजार, अपयश, निराशा आणि गोंधळात टाकणारी स्थिती ह्यामुळे माणसे अस्वस्थ बनतात. बाह्य जगात  चाललेला भ्रष्टाचार, दहशत, अन्याय व अत्याचार ह्यांमुळे माणसे भयभीत  झालेली आपण पाहतो. जीवनातील अशी अस्वस्थता, भीती अनिश्चितता  ह्यांमुळे आपण चिंताग्रस्त बनतो.
.
आज प्रभू येशूच्या नावाने ख्रिस्ती स्नानसंस्कार स्वीकारलेल्या प्रत्येकाला प्रभू विचारीत आहे. 'तू माझ्यावर प्रीति करतोस काय ?' कारण देवाची आज्ञा आहे, "तू  आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर" (मत्तय २२:३७). देवाने आपल्याला त्याच्या आपल्यावरील प्रीतिमुळे  निर्माण केले आहे, म्हणून देवावर आपण प्रीति करणे योग्य आहे. परंतु त्याचबरोबर, प्रभू येशू ख्रिस्ताने दुसरी आज्ञा देऊन म्हटले की, "तू आपल्या शेजाऱ्यावर  स्वतः सारखी प्रीति कर" (मत्तय २ २:३९).
श्रद्धावंतांची आध्यात्मिक काळजी घेण्याची जबाबदारी धर्मगुरु, धर्मबंधू व  धर्मभगिनींवर आहे, त्याचप्रमाणे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची व त्यांना दयाळू व प्रेमळ पित्याजवळ आणण्याची जबाबदारी प्रत्येक ख्रिस्ती माणसाची आहे. ख्रिस्ताचे अनुकरण करून त्याची सुवार्ता पसरविण्याच्या पवित्र कार्यासाठी  सर्वांना सामर्थ्य, धैर्य व कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
  
पहिले वाचन  प्रेषितांचे कृत्ये २५:१३-२१
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
   "मृत झालेला येशू जिवंत आहे असे पौल म्हणतो. "

अग्रिप्पा राजा आणि बर्णीका ही दोघे कैसरियास येऊन फेस्ताला भेटली. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्सने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे. मी येरुशलेममध्ये गेलो होतो तेव्हा त्याच्यावर यहुद्यांच्या मुख्य याजकांनी आणि वडिलांनी फिर्याद करून त्याच्याविरूद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी आणि वादी हे समोरासमोरयेऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरिता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही. ह्यास्तव येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणावयाचा हुकूम केला. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्याबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही; केवळ त्यांच्या धर्माविषयी आणि जो जिवंत आहे म्हणून पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी ह्याचा आणि त्यांचा वाद होता. तेव्हा ह्याची चौकशी कशी चालवावी हे मला सुचेनासे झाल्यामुळे मी त्याला विचारले, येरुशलेममध्ये जाऊन तेथे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? तेव्हा बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ह्याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे."
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 25:13b-21
In those days: Agrippa the king and Bernice arrived at Caesarea and greeted Festus. And as they stayed there many days, Festus laid Paul's case before the king, saying, "There is a man left prisoner by felix, and when I was at Jerusalem, the chief priests and the elders of the Jews laid out their case against him, asking for a sentence of condemnation against him. I answered them that it was not the custom of the Romans to give up anyone before the accused met the accusers face to face and had opportunity to make his defence concerning the charge laid against him. So when they came together here, I made no delay, but on the next day took my seat on the tribunal and ordered the man to be brought. When the accusers stood up, they brought no charge in his case of such evils as I supposed. Rather they had certain points of dispute with him about their own religion and about a certain Jesus, who was dead, but whom Paul asserted to be alive. Being at a loss how to investigate these questions, I asked whether he wanted to go to Jerusalem and be tried there regarding them. But when Paul had appealed to be kept in custody for the decision of the emperor I ordered him to be held until I could send him to Caesar."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १०३:१-२,११-१२,१९-२०
प्रतिसाद :  परमेश्वराने आपले सिंहासन आकाशात स्थापले आहे.

१) हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,
हे माझ्या सर्व अंतर्यामा,त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर.
 हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,
त्याचे सर्व उपकार विसरू नको.

२) कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश फार उंच आहे, 
तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. 
पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,
 तितके त्याने आमचे अपराध आम्हांपासून दूर केले आहेत.

३) परमेश्वराने आपले सिंहासन आकाशात स्थापले आहे. 
त्याचे राज्य सर्वांवर आहे. अहो परमेश्वराच्या दिव्यदूतांनो, 
जे तुम्ही बलसंपत्र आहा आणि
 त्याचे आज्ञावचन ऐकून त्याप्रमाणे करता, 
ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा.


Psalm 103:1-2, 11-12, 19-20ab
The Lord has fixed his throne in heaven.

Bless the Lord, O my soul
and all within me, his holy name. 
Bless the Lord. O my soul 
and never forget all his benefits.
 
For as the heavens are high above the earth, 
so strong his mercy for those who fear him.
As far as the east is from the west
so far from os does he move our transgressions 

The Lord has fixed his throne in heaven, 
and his kingdom is ruling over all 
Bless the Lord, all you his angels, 
mighty in power, fulfilling his word.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी जात आहे पण पुन्हा तुम्हांकडे येईन आणि तुमची हृदये आनंदाने परिपूर्ण होतील. 
आलेलुया !

Acclamation: 
The Holy Spirit will teach you that I have said to you all things and bring to your remembrance all

शुभवर्तमान   योहान २१:१५-१९
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
         "माझी कोकरे चार, माझी मेंढरे चार. 
न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्रला म्हटले, “योहानच्या पुत्रा शिमोन, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?" तो त्याला म्हणाला “होय, प्रभू, आपणांवर मी प्रेम करतो, हे आपणांला ठाऊक आहे." त्याने त्याला म्हटले, "माझी कोकरे चार." पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, "योहानच्या पुत्रा शिमोन, माझ्यावर प्रीती करतोस काय ?" तो त्याला म्हणाला, "होय प्रभू, मी आपणांवर प्रेम करतो, हे आपणांला ठाऊक आहे." त्याने त्याला म्हटले, "माझी मेंढरे पाळ." तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, “योहानच्या पुत्रा शिमोन, माझ्यावर प्रेम करतोस काय ?" असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, "प्रभू आपणांला सर्व ठाऊक आहे, मी आपणांवर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे." येशूने त्याला म्हटले, "माझी मेंढरे चार. मी तुला सत्य सांगतो. तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास. परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. (तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचविण्याकरिता तो हे बोलला) आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, "माझ्या मागे ये."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:John 21:15-19

When Jesus had revealed himself to his disciples and they had finished breakfast, Jesus said to Simon Peter, "Simon, son of John, do you love me more than these!" He said to him, "Yes, Lord, you know that I love you." He said to him, "Feed my lambs." He said to him a second time, "Simon, son of John, do you love me?" He said to him, "Yes, Lord, you know that I love you." He said to him, "Tend my sheep." He said to him the third time, "Simon, son of John, do you love me?" Peter was grieved because he said to him the third me, "Do you love me?" And he said to him, "Lord, you know everything, you know that I love you." Jesus said to him, "Feed my sheep. Truly, truly, I say to you, when you were young, you used to dress yourself and walk wherever you wanted, but when you are old you will stretch out your hands, and another will dress you and carry you where you do not want to go." (This be said to show by what kind of death he was to glorify God And after saying this he said to him, "Follow me.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू अशांसाठी प्रार्थना करतो की जे शिष्यांद्वार त्यांच्यावर विश्वास ठेवतील. ह्या येशूच्या प्रार्थनेतील तिसऱ्या भागात तो शिष्यांसाठी प्रार्थना करतो की, ते एक व्हावेत. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राबरोबर एक आहे अगदी तशाचप्रकारे. हि प्रभू येशूची आशा आहे की, या एकतेच्या परिणामामुळे जग विश्वास ठेवेल की, पित्याने येशूला पाठवले. तसेच येशू खरोखर कोण आहे हे सर्वांना कळावे आणि त्याला पित्याने पाठवले आहे हे सर्वांनी ओळखावे. ज्याद्वारे येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांवर येशू आणि पित्यामध्ये ऐक्य निर्माण होईल. आपल्या कुटुंबात, गावपरिवारात, समाजात, राज्यात, देशात तसेच संपूर्ण जगात ऐक्य निर्माण करण्यासाठी तसेच भेदभावांच्या भिंती पाडण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले आहेत.

प्रार्थना : हे प्रभू येशू, ख्रिस्तसभेतील सर्व व्रतस्थांना आणि प्रापंचिकांना सुवार्ता प्रसाराचे कार्य करण्यास विशेष कृपा दे, आमेन


                    पवित्र आत्म्याचा नोव्हेना प्रार्थना

हे माझ्या परमेश्वरा । पवित्र आत्म्या आम्ही तुला नमन करतो, आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत, । हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो हे पवित्र आत्म्या । महान कैवारी, तू गरीबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त । ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हे पवित्र आत्म्या आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत । तू प्रभू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेन्टेकॉस्टच्या दिवशी अवतरलास । व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस! हे पवित्र आत्म्या त्याच दयेने व दानशूरतेने । त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने । उल्हसित कर. हे पवित्र आत्म्या । आमचे अंत:करण । तुझ्या शुध्द प्रेमाने भर । विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक आम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाने भर । परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे । म्हणून पवित्र आशा-आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे । नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. । आमेन!

आमच्या स्वर्गीय बापा व तीन नमो मरिया
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या