पुनरुत्थान सातवा सप्ताह
गुरुवार दि. १६ मे २०२४
हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे,that they may all be one, just as you, Father, are in me, and I in you, that they also may be in us,
✝️
संत सायमन स्टॉक वर्तनसाक्षी (११६५-१२६५)
सायमन स्टॉक ह्यांनी कार्मेलाईट संस्थेच्या आचारसंहितेमध्ये देखील अत्यंत मौल्यवान सुधारणा सुचविल्या. १६ जुलै १२५१ रोजी त्यांना पवित्र मरियेने दर्शनदिले आणि तपकिरी रंगाची बेंतीन त्यांना दिली असे म्हटले जाते. ही बेंतीन वापरणाऱ्याचे सार्वकालिक नाशापासून रक्षण होईल असे आश्वासनसुद्धा पवित्र मरियेने संत सायमन स्टॉक ह्या ऋषीतुल्य महापुरूषाला दिलं. तपकिरी रंग हे तपस्वी जीवनाचे प्रतीक मानले जाते (अधिक माहिती कार्मेल माता: सण १६ जुलै मध्ये वाचा).धन्य कुमारी मरियेने सायमन स्टॉक ह्यांना दिलेल्या दर्शनात म्हटलेले होते, कार्मेलाईट संस्थेची जी व्यक्ती या तपकिरी रंगाच्या वेषात मृत्यू पावेल तिला सार्वकालिक जीवन लाभेल.
सायमन स्टॉक ह्यांनी कार्मेलाईट संस्थेच्या आचारसंहितेमध्ये देखील अत्यंत मौल्यवान सुधारणा सुचविल्या. १६ जुलै १२५१ रोजी त्यांना पवित्र मरियेने दर्शनदिले आणि तपकिरी रंगाची बेंतीन त्यांना दिली असे म्हटले जाते. ही बेंतीन वापरणाऱ्याचे सार्वकालिक नाशापासून रक्षण होईल असे आश्वासनसुद्धा पवित्र मरियेने संत सायमन स्टॉक ह्या ऋषीतुल्य महापुरूषाला दिलं. तपकिरी रंग हे तपस्वी जीवनाचे प्रतीक मानले जाते (अधिक माहिती कार्मेल माता: सण १६ जुलै मध्ये वाचा).धन्य कुमारी मरियेने सायमन स्टॉक ह्यांना दिलेल्या दर्शनात म्हटलेले होते, कार्मेलाईट संस्थेची जी व्यक्ती या तपकिरी रंगाच्या वेषात मृत्यू पावेल तिला सार्वकालिक जीवन लाभेल.
आपल्या सर्वांमध्ये द्वेष, मत्सर, स्वार्थ, अहंकार, दुष्टता व पापवासना नसावी तर देवाची प्रीति असावी, देवाचे अस्तित्व असावे. सौम्यता, नम्रता, विश्वासूपणा, चांगुलपणा अशाप्रकारचे दैवी गुण असावेत. विशेषतः ख्रिस्त म्हणतो, “मी त्यांच्यामध्ये असावे”, म्हणजेच आपल्या विचारात, बोलण्यात, कृतीत व सर्वप्रसंगी ख्रिस्त आपल्यामध्ये असावा. आपल्याद्वारे इतरांना ख्रिस्ताचे दर्शन घडावे म्हणून आपण आज विशेष प्रार्थना करू या.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये २२:३०,२३:६-११
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आता तुला रोम शहरात साक्षी द्यावी लागेल."
यहुदी लोकांनी पौलवर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले आणि मुख्य याजक आणि सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले.
तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी आणि एक भाग परुशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, "बंधुजनहो, मी परुशी आणि परुश्याचा पुत्र आहे, आमची आशा आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे." तो हे बोलत आहे तोच परुशी आणि सदुकी ह्यांच्यात भांडण लागून लोकांत फूट पडली. कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत आणि आत्माही नाही, असे सदुकी म्हणतात; परुशी तर ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात. तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे शास्त्री परुश्याच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, "ह्या माणसाच्या ठायी आम्हाला काही वाईट दिसत नाही. जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे ?" असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलला मारुन टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, "खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून बराकीत आणावे."त्याच रात्री प्रभू पौलपुढे उभा राहून म्हणाला, "धार घर जशी तू येरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल."
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 22:30; 23:6-11
In those days: Desiring to know the real reason why Paul was being accused by the Jews, he unbound him and commanded the chief priests and all the Council to meet, and he brought Paul down and set him before them. Now when Paul perceived that one part were Sadducees and the other Pharisees, he cried out in the Council, "Brothers, I am a Pharisee, a son of Pharisees. It is with respect to the hope of the resurrection of the dead that I am on trial." And when he had said this, a dissension arose between the Pharisees and the Sadducees, and the assembly was divided. For the Sadducees say that there is no resurrection, nor angel, nor spirit, but the Pharisees cknowledge them all. Then a great clamour arose, and some of the scribes of the Pharisees party stood up and contended sharply, "We find nothing wrong in this man. What if a spirit or an angel spoke to him?" And when the dissension became violent, the tribune, afraid that Paul would be torn to pieces by them, commanded the soldiers to go down and take him away from among them by force and bring him into the barracks. The following night the Lord stood by him and said, "Take courage, for as you have testified to the facts about me in Jerusalem, so you must testify also in Rome.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १६:१-२,५,७-११
प्रतिसाद : हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
१) हे देवा, माझे रक्षण कर, कारण
मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
परमेश्वर माझ्या वतनाचा आणि
प्याल्याचा वाटा आहे,
माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस.
२) परमेश्वराने मला बोध केला आहे,
त्याला मी धन्यवाद देतो.
माझे अंतर्यामही मला रात्री उपदेश करते.
मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे;
तो माझ्या उजवीकडे आहे,म्हणून मी ढळणार नाही.
३) यास्तव माझे हृदय आनंदित होते,
माझा आत्मा उल्हासतो;
माझा देहही सुरक्षित राहतो.
कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस,
तू आपल्या भक्ताला कुजण्याचा
अनुभव येऊ देणार नाहीस.
४) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील,
तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे,
तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे.
Psalm 16:1-2a & 5,7-11
Preserve me, O God, for in you I take refuge,
Preserve me, O God, for in you I take refuge.
I say to the Lord, "You are my Lord
O Lord, it is you who are my portion and cup;
you yourself who secure my lot.
I will bless the Lord who gives me counsel,
who even at night directs my heart.
I keep the Lord before me always;
with him at my right hand,
I shall not be moved.
And so, my heart rejoices, my soul is glad:
even my flesh shall rest in hope.
For you will not abandon my soul to hell,
nor let your holy one see corruption.
You will show me the path of life,
the fullness of joy in your presence,
at your right hand, bliss forever. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.
आलेलुया !
Acclamation:
May they all be one, just as you, Father, are in me, and I in you, so that the world may believe that you have sent me, says the Lord.
शुभवर्तमान योहान १७:२०-२६
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बापा, त्या सर्वांनी एक होऊन पूर्ण व्हावे."
येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले, "हे पवित्र बापा, मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. तू जो गौरव मला दिला आहे तो मी त्यांना दिला आहे, जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहे तसे त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे. जो माझा गौरव तू मला दिला आहे तो त्यांनी पाहावा; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे नीतिमान बापा, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यांस कळवले आणि कळवीन. ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:John 17:20-26
At that time: Jesus lifted up his eyes to heaven and prayed, saying, "I do not ask for these only, but also for those who will believe in me through their word, that they may all be one, just as you, Father, are in me, and I in you, that they also may be in us, so that the world may believe that you have sent me. The glory that you have given me I have given to them, that they may be one even as we are one, I in them and you in me, that they may become perfectly one, so that the world may know that you sent me and loved them even as you loved me. Father, I desire that they also, whom you have given me, may be with me where I am, to see my glory that you have given me because you loved me before the foundation of the world. O righteous Father, even though the world does not know you, I know you, and these know that you have sent me. I made known to them your name, and I will continue to make it known, that the love with which you have loved me may be in them, and I in them."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू अशांसाठी प्रार्थना करतो की जे शिष्यांद्वार त्यांच्यावर विश्वास ठेवतील. ह्या येशूच्या प्रार्थनेतील तिसऱ्या भागात तो शिष्यांसाठी प्रार्थना करतो की, ते एक व्हावेत. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राबरोबर एक आहे अगदी तशाचप्रकारे. हि प्रभू येशूची आशा आहे की, या एकतेच्या परिणामामुळे जग विश्वास ठेवेल की, पित्याने येशूला पाठवले. तसेच येशू खरोखर कोण आहे हे सर्वांना कळावे आणि त्याला पित्याने पाठवले आहे हे सर्वांनी ओळखावे. ज्याद्वारे येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांवर येशू आणि पित्यामध्ये ऐक्य निर्माण होईल. आपल्या कुटुंबात, गावपरिवारात, समाजात, राज्यात, देशात तसेच संपूर्ण जगात ऐक्य निर्माण करण्यासाठी तसेच भेदभावांच्या भिंती पाडण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले आहेत.
प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, आमची प्रत्येक कृती तुझ्या परिपूर्ण प्रेमाची साक्ष असावी व आम्हाद्वारे तूच प्रतिबिंबीत व्हावास म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन
पवित्र आत्म्याचा नोव्हेना प्रार्थना
हे माझ्या परमेश्वरा । पवित्र आत्म्या आम्ही तुला नमन करतो, आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत, । हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो हे पवित्र आत्म्या । महान कैवारी, तू गरीबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वनकर्ता आहेस आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त । ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही हे पवित्र आत्म्या आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत । तू प्रभू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेन्टेकॉस्टच्या दिवशी अवतरलास । व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस! हे पवित्र आत्म्या त्याच दयेने व दानशूरतेने । त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने । उल्हसित कर. हे पवित्र आत्म्या । आमचे अंत:करण । तुझ्या शुध्द प्रेमाने भर । विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक आम्हाला प्रभू येशूच्या प्रेमाने भर । परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे । म्हणून पवित्र आशा-आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे । नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. । आमेन!
आमच्या स्वर्गीय बापा व तीन नमो मरिया
✝️
0 टिप्पण्या