सामान्यकाळातील सातवा सप्ताह
मंगळवार दि. २१ मे २०२४
"जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो
'Anyone who welcomes a little child such as this in my name, welcomes me;
आजच्या शुभवर्तमानात त्रमतेचे उदाहरण देतांना प्रभू येशू ख्रिस्त एका लहान बालकाला जवळ करतो. बालक हे नेहमीच आपल्या आईवडिलांच्या व नम्रतेचे जीवन जगणे सोपे नेही त्यासाठी आपल्याठायी धैर्य व वडिलधाऱ्यांच्या आज्ञेत राहते. ते निरागस व निष्पाप असते. अनुकरण करणारे असते. म्हणून प्रभू येशू लहान बालकाला स्वीकारुन त्याचे अनुकरण करण्यास सांगत आहे. जो पर्यंत आपण आपल्यातील अहंकार, गर्विष्ठपणा आणि पापी स्वभाव बदलत नाही तोपर्यंत आपण ख्रिस्ताचे खरे अनुयायी बनू शकत नाही. ख्रिस्ताला स्वीकारणे म्हणजे त्याचे अनुकरण करुन नम्रतेचे व त्यागाचे जीवन जगणे. आत्मबलिदान करण्याची तयारी असावी लागते. जीवन जगण्यासाठी चिकाटी आणि एकाग्रता असावी लागते. आज आपण लहान बाळकांचे निरीक्षण करुन त्यांचे चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करु या.
पहिले वाचन : याकोबचे पत्र ४:१-१०
वाचक : याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन"तुम्ही मागता पण तुम्हांला मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता."
तुम्हांमध्ये लढाया आणि भांडणे कशातून उत्पन्न होतात ? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही ? तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हांला प्राप्त होत नाही, तुम्ही घात आणि हेवा करता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही; तुम्ही भांडता आणि लढता. तुम्ही मागत नाही, म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजेच आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय ? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. जो आत्मा आपल्या ठायी वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हांला वाटते काय ? तो अधिक कृपा करतो. म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीन लोकांवर कृपा करतो." म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक होवो आणि तुमच्या आनंदाचा विषाद होवो. प्रभूसमोर नम्न व्हा, म्हणजे तो तुम्हांला उच्च करील.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
James 4:1-10
Where do these wars and battles between yourselves first start? Is it not precisely in the desires fighting inside your own selves? You want something and you lack it, so you kill. You have an ambition that you cannot satisfy; so you fight to get your way by force. It is because you do not pray that you do not receive; when you do pray and do not receive, it is because you prayed wrongly, wanting to indulge your passions. Adulterers! Do you not realise that love for the world is hatred for God? Anyone who chooses the world for a friend is constituted an enemy of God. Can you not see the point of the saying in scripture, The longing of the spirit he sent to dwell in us is a jealous longing.? But he has given us an even greater grace, as scripture says: God opposes the proud but he accords his favour to the humble. Give in to God, then; resist the devil, and he will run away from you. The nearer you go to God, the nearer God will come to you. Clean your hands, you sinners, and clear your minds, you waverers. Appreciate your wretchedness, and weep for it in misery. Your laughter must be turned to grief, your happiness to gloom. Humble yourselves before the Lord and he will lift you up.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र स्तोत्र ५५:७-८,९-१०अ,१०ब-११अ, २३
प्रतिसाद : तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठीराखा होईल.
१ मी म्हटले, मला पारव्यासारखे पंख असते
तर मी उडून जाऊन हवेत तरंगलो असतो.
पाहा, मी दूर निघून गेलो असतो
आणि रानात वस्ती केली असती.
२ प्रंचड वायू आणि वादळ ह्यांच्यापासून
आसरा मिळवण्याची मी त्वरा केली असती.
हे प्रभो, त्यांचा विध्वंस कर, त्यांच्या भाषेचा गोधळ कर.
३ कारण मी नगरात जुलूम आणि कलह पाहिले आहेत.
अहोरात्र त्यांच्या कोटावर ते सभोवताली फिरतात.
४ तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे
तो तुझा पाठीराखा होईल.
नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही.
Psalm 55:7-8, 9-10a, 10b-11, 23
Entrust your cares to the Lord, and he will support you.
I would fly far away and make my home in the desert.
I would quickly find myself a shelter from
the raging wind and the storm.
Confuse the speech of my enemies, O Lord!
I see violence and riots in the city,
surrounding it day and night,
filling it with crime and trouble.
There is destruction everywhere;
the streets are full of oppression and fraud.
But you, O God, will bring those murderers
and liars to their graves before half their life is over.
As for me, I will trust in you.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही आपली मने कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
आलेलुया !
Acclamation:
harden not your heart, bur hear the voice of the lord .
शुभवर्तमान मार्क ९:३०-३६
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मनुष्यांचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला झाले पाहिजे."
येशू आणि त्याचे शिष्य गालिलमधून चालले होते आणि हे कोणाला कळू नये, अशी त्याची इच्छा होती. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता; "मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे, ते त्याला जिवे मारतील आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल." परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याला विचारण्यास ते भ्याले.
पुढे ते कफर्णहूमला आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, "तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता ?" ते गप्प राहिले, कारण सर्वांत मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. त्याने बसून त्या बारा जणांना बोलावून म्हटले, "जर कोण पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे." मग त्याने एक बालक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले आणि त्याला कवटाळून तो त्यांना म्हणाला, "जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो."
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mark 9:30-37
After leaving that place they made their way through Galilee; and he did not want anyone to know, because he was instructing his disciples; he was telling them, The Son of man will be delivered into the power of men; they will put him to death; and three days after he has been put to death he will rise again. But they did not understand what he said and were afraid to ask him. They came to Capernaum, and when he got into the house he asked them, "What were you arguing about on the road?" They said nothing, because on the road they had been arguing which of them was the greatest. So he sat down, called the Twelve to him and said, 'If anyone wants to be first, he must make himself last of all and servant of all. He then took a little child whom he set among them and embraced, and he said to them, 'Anyone who welcomes a little child such as this in my name, welcomes me; and anyone who welcomes me, welcomes not me but the one who sent me.'
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू शिष्यांस आपल्या मरणाची भविष्यवाणी करतो. मात्रयेशूचे हे बोलणे शिष्यांना समजले नाही आणि ते त्याला प्रश्न विचारण्यास भयभित झाले होते. आणि पुढे तो त्यांना शिकवतो की, सर्वात मोठा किंवा महान हा नाही की, ज्याच्याकडे सर्वात जास्त सामर्थ्य आहे किंवा दर्जा आहे. परंतू तो जो सर्वात लहान आहे तो. सर्वांचा सेवक होय आणि ह्याचे उदाहरण म्हणून तो लहान बालकांचे उदाहरण देतो. जो शिष्य ह्या ज्या समाजातील सर्वात खालच्या आणि सर्वात असुरक्षित स्तरावरील लोकांचा सेवक होतो. तोच सर्वात महान, मोठा आहे. आपल्या समाजातील असुरक्षित स्तरावरील लोकांची सेवा करण्याचा आपण प्रयत्न करतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्यासारखे नम्र हृदय मजला लाभावे म्हणून माझ्यातील अहंकार व गर्विष्ठपणा काढून टाक आणि माझे जीवन परिवर्तन कर, आमेन.
✝️
0 टिप्पण्या