सामान्यकाळातील सातवा सप्ताह
बुधवार दि. २२ मे २०२४
“जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे."
"Do not stop him, for no one who does a mighty work in my name ......... "
कॅसियाची संत रिटा
-विधवा (१३८६-१४५६)
संत याकोब स्पष्टपणे आपल्या परस्परातील भांडणा संबंधाने पश्चात्ताप करुन देवाच्या अधीन होण्याचा सल्ला देत आहे. त्यासाठी नम्रता, संयम, समेट व परस्पर स्नेहभाव वाढीस लागला पाहिजे.
देव त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करीत असतो. एखादा माणूस कदाचित ख्रिस्ताचा अनुयायी नसेल किंवा शिष्यांपैकी नसेल तरी सुद्धा देव रहस्यमयरित्या त्याच्याद्वारे कार्य करु शकतो. देवाला जे योग्य वाटतात त्यांना निवडून कार्याला लावण्यासाठी देव स्वतंत्र आहे. जगात ख्रिस्ताच्या नावाने प्रामाणिकपणे आणि आत्मियतेने सुवार्ता कार्य करणारी अनेक माणसे आहेत. त्यांच्याद्वारे आजही अनेकांना आरोग्यदान व मुक्ती मिळत आहे. त्यांच्या मध्यस्थीने आणि मार्गदर्शनाने अनेकांच्या जीवनाचे परिवर्तन झाले आहे. अशा सर्व सुवार्तिकांसाठी आज आपण विशेष प्रार्थना करु या.
धर्मशिक्षणाची, व सुवार्ता प्रसाराची मक्तेदारी केवळ आपल्याकडेच आहे असा गैरसमज असलेल्या धार्मिक नेत्यानी आजच्या वचनांवर सखोल चिंतन करावे. बाप्तिस्मा स्वीकारलेल्या सर्वांना प्रभू येशू त्याच्या सुवार्ता प्रसाराचे कार्य करण्यास बोलावित आहे.
✝️
पहिले वाचन याकोब ४:१३-१७
वाचक :याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन
“जर प्रभूची इच्छा असेल तर तुम्हांला उद्याचे समजत नाही असे म्हणा.'
अहो ! जे तुम्ही म्हणता, “आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू", पण तुम्हांला उद्याचे समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहा. ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता, “प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि अमुक करू," असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहा म्हणून फुशारकी मारता. अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याला ते पाप आहे.
First Reading :
James 4:13-17
Beloved: Come now, you who say. "Today or tomorrow we will go into such and such a town and spend a year there and trade and make a profit - yet you do not know what tomorrow will bring. What is your life? For you are a mist that appears for a little time and then vanishes. Instead you ought to say, "If the Lord wills, we will live and do this or that." As it is, you boast in your arrogance. All such boasting is evil. So whoever knows the right thing to do and fails to do it, for him it is sin.
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ४९ : २-३,६-११
प्रतिसाद : जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
१) अहो सर्व लोकहो, हे ऐका;
जगात राहणारे उच्च
आणि नीच, श्रीमंत आणि दरिद्री लोकहो,
तुम्ही सर्व कान द्या.
२) मला फसवणाऱ्यांचा दुष्टपणा मला वेढतो.
अशा विपत्काली मी का भ्यावे ?
ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात
आणि आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात.
३ ) कोणाही मनुष्याला स्वतःला मुक्त करता येत नाही,
किंवा आपल्या जिवाबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.
त्याच्या जिवाची खंडणी त्याच्या मर्यादेपलीकडे आहे.
तो आपला जीव कधीच विकत घेऊ शकत नाही,
किंवा गर्तेचा अनुभव टाळू शकत नाही.
४) तो पाहतो की, ज्ञानी मरतात, तसेच
मूढ आणि पशूतुल्य नष्ट होतात आणि
आपले धन दुसऱ्यांना ठेवून जातात.
Psalm 49:2-3, 6-7, 8-10, 11
R. Blessed are the poor in spirit, for theirs is the kingdom of heaven.
Hear this, all you peoples,
give ear, all who dwell in the world,
people both high and low,
rich and poor alike! R
Why should I fear in evil days
the malice of the foes who surround me,
those who trust in their wealth,
and boast of the vastness of their riches? R
No man can ransom a brother,
nor pay a price to God for his life.
How high is the price of his soul!
The ransom can never be enough!
No one can buy life unending,
nor avoid coming to the grave. R
Anyone sees that the wise will die;
the foolish will perish with the senseless,
and leave their wealth to others. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या धर्मशास्त्रातील अलौकिक गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया !
Acclamation:
I am the way, and the truth, and the life, says the Lord; no one comes to the Father except through me.
शुभवर्तमान मार्क ९:३८-४०
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. "
योहान येशूला म्हणाला, "गुरुजी आपला अनुयायी नसलेल्या कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता," पण येशू म्हणाला, "त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने महकृत्ये करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:Mark 9:38-40
At that time: John said to Jesus, "Teacher, we saw someone casting out demons in your name, and we tried to stop him, because he was not following us." But Jesus said, "Do not stop him, for no one who does a mighty work in my name will be able soon afterwards to speak evil of me. For the one who is not against us is for us.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: जो कोणी आपल्या विरूद्ध नाही तो आपल्यासाठी आहे. येशू आता आपल्या शिष्यांना सहिष्णुतेचा धडा शिकवतो आणि हा धडा खुप महत्वाचा आहे. कारण सहिष्णुतेचा अनेकदा गैरसमज होतो. काहीकांना वाटते की, सर्वप्रकारच्या लोकांना स्वीकारले पाहिजे. मग त्यांचा विश्वास आणि त्यांचे वागणे कुठल्या हि प्रकारचे असो. तसेच इतरांना वाटते की, श्रद्धा आणि वर्तन महत्वाचे आहे. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीची श्रद्धा आणि वागणूक इतरांच्या कल्याणासाठी हाणीकारक असेल अशा व्यक्तीला स्विकारू नये. म्हणून योहानाने त्या व्यक्तीला जो त्यांच्या गटातला नव्हता त्याला येशूचे कार्य करण्यासाठी नकार दिला. मात्र येशू म्हणतो जो कोणी आपल्याविरुद्ध नाही तो आपल्यासाठी आहे. आपल्या खिस्तसभेत जेव्हा लोक अशाचप्रकारचे कठिण कार्य हाती घेतात आणि त्यांच्या वागणूकीमुळे आपण त्यांचा नकार करून त्यांच्या कार्यात अडथळा आणतो का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी सुवार्ता आत्मसात करुन ती इतरांपर्यंत पोहोचविता यावी । ह्यासाठी मला प्रेरणा व पवित्र आत्म्याचे सामर्थ्य दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या