सामान्य काळातील सोळावा रविवार
२१ जुलै २०२४
ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला
he had compassion on them, because they were like sheep without a shepherd.
✝️
"येशूला लोकांचा कळवळा आला."
बहकलेल्या सर्व मेंढरांना जसा मेंढपाळ एकत्र करतो, तसे परमेश्वर इस्त्राएलच्या बहकून भरकटलेल्या लोकांना परत एकत्र आणीत , असे
प्रभू येशूची देवराज्याची शिकवण आणि केलेले अनेक चमत्कार यामुळे लोकांना दिलासा मिळाला होता. प्रभू येशू जाईल तेथे लोक त्याचा शोध करीत फिरत होते. प्रभू येशूला विश्रांती घ्यायची होती, मात्र मोठा जनसमुदाय त्याच्या जवळ गोळा झाला. प्रभूने बहकलेल्यांना एकत्र केले, त्यांना बंधनातून मुक्त केले व देवराज्याची शिकवण दिली.
आजसुद्धा प्रभू येशू आपला सर्वांचा मेंढपाळ आपल्याला देवपित्याचा मार्ग दाखवितो, देवाच्या जीवनदायी मळ्यात राखून ठेवतो. आपला सांभाळ करतो, आपल्यावर अनेक कृपादानाचा वर्षाव करीत असतो. प्रभू येशूला| आपल्या सर्वांचा कळवळा येतो. प्रभू कनवाळू व दयाळू आहे. आपल्या सर्व समस्या, आजार, संकटे व दुःखे ह्यातून मुक्ती देणारा असा आपला प्रभू आहे.
प्रभू येशू आपल्या सर्व समस्यांचे उत्तर आहे. श्रद्धेने आपण प्रभूच्या वचनावर चिंतन करु या. त्याची वचने व आज्ञा पाळून त्याचा तारणदायी स्पर्श अनुभवू या..
✝️
पहिले वाचन : यिर्मया २३:१-६
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
" मी माझ्या कळपाचा अवशेष जमा करीन आणि त्यांस त्यांच्या मेढवाड्यात परत आणीन."
"जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कळपाचा नाश करतात आणि त्यांना विखरतात ते हाय हाय करतील." माझ्या लोकांना चारणाऱ्या मेंढपाळांविषयी इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो: “तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना हाकून लावले आहे, त्याचा समाचार घेतला नाही. पाहा, मी तुमच्या कर्माचा अनिष्ट परिणाम तुम्हांवर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो. ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला त्या त्या देशांतून मी त्यांचा अवशेष जमा करीन आणि त्यांना त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, ते त्यांना चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत.
“पाहा, परमेश्वर म्हणतो, मी दावीदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात धर्मन्याय करील, असे दिवस येत आहेत. त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल आणि 'परमेश्वर आमची धार्मिकता.' " हे नाव त्याला देतील
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Jeremiah 23:1-6
"Woe to the shepherds who destroy and scatter the sheep of my pasture!" declares the LORD. Therefore thus says the LORD, the God of Israel, concerning the shepherds who care for my people: "You have scattered my flock and have driven them away, and you have not attended to them. Behold, I will attend to you for your evil deeds, declares the LORD. Then I will gather the remnant of my flock out of all the countries where I have driven them, and I will bring them back to their fold, and they shall be fruitful and multiply. I will set shepherds over them who will care for them, and they shall fear no more, nor be dismayed, neither shall any be missing, declares the LORD. "Behold, the days are coming, declares the LORD, when I will raise up for David a righteous Branch, and he shall reign as king and deal wisely, and shall execute justice and righteousness in the land. In his days Judah will be saved, and Israel will dwell securely. And this is the name by which he will - be called: 'The LORD is our righteousness.'
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र २३:१- ६
प्रतिसाद : “परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; .”
१) परमेश्वर माझा मेंढपाळ आहे;
मला काही उणे पडणार नाही.
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो,
तो मला संथ पाण्यावर नेतो,
तो माझा जीव ताजातवाना करतो.
२ )तो आपल्या नामासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो.
मृत्यूच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो
तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही
कारण तू माझ्याबरोबर आहेस;
३) तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.
तू माझ्या शत्रूंच्या देखत
माझ्यापुढे ताट वाढतोस;
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस;
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.
४) खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला
कल्याण आणि दया ही लाभतील आणि
परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.
Psalm 23:1-3a, 3bc-4, 5, 6 (1)
The Lord is my shepherd; there is nothing I shall want.
The Lord is my shepherd; there is nothing I shall want.
Fresh and green are the pastures where he gives me repose.
Near restful waters he leads me; he revives my soul. R.
He guides me along the right path,
for the sake of his name.
Though I should walk in the valley of the shadow of death,
no evil would I fear, for you are with me.
Your crook and your staff will give me comfort. R
You have prepared a table before me in the sight of my foes.
My head you have anointed with oil;
my cup is overflowing. R.
Surely goodness and mercy shall follow me
all the days of my life.
In the Lord's own house shall I dwell
for length of days unending. R.
दुसरे वाचन इफिसकरांस पत्र २:१३-१८
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त आपली मूर्तिमंत शांती आहे; त्याने दोघांना एक केले. "
परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहा. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे; त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडली; त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र; ह्यासाठी स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्यांचे एक शरीर करून आपण क्रुसावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हांला शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. कारण त्यांच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद..
Second reading : Ephesians 2:13-18
Brethren: Now in Christ Jesus you who once were far off have been brought near by the blood of Christ. For he himself is our peace, who has made us both one and has broken down in his flesh the dividing wall of hostility by abolishing the law of commandments expressed in ordinances, that he might create in himself one new man in place of the two, so making peace, and might reconcile us both to God in one body through the cross, thereby killing the hostility. And he came and preached peace to you who were far off and peace to those who were near. For through him we both have access in one Spirit to the Father
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे; सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत
Acclamation:
My sheep hear my voice, says the Lord; and I know them, and they follow me.
शुभवर्तमान मार्क ६:३०-३४
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. "
प्रेषित येशूजवळ जमा झाले आणि आपण जे जे केले आणि जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या.” कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवावयासदेखील सवड होईना. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांती गेले. लोकांनी त्यांना निघताना पाहिले आणि पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला, ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: Mark 6:30-34
At that time: The apostles returned to Jesus and told him all that they had done and taught. And he said to them, "Come away by yourselves to a desolate place and rest a while." For many were coming and going, and they had no leisure even to eat. And they went away in the boat to a desolate place by themselves. Now many saw them going and recognized them, and they ran there on foot from all the towns and got there ahead of them. When he went ashore he saw a great crowd, and he had compassion on them, because they were like sheep without a shepherd. And he began to teach them many things.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: "येशू एक मेंढपाळ"
प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे. देवाबरोबर थोडा वेळ का असेना, एकांताची गरज आहे. प्रेषित आपल्या प्रेषितीय कार्यावरून परत आल्यानंतर येशूला त्यांनी जे जे केले त्याचा अहवाल दिला. हे जग सोडून जाण्याअगोदर आपले शिष्य किती आज्ञाधारक व वचनबद्ध आहेत, हे ख्रिस्ताला पाहायचे होते. येशू लोक समुदायास पाहातो व त्याला त्यांचा कळवळा येतो. येशूने त्यांना रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. येशूकडे येणाऱ्या कोणालाच तो रिकामा पाठवत नाही. येशू लोकसमुदाय पाहतो. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते. म्हणजे काय ? मेंढपाळ नसलेली मेंढरे हे नुसते भटकतअसतात, त्यांना ठाऊक नसते कुठे जायचे ते.
येशू आपला मेंढपाळ, त्याच्याशिवाय आपण हरवलेले. तोच आपला मार्ग आहे. मेंढपाळ नसलेले मेंढरे हे उपाशी राहतात. मेंढपाळत्यांना हिरव्या कुरणात नेतो. येशू आपला मेंढपाळ ! त्यांच्याशिवाय आपला आत्मा उपाशी ! तोच जीवनाची भाकर आहे. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांना सर्व प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावे लागते. पण मेंढपाळ त्यांचे रक्षण तो. येशू आपला मेंढपाळ, तो सर्व सैतानी धोक्यापासून आपले रक्षण करतो. येशू उत्तम मेंढपाळ, त्याच्या कळपातले आपण विश्वासू मेंढरे राहावे हे हिताचे आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या प्रभो, आम्ही बहकलो असताना तू आम्हाला जवळ आणतोस, आम्हावर दया कर, आमेन
✝️
0 टिप्पण्या