सामान्य काळातील सोळावा आठवडा
सोमवार २२ जुलै २०२४
“त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.”"They have taken away my Lord, and do not know where they have laid him."
गालील समुद्राच्या किनारी तिबिर्याच्या जवळ माग्दाला नावाचे गाव वसलेले होते. त्या गावाच्या नावावरून मरिया हिला माग्दालेन हे आडनाव मिळाले असावे. प्राचीन ख्रिस्त सभेतील एका रूढ परंपरेनुसार पापी स्त्री-मरिया ही बेथानी येथल्या लाझरस व मार्थाची बहीण मरिया किंवा मरिया माग्दालिया असावी असे मानले जाते. ह्याच मरियेमधून आपल्या प्रभू येशूने सात भूते (सात भयानक पापप्रवृती किंवा सर्व प्रकारच्या विकृती) काढलेली होती. ह्या पापी स्त्रीने येशूला तैलाभ्यंग केला होता.
नव्या करारातील शुभवर्तमानात मरिया माग्दालिया म्हणजे नक्की कोणती स्त्री ह्याविषयी अपुरी माहिती असल्यामुळे पौर्वात्य ख्रिस्तसभेत तीन वेगवेगळ्या मरिया नामक स्त्रियांचा सन्मान केला जातो. मरिया माग्दालिया, बेथानीची मरिया आणि पापी स्त्री- मरिया. संत योहान लिखित शुभवर्तमानानुसार येशूच्या चरणांना तैलाभिषेक करणारी पापी स्त्री ही मार्थाची बहीण, बेथानी येथली मरिया असावी. एकदा येशू तिच्या घरी आलेला असताना मार्था बऱ्याच गोष्टींविषयी दगदग व काळजी करीत होती. परंतु मरिया मात्र प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे म्हणणे ऐकत होती.
मरिया माग्दालिया ही प्रभू येशूच्या क्रुसाजवळ उभी राहिली होती. तिने येशूचे दु:खसहन, मरण, थडग्यात पुरणे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले होते. येशूच्या पुनरुत्थानाची ती प्रथम साक्षीदार होती. कॅथलिक ख्रिस्तसभेने तिला चिंतनशील स्त्रियांचा आदर्श म्हणून गौरविलेले आहे. संत मेरी माग्दालेन एफसस येथे मरण पावली असावी. मात्र एका प्राचीन दंतकथेनुसार मार्था, मरिया व लाझरस ह्या तिघांनी फ्रान्सच्या दक्षिणेकडील भागात सुवार्ताप्रसार केला असे मानले जाते.
पहिले वाचन :शलमोनाच्या गीतरत्न ३:१-४
वाचक : शलमोनाच्या गीतरत्नातून घेतलेले वाचन "माझा प्राणप्रिय मला भेटला. "
वधू म्हणते : रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली. मी त्याला चोहोकडे पाहिले, पण तो मला आढळला नाही. माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठांतून आणि गल्ल्यांतून करावा. मी त्याचा शोध केला पण तो मला आढळला नाही. नगरात फिरणारे गस्तवाले मला भेटले, मी त्यांना विचारले, "माझा प्राणप्रिय तुम्हांला कोठे आढळला काय ?" त्यांना सोडून मी अंमळ पुढे जाते तो माझा प्राणप्रिय मला भेटला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
पर्यायी पहिले वाचन
वाचन : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले
वाचन ५ : १४-१७
"जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्टया ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही.'
ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वासाठी मेला तर सर्व मेले आणि तो सर्वासाठी ह्याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला आणि पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्टया ओळखत नाही आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्टया ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पाहा, ते नवे झाले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Song of Solomon 3:1-4ab (Or: 2 Corinthians 5:14-17)
The bride responds: On my bed by night I sought him whom my soul loves; I sought him, but found him not. I will rise now and go about the city, in the streets and in the squares; I will seek him whom my soul loves. I sought him, but found him not. The watchmen found me as they went about in the city. "Have you seen him whom my soul loves? Scarcely had I passed them when I found him whom my soul loves.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :६३ : २-६,८-९
प्रतिसाद : प्रभो, माझ्या देवा, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे.
१) हे देवा, तू माझा देव आहेस,
मी आस्थेने तुझा शोध करीन.
शुष्क रुक्ष आणि निर्मल प्रदेशात
जीवन तुझ्यासाठी तहानलेले आहे,
माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.
२) अशा प्रकारे तुझे बळ आणि वैभव
पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे.
तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे,
माझे ओठ तुझे स्तवन करतील.
३) मी जिवंत आहे तोपर्यंत तुला असाच धन्यवाद देईन,
तुझ्या नामाने मी आपले हात उभारीन.
मज्जेने आणि मेदाने व्हावा तसा
माझा जीव तृप्त होईल आणि
माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.
४) कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस,
म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत
मी आनंद करीन. मी तुझी कास धरली आहे,
तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो.
Psalm 63:2, 3-4, 5-6, 8-9
For you my soul is thirsting, O Lord, my
O God, you are my at dawn I seek you;
God; for you my soul is thirsting.
For you my flesh is pining,
like a dry, weary land without water. R
I have come before you in the sanctuary,
to behold your strength and your glory.
Your loving mercy is better than life;
my lips will speak your praise. R
I will bless you all my life;
in your name I will lift up my hands.
My soul shall be filled as with a banquet;
with joyful lips, my mouths hall praise you. R
For you have been my strength;
in the shadow of your wings I rejoice.
My soul clings fast to you;
your right hand upholds me.R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
मरिया आम्हांस सांग, तू वाटेत काय पाहिलेस ?
जिवंताला बंदिस्त करणारे थडगे आणि
पुनरुत्थित ख्रिस्ताचे वैभव मी पाहिले,
आलेलुया!
Acclamation:
Tell us Mary, what did you see on the way? I saw the glory of the risen Christ, I saw his empty tomb.
शुभवर्तमान योहान २०:१-२,११-१८
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बाई, का रडतेस ? कोणाचा शोध करतेस?"
आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया माग्दालेना कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र आणि ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, "त्यांनी प्रभूला कबरेतून नेले आणि त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही."
मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ, बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, “बाई, का रडतेस ?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.” असे बोलून ती पाठमोरी फिरली, तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, "बाई, का रडतेस ? कोणाचा शोध करतेस ?" तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” येशूने तिला म्हटले, “मरिये.” ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, "रब्बूनी !” (म्हणजे गुरुजी). येशूने तिला म्हटले, "मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” मरिया माग्दालेना गेली आणि “आपण प्रभूला पाहिल्याचे" व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांस कळवले.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 20:1-2, 11-18:
Now on the first day of the week Mary Magdalene came to thetomb early, while it was still dark, and saw that the stone had been taken away from the tomb. So she ran, and went to Simon Peter and the other disciple, the one whom Jesus loved, and said to them, "They have taken the Lord out of the tomb, and we do not know where they have laid him." But Mary stood weeping outside the tomb, and as she wept she stooped to look into the tomb. And she saw two angels in white, sitting where the body of Jesus had lain, one at the head and one at the feet. They said to her, "Woman, why are you weeping?" She said to them, "They have taken away my Lord, and do not know where they have laid him." Having said this, she turned round and saw Jesus standing, but she did not know that was Jesus. Jesus said to her, "Woman, why are you weeping? Whom are you seeking?" Supposing him to be the gardener, she said to him, "Sir, if you have carried him away, tell me where you have laid him, and will take him away." Jesus said to her, "Mary." She turned and said to him in Aramaic, "Rabboni!" (which means Teacher). Jesus said to her, "Do not cling to me, for I have not yet ascended to the Father; but go to my brothers and say to them, I am ascending to my Father and your Father, to my God and your God."" Mary Magdalene went and announced to the disciples, "I have seen the Lord" - and that he had said these things to her.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: संत मेरी मॅग्दालिना"
येशू ख्रिस्त क्रुसावर खिळला गेला असताना, मेरी मॅग्दालिना कुसाच्या पायथ्याशी ठामपणे उभी होती. ख्रिस्ताचे मरण तीने आपल्या डोळ्यांनी पाहिले. तसेच ती येशूच्या पुनरुत्थानाची पहिली साक्षिदार बनली. येशू मेलेल्यातून उठल्यावर प्रथम मेरी मॅग्दालिनाला दर्शन देतो. प्रेषितांना सुद्धा नाही. म्हणून तिला प्रेषितांची प्रेषिता म्हटले जाते. ती येशूशी शेवटपर्यंत विश्वासू होती. ज्या स्त्रियांची नावे शुभवर्तमानात लिहिली गेली त्यामध्ये मेरी मॅग्दालिनाचे नाव पहिले आहे. ह्यावरून येशूच्या जीवनातील तिचे महत्त्व समजते. मेरी मॅग्दालिन येशू व त्याच्या शिष्यांची सेवा करण्यास सतत तत्पर असे. येशूवर तिनेशेवटपर्यंत प्रीती केली. येशूचे मृत शरीर कबरेत नाही, हे पाहिल्यावर ती रडायला लागली. येशूवरील तिचा विश्वास व ज्या विश्वासूपणाने ती येशूबरोबर राहिली तो आपल्यासाठी एक फार मोठा धडा आहे. येशूने तिचा विश्वास व प्रिती पाहून, पुनरुत्थानानंतर तिला प्रथम दर्शन दिले व प्रेषितांना पुनरुत्थानाची शुभवार्ता सांगण्याचा मान तिला दिला. मेरी मॅग्दालिना आपल्याला आमंत्रण देत आहे की, आपण संपूर्ण हृदयाने येशूवर प्रीती करावी.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझा सहवास राहून तुम्ही वचने ग्रहण करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या