सामान्य काळातील सोळावा आठवडा
मंगळवार २३ जुलै २०२४
जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई."
whoever does the will of my Father in heaven is my brother and sister and mother
ब्रिजेट अथवा ब्रिजीटा ही स्वीडनच्या उप्लांड ह्या प्रांताचे राज्यपाल व न्यायाधीश ह्यांची एक श्रीमंत अशी कन्या होती. हा राज्यपाल व न्यायाधीश सच्चा ख्रिस्ती होता आणि न्यायभावनेने वागण्याच्या हेतूने त्याने गुलामांच्या मुक्तीकार्यातील सर्व अडथळे व्यवस्थितपणे दूर केलेले होते. त्याची मुलगी ब्रिजेट हिला वयाच्या ७ व्या वर्षापासून वेगळेच दृष्टांत दिसू लागले.
वयाच्या १३ व्या वर्षीच तिच्या श्रीमंत राजघराण्याशी बरोबरी करील अशा उल्फ गुडमार्सन ह्या धार्मिक वृत्तीच्या राजपुत्राशी तिचे लग्न झाले. त्यांच्या वैवाहिक जीवनवेलीवर आठ कलिका उमलल्या. त्यापैकी ख्रिस्तसभेने संतपद देऊन सन्मानित केलेली स्वीडनची संत कॅथरीन ही एक होय. ब्रिजेटच्या विवाहाच्या २८ व्या वर्षी तिचे पती निवर्तले. परंतु या २८ वर्षात तिच्या प्रार्थनामय व चिंतनशील जीवनाकडे पाहून उल्फ गुडमार्सन ह्यांनी देखील देवाशी निकटचा संबंध प्रस्थापित केलेला होता. दरम्यानच्या काळात ब्रिजेटला असंख्य दृष्टांत झाले होते.
तिच्या पतीनिधनानंतर देवाने एका दृष्टांतात दर्शन देऊन तिला म्हटले,जुलै महिन्यातील संत सोहळे
"मी निर्दयपणे कुणाचा न्याय करीत नाही. अगदी पापाच्या खाईत रुतलेल्या पातकी व्यक्तीला देखील मी दयेने वागवितो. मी मानवी रूप धारण करून या पृथ्वीतलावर अवतरलेलो असल्यामुळे प्रत्येक माणूस हा माझा बंधू आहे असे मी मानतो आणि बंधुत्वाच्या नात्याने मी त्याचा न्याय करतो."
पोपमहाशय, देशोदेशीचे राजेमहाराजे आणि राजकुमार तिच्याकडे सल्लामसलतीसाठी आपले प्रतिनिधी पाठवीत. तिच्या काळात आपल्या आजूबाजूच्या विश्वातील नीतिमत्ता उंचावण्यासाठी तिने पुष्कळ मेहनत घेतली. हे करताना ती सर्वांशी, विशेषतः गोरगरिबांशी नम्रतेने, प्रेमाने व सौम्यतेने वागत असे.
इ. स. १३८६ साली येशूने तिला दिलेल्या दृष्टांतानुसार तिने 'दी ऑर्डर ऑफ होली रिडिमर' नामक धार्मिक व्रतस्थांची संस्था सुरू केली. जसे येशूने ७२ शिष्य आणि १२ प्रेषितांना कामगिरीवर पाठविले तसेच ब्रिजेट हिने आपल्या संस्थेत १३ धर्मगुरू (१२ प्रेषित संत पौल) ४ उपधर्मगुरू आणि ८ प्रापंचिक व्रतस्थ बंधू आणि जवळच्याच कॉन्व्हेंटमध्ये ६० धर्मभगिनी ह्यांची जडणघडण केली आणि जगभरच्या धर्मगुरुंच्या प्रवचनाला फळ यावे म्हणून त्यांना प्रार्थना करण्यास उद्युक्त केले.
आपल्या या व्रतस्थांच्या चिंतनशील जीवनाला पूरक असे क्रियाशील जीवनदेखील तिने आखून दिलेले होते. त्यावेळी इतरत्र ह्या कृतीशीलतेच्या जागी अभ्यास हा पर्याय वापरात होता. एकदा साक्षात्कार होत असताना तिने आपल्या दोन धर्मभगिनींना बोलावले व प्रभूकडून तिला होत असलेल्या मार्गदर्शनानुसार तिने आपल्या संस्थेची आचारसंहिता तयार केली. ही संस्था पुढे एवढी नावरूपाला आली की, स्वीडनचा राजा मॅग्नस आणि राणी ह्यांनी ह्या संस्थेला भरभरून देणगीरूपाने मदत केली.
इ. स. १३५० ह्या पवित्र वर्षी संत ब्रिजेट आपल्या लाडक्या कन्येसह (संत कॅथरीन : सण २४ मार्च) रोम येथे गेली. तिथे तिने तब्बल २३ वर्षे केवळ मनत-चिंतनात घालविली. प्रभूच्या दुःखसहन, मरण व पुनरुत्थान ह्यांचा साक्षात्कार पाहात असतानाच तिने या जगाचा निरोप घेतला
पहिले वाचन :मीखा ७:१४-१५.१८-२०
वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचन
तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार, तुझ्या वतनातील मेंढरे कार्मेल डोगराच्या झाडीत एकांती राहतात त्यांना चार; प्राचीनकाळच्या दिवसाप्रमाणे बाशानात आणि गिलादात यांना चरू दे. तू इजिप्त देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. तुजसमान देव कोण आहे ? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुन्हा आम्हावर दया करील, आमचे अपराध पायाखाली तुडवील. तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबबरोबर सत्यतेने आणि आब्राहामबरोबर वात्सल्याने वागशील
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Micah 7:14-15, 18-20
Shepherd your people with with your staff, the flock of your inheritance, who dwell alone in a forest in the midst of a garden land; let them graze in Bashan and Gilead as in the days of old. As in the days when you came out of the land of Egypt, I will show them marvellous things. Who is a God like you, pardoning iniquity and passing over transgression for the remnant of his inheritance? He does not retain his anger for ever, because he delights in steadfast love. He will again have compassion on us; he will tread our iniquities underfoot. You will cast all our sins into the depths of the sea. You will show faithfulness to Jacob and steadfast love to Abraham, as you have sworn to our fathers from the days of old.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :८५ : २-८
प्रतिसाद : हे परमेश्वरा, आम्हांला तुझी दया दाखव.
१ हे परमेश्वरा,
तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस,
तू याकोबला बंदिवासातून परत आणले आहेस,
तू आपल्या लोकांच्या अनीतीची क्षमा केली आहेस,
त्यांच्या सर्व पापांवर पांघरूण घातले आहेस,
तू आपला सर्व क्रोध आवरला आहेस,
तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहेस.
२ हे आमच्या उद्धारक देवा, आम्हांला परत आण,
आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर..
तू आमच्यावर सर्वकाळ कोपलेला राहणार काय ?
पिढ्यान्पिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय ?
३ तुझे लोक तुझ्या ठायी हर्ष पावावेत म्हणून
तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय ? हे परमेश्वरा,
तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे,
आणि तू सिद्ध केलेले तारण आम्हाला दे
Psalm 85:2-4, 5-6, 7-8
Let us see, O Lord, your mercy.
O Lord, you have favoured your land,
and brought back the captives of Jacob.
You forgave the guilt of your people,
and covered all their sins.
You averted all your rage;
you turned back the heat of your anger. R
Bring us back, O God, our saviour!
Put an end to your grievance against us.
Will you be angry with us forever?
Will your anger last from age to age?
Will you not restore again our life,
that your people may rejoice in you?
Let us see, O Lord, your mercy,
and grant us your salvation. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे,
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
आलेलुया!
Acclamation:
If anyone loves me, he will keep my word, says the Lord; and my Father will love him, and we will come to him.
शुभवर्तमान मत्तय १२:४६-५०
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता पाहा, त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई आणि आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत.” तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ ?” आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, "पाहा, माझी आई आणि माझे भाऊ! कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 12:46-50
At that time: While Jesus was speaking to the people, behold, his mother and his brothers stood outside, asking to speak to him. But he replied to the man who told him, "Who is my mother, and who are my brothers?" And stretching out his hand towards his disciples, he said, "Here are my mother and my brothers! For whoever does the will of my Father in heaven is my brother and sister and mother.
Matthew 12:46-50
At that time: While Jesus was speaking to the people, behold, his mother and his brothers stood outside, asking to speak to him. But he replied to the man who told him, "Who is my mother, and who are my brothers?" And stretching out his hand towards his disciples, he said, "Here are my mother and my brothers! For whoever does the will of my Father in heaven is my brother and sister and mother.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आध्यात्मिक कुटूंब”
प्रभू येशूने कुटुंबात जन्म घेऊन कुटुंबाचे पावित्र वाढविले. आजच्या कुटुंबामध्ये येशू आपल्या कुटुंबाचा अव्हेर करीत नाही, तर देवाच्या इच्छेला प्राधान्य देऊन एका आध्यात्मिक कुटूंबाची निर्मिती करतो. आध्यात्मिक कुटुंबात आपण देवपित्याशी आपले खरे नाते जोडत असतो. मानवीकुटुंब हे तर तुटू शकते. मुले आईवडिलांविरुद्ध भांडू शकतात. आध्यात्मिक कुटूंबात देव पिता आपल्याला समजू शकतो व आपली काळजी घेतो. तरीही देवाला आध्यात्मिक कुटूंबाबरोबर मानवी कुटुंबसुद्ध महत्त्वाचे वाटते. देवाचे कुटुंब हे एक असे कुटुंब आहे की, जे देवाच्या इच्छेमध्ये बांधले जाते. ते अशा लोकांचे कुटुंबआहे की, जे देवाची इच्छा पूर्ण करण्यास वचनबद्ध होतात. देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा माणूस हा देवाच्या कुटुंबाचा सभासद होतो. देव त्याला आपले लेकरू बनवतो. येशू देवाच्या इच्छेशी प्रामाणिक राहिला. ह्या जगात आपण काही काळासाठीच आहोत. मानवी कुटुंबाचा आधार हा काही वेळापूरताच मर्यादीत आहे. पण देवाच्या कुटुंबाचे नाते हे सर्वकाळ आहे.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास व तुझी वचने पाळण्यास कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या