सामान्य काळातील सोळावा आठवडा
बुधवार २४ जुलै २०२४
काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट, तर कोठे तीसपट, असे पीक आले
Other seeds fell among thorns, and the thorns grew up and choked them. Other seeds fell on good soil and produced grain, some a hundredfold, some sixty, some thirty.
बीज हे त्या परमेश्वराचे वचन आहे. परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे पोषण करीत असतो. आपल्या जीवनाला चांगली फळे लागावीत म्हणजेच भरपूर पीक यावे ही देवाची इच्छा आहे. तरी सुद्धा आपली जमीन म्हणजेच जीवन आचरण कसे आहे व आपण देवाचे वचन कशा प्रकारे स्वीकारतो ह्यावर आज चिंतन करणे गरजेचे आहे. अनेकजण वचन एका कानाने ऐकतात व दुसऱ्या कानाने सोडून देतात. काही जणांचे अंतःकरण कठोर असते ते ऐकायलाच तयार नसतात म्हणजेच तेथे देवाचे वचन मूळ धरु शकत नाही. अनेकांच्या जीवनात मोह, द्वेष, स्वार्थ, अहंकार, दृष्टपणाची काटेरी झुडपे वचनांची वाढखुंटवतात. मात्र असे पण पुष्कळ आहेत की ते वचन ऐकतात, त्यावर मनन-चिंतन करतात आणि वचनाप्रमाणे आपले जीवन आचरण करतात. 'मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट पीक येते.' देवाचे वचन विश्वसनीय आणि आपल्या जीवनाचे परीक्षण करुन आपल्याला फलदायी बनविणारे आहे, म्हणूनच, बायबल वाचन, मनन-चिंतन, ह्यासाठी वेळ द्यावा.
पहिले वाचन :यिर्मया १:१.४-१०
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
निहल्कियाचा पुत्र यिर्मया याची वचने परमेश्वराचे वचन मला आले ते असे : “मी तुला गर्भाशयात घडवले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून जन्मण्यापूर्वी मी तुला पवित्र केले; मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.” तेव्हा मी म्हणालो, “पाहा, प्रभू परमेश्वरा, पहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे." मग परमेश्वर मला म्हणाला, “'मी बाळ आहे' असे म्हणू नकोस; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्यांच्याकडे तू जा आणि तुला आज्ञापीन ते बोल. त्यांस तू भिऊ नकोस, तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो." तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखास स्पर्श केला आणि तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत. पाहा, उपटण्यास आणि विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास आणि पाडून टाकण्यास, बांधण्यास आणि लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर आणि राज्यांवर नेमले आहे.".
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Jeremiah 1:1, 4-10
The words of Jeremiah, the son of Hilkiah, one of the priests who were in Anathoth in the land of Benjamin. Now the word of the Lord came to me, saying, "Before I formed you in the womb I knew you, and before you were born I consecrated you; I appointed you a prophet to the nations." Then I said, "Ah, Lord God! Behold, I do not know how to speak, for I am only a youth." But the Lord said to me, "Do not say, 'I am only a youth'; for to all to whom I send you, you shall go, and whatever I command you, you shall speak. Do not be afraid of them, for I am with you to deliver you, declares the Lord." Then the Lord put out his hand and touched my mouth. And the Lord said to me, "Behold, I have put my words in your mouth. See, I have set you this day over nations and over kingdoms, to pluck up and to break down, to destroy and to overthrow, to build and to plant."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :७१ : १-६,१५-१७
प्रतिसाद : माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील.
१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे;
मला कधीही लज्जित होऊ देऊ नकोस.
तू आपल्या न्यायनीतीने, माझा उद्धार कर;
माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर.
२) मला नेहमी थारा मिळावा म्हणून
माझ्यासाठी निवासाचा खडक हो;
माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस
कारण तू तर माझा गड आणि
माझा दुर्ग आहेस. हे माझ्या देवा,
दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर.
तूच माझे आशास्थान आहेस,
३)कारण हे प्रभो, परमेश्वरा,
माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस.
जन्मापासून तूच माझा आधार आहेस,
मातेच्या उदरातून जन्मल्यापासून
तूच माझा कल्याणकर्ता आहेस.
४) माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि
तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे
दिवसभर वर्णन करील. हे देवा,
माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत
आला आहेस आणि मी आजपर्यंत
तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत.
Psalm Psalm 71:1-4a, 5-6ab, 15ab & 17
R. My mouth will tell of your salvation, Lord.
In you, O Lord, I take refuge;
let me never be put to shame.
In your justice, rescue me, free me;
incline your ear to me and save me. R
Be my rock, my constant refuge,
a mighty stronghold to save me,
for you are my rock, my stronghold.
My God, free me from the hand of the wicked. R.
It is you, O Lord, who are my hope,
my trust, O Lord, from my youth.
On you I have leaned from my birth;
from my mother's womb,
you have been my help. R
My mouth will tell of your justice,
and all the day long of your salvation.
O God, you have taught me from my youth,
and I proclaim your wonders still. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे
आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
आलेलुया!
Acclamation:
The seed is the word of God, Christ is the sower; all who come to him will live forever.
शुभवर्तमान मत्तय १३:१-९
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू घरातून निघून समुद्रकिनाऱ्याशी जाऊन बसला. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले आणि त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले आणि काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट, तर कोठे तीसपट, असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 13:1-9
That same day Jesus went out of the house and sat beside the lake. And great crowds gathered about him, so that he got into a boat and sat down. And the whole crowd stood on the beach. And he told them many things in parables, saying: "A sower went out to sow. And as he sowed, some seeds fell along the path, and the birds came and devoured them. Other seeds fell on rocky ground, where they did not have much soil, and immediately they sprang up, since they had no depth of soil, but when the sun rose they were scorched. And since they had no root, they withered away. Other seeds fell among thorns, and the thorns grew up and choked them. Other seeds fell on good soil and produced grain, some a hundredfold, some sixty, some thirty. He who has ears, let him hear."
Matthew 13:1-9
That same day Jesus went out of the house and sat beside the lake. And great crowds gathered about him, so that he got into a boat and sat down. And the whole crowd stood on the beach. And he told them many things in parables, saying: "A sower went out to sow. And as he sowed, some seeds fell along the path, and the birds came and devoured them. Other seeds fell on rocky ground, where they did not have much soil, and immediately they sprang up, since they had no depth of soil, but when the sun rose they were scorched. And since they had no root, they withered away. Other seeds fell among thorns, and the thorns grew up and choked them. Other seeds fell on good soil and produced grain, some a hundredfold, some sixty, some thirty. He who has ears, let him hear."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: पेरणारा"
अनेक दाखल्याद्वारे प्रभू येशूने देव राज्याचे रहस्य स्पष्ट केले. दाखला म्हणजे एक छोटीसी गोष्ट. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू पेरणाऱ्याचा दाखला देत आहे. पेरणारा हा येशू आहे. “बी” म्हणजे देवाचा शब्द, "जमीन” म्हणजे देवाचा शब्द ग्रहण करणाऱ्याचे हृदय. “बी”चे भविष्य हे जमिनीवर खूप अवलंबून असते, देद्याच्या शब्दाचे फळ हे ऐकणाऱ्याच्या अंतःकरणाबर विसंबून असते. ह्या दाखल्यात येशू चार प्रकारच्या जमिनीबद्दल बोलत आहे. १. वाटेवर पडलेले बी : हे अशाप्रकारची माणसे आहेत की त्यांना देवाचा शब्द समजत नाही, ते विधीमध्ये भाग घेतात, देवाचा शब्द ऐकतात, पण न समजल्यामुळे ते लक्ष देत नाहीत. दृष्ट प्रवृत्ती त्यांच्याकडून तो शब्द हिरावून घेते.
२. खडकाळीवर पडलेले बी : ही माणसे देवाचा शब्द सहण करतात व ताबोडतोब आपली जीवन शैली बदलतात. पण हा बदल जास्त काळ राहत नाही. ह्याला कारण त्यांस मुळ नसते. हा बदल फक्त वरवरचा असतो. संकट, विरोध ह्यामुळे ते अडखळतात.
३. काटेरी झुडपात पडलेले बी : ही माणसे मिस्साला जातात, देवाचा शब्द ऐकतात. त्यापलिकडे काही नाही. त्यांचे सारे लक्ष संसाराची चिंता, पैसा हयाकडे असते. ह्यामुळे त्यांची आध्यात्मिक वाढ खुंटते. ४. चांगल्या जमिनीत पडलेले बी : ही माणसे देवाचा शब्द सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात. ते मनन चिंतन करून देवाचा शब्द समजून आपल्या कृतीत उतरवितात. आपण कोणत्या प्रकारच्या जमिनीत मोडतो ते आपणच पहावे.
प्रार्थना : जीवन फलदायी बनविणारे तुझे वचन आत्मसात करण्यास व जीवनरुपी बाग फलद्रूप होण्यास हे प्रभो, आम्हाला कृपा दे, आमेन
0 टिप्पण्या