Marathi Bible Reading | Thursday 25th July 2024 | 16th Week In Ordinary Time

सामान्य काळातील सोळावा  आठवडा

गुरुवार  २५  जुलै २०२४

जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल 
the Son of Man came not to be served but to serve, and to give his life as a ransom for many."



  संत जेम्स (थोरला याकोब), 
प्रेषित, रक्तसाक्षी (६३)

जेम्स आणि त्याचा धाकटा भाऊ जॉन (शुभवर्तमानकार) ही गालील सरोवराजवळ मासेमारी करणाऱ्या जब्दी ह्या श्रीमंत कोळ्याची मुले होती. त्यांच्या आचे नाव सलोमी असे होते. काही इतिहासकारांच्या मते ही पवित्र मरीयेची बर्हण होय. जेम्स आणि जॉन (याकोब आणि योहान) ह्यांच्या भांडखोर स्वभावावरून त्यांना 'गर्जनेचे पुत्र' असे म्हटले जाई.
येशू गालील समुद्राच्या किनाऱ्यावरून जात असताना जब्दीची ही दोन्ही मुले आपल्या वडिलांना आपल्या चाकरांसह मासेमारी करण्यास मदत करीत होती. शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ अंद्रेया ह्यांच्याबरोबर त्यांची मासेमारी व्यवसायात भागीदारी होती. ह्या चारही मुलांना प्रभू येशूने आपल्या १२ शिष्यांमध्ये विशेष स्थान दिलेले होते. त्यामुळेच की काय, जब्दीच्या मुलांच्या आईने येशूकडे अशी विनंती केली होती की, त्याने आपल्या मुलांना त्याच्या राज्यात एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे बसण्याचा मान दयावा.
पेत्र, याकोब आणि योहान (बऱ्याच वेळा हे तीन शिष्य विश्वास, आशा आणि प्रीती यांची प्रतिके मानली जातात). ह्या तिघांनाच ख्रिस्ताने आपल्या जीवनातील अगदी महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याबरोबर घेतले होते. येशूचे डोंगरावरील रुपांतर, याईराच्या कन्येला मरणातून जिवंत करणे आणि गेथशेमानी बागेतील प्रार्थनेच्या वेळी हे तीन शिष्य येशूला सोबत करीत होते.
ख्रिस्तसभेच्या प्रारंभीच्या काळात जेव्हा ख्रिस्ती लोकांचा छळ सुरू झाला तेव्हा हेरोद अग्रीप्पा पहिला ह्याने इ. स. ४२ साली याकोबला तुरुंगात टाकले. कारण याकोब त्यावेळी ख्रिस्ती धर्मप्रचाराचा आणि वाढत्या ख्रिस्तसभेचा एक मुख्य आधारस्तंभ मानला जात होता. हेरोदने त्याचा शिरच्छेद केला. इतकेच नव्हे तर इ. स. २०५ साली लेखन करणाऱ्या आलेक्झांड्रियाचे संत क्लेमेंट ह्यांच्या मते याकोबला ज्या माणसाने पकडून हेरोदसमोर आणले होते त्याच माणसाने मरतेसमयी याकोबाचे धैर्य व विश्वास पाहून ख्रिस्ती धर्म स्वीकारला अणि मरणाला मिठी मारली.
नवव्या शतकापासून चालत आलेल्या एका परंपरेनुसार संत याकोबने म्हणजेच जेम्स ह्याने स्पेनमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला. मरणानंतर त्याचे प्रेत कॉम्पेसेला येथे आणण्यात आले. तिथे 'सांत लागो' नामक त्याच्या नावाने उभारले महामंदिर मध्ययुगीन काळात ख्रिस्ती धर्माचे मोठे पावन तीर्थक्षेत्र बनले. अज मात्र ह्या तीर्थक्षेत्राला यात्रेकरू म्हणून भेट देण्यास केवळ पोप महाशयच एखाव्या श्रद्धावंताला परवानगी देऊ शकतात.
संत जेम्स हा स्पेन, चिली ह्या देशांचा तसेच यात्रेकरू आणि जलप्रवारी ह्या लोकांचा आश्रयदाता संत मानला जातो. युद्धसमयी त्याचा धावा केला जातो.
  
पहिले वाचन : २ करिंथकरांस ४ : ७-१५
वाचन :पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"आम्ही येशूचा वध सर्वदा शरिरात वागवतो."

आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, ह्यावरून परमसामर्थ्य आमचे नव्हे तर देवाचे आहे हे सिध्द होते. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही, आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही, आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही, आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही, आम्ही येशूचा वध सर्वदा शरिरात वागवतो, अशा हेतूने की, येशूचे जीवनही आमच्या शरिरात प्रकट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूकरिता सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहो, ह्यासाठी की, येशूचे जीवनही आमच्या सर्व मर्त्य देहात प्रकट व्हावे. आम्हांमध्ये मरण, पण तुम्हांमध्ये जीवन आपले कार्य चालवते.
"मी विश्वास धरला म्हणून बोललो," ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हांला ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवील आणि तुमच्याबरोबर सादर करील. सर्व काही तुम्हांकरिता आहे, ह्यासाठी की, पुष्कळ जणांच्याद्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभारप्रदर्शनाला साधनीभूत व्हावी.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :2 Corinthians 4:7-15

Brethren: We have this treasure in jars of clay, to show that the surpassing power belongs to God and not to us. We are afflicted in every way, but not crushed; perplexed, but not driven to despair; persecuted, but not forsaken; struck down, but not destroyed; always carrying in the body the death of Jesus, so that the life of Jesus may also be manifested in our bodies. For we who live are always being given over to death for Jesus' sake, so that the life of Jesus also may be manifested in our mortal flesh. So death is at work in us, but life in you. Since we have the same spirit of faith according to what has been written, "I believed, and so I spoke", we also believe, and so we also speak, knowing that he who raised the Lord Jesus will raise us also with Jesus and bring us with you into his presence. For it is all for your sake, so that as grace extends to more and more people it may increase thanksgiving, to the glory of God.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :  १२६ : १-६
प्रतिसाद : जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षानि कापणी करतील.

१) सीयोनातून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा
परमेश्वराने परत आणले 
तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हांला वाटले. 
तेव्हा आमचे मुख हास्याने आणि 
आमची जीभ जयघोषाने भरली.

२) अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की,
"परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत" 
परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत. 
त्यामुळे आम्हांला आनंद झाला आहे.

३) हे परमेश्वरा, नेगेव येथील ओढ्यांप्रमाणे 
आम्हांला बंदिवासातून परत आण. 
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात 
ते हर्षाने कापणी करतील. 

४) जे पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतात
ते खात्रीने आनंद करत आपल्या पेंढ्या घेऊन येतील.


Psalm Psalm 126:1-2ab, 2cd-6 

R Those who are sowing in tears will sing when they reap 

When the Lord brought back the exiles of Sion,
we thought we were dreaming. 
Then was our mouth filled with laughter; 
on our tongues, songs of joy. R

Then the nations themselves said,
"What great deeds the Lord worked for them!" 
What great deeds the Lord worked for us! 
Indeed, we were glad. R 

Bring back our exiles, O Lord, 
as streams in the south. 
Those who are sowing in tears 
will sing when they reap. R

They go out, they go out, full of tears, 
bearing seed for the sowing; 
they come back, they come back 
with a song, bearing their sheaves. R

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मी तुम्हाला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे,
 ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.
 आलेलुया!

Acclamation: 
 I chose you and appointed you that you should go and bear fruit and that your fruit should abide, says the Lord.

शुभवर्तमान   मत्तय २० : २०-२८
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"माझा प्याला तुम्ही प्याल."

जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह येशूकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, "तुला काय पाहिजे ?" ती त्याला म्हणाले, “तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे आणि एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा.” येशू म्हणाला, “तुम्ही काय मागता हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हांला पिता येईल काय ?" ते त्याला म्हणाले, “पिता येईल.” त्याने त्यांना म्हटले, "माझा प्याला, तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिध्द केला त्याच्यासाठी तो आहे." ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांस त्या दोघा भावांचा राग आला.

पण येशूने त्यांना बोलावून म्हटले, "परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात आणि मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. तसे तुम्हांमध्ये नाही, तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास आणि पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


Gospel Reading :Matthew 20:20-28

At that time: The mother of the sons of Zebedee came up to Jesus with her sons, and kneeling before him she asked him for something. And he said to her, "What do you want?" She said to him, "Say that these two sons of mine are to sit, one at your right hand and one at your left, in your kingdom." Jesus answered, "You do not know what you are asking. Are you able to drink the chalice that I am to drink?" They said to him, "We are able." He said to them, "You will drink my chalice, but to sit at my right hand and at my left is not mine to grant, but it is for those for whom it has been prepared by my Father." And when the ten heard it, they were indignant at the two brothers. But Jesus called them to him and said, "You know that the rulers of the Gentiles lord it over them, and their great ones exercise authority over them. It shall not be so among you. But whoever would be great among you must be your servant, and whoever would be first among you must be your slave, even as the Son of Man came not to be served but to serve, and to give his life as a ransom for many."

This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: प्रेषित संत जेम्स" आज आपण संत जेम्स, प्रभू येशूचा प्रेषित ह्याचा सण साजरा करीत आहोत. प्रेषितांमध्ये सर्वप्रथम रक्तसाक्षी होण्याचा मान संत जेम्सला मिळाला. येशू शिष्यासह येरुसलमेकडे निघाला होता. शिष्यांना वाटले तिथे तो नवीन राज्य स्थापन करील. ह्या नवीन राज्यात, आपले स्थान काय असेल ह्याचा ते विचार करीत होते. पण येशूचे राज्य हे निराळे होते. ह्या राज्यात अधिकार व दर्जा हा लोकांच्या सेवेसाठी वापरला पाहिजे असे राज्य. ह्या जगात ज्या माणसांचा सन्मान झाला, तो त्यांनी स्वतःसाठी काय मिळविले ह्यासाठी नाही, तर मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी खूप काही दिले म्हणून. येशू देवाचा पूत्र असून देखील तो म्हणतो, "मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करण्यास आलो आहे. शेवटच्या भोजनाच्या वेळी तो आपल्या खूर्चीवरून उठला. (खूर्ची ही अधिकार ह्याचे प्रतिक आहे) व प्रेषितांचे पाय धूवू लागला. गुरू असून प्रेषितांचे त्याने पाय धुतले. ह्यासारखी नम्रता ती कोणती ? नम्र झाल्याशिवाय कधीही सेवा करता येत नाही. नम्रता व सेवा हा प्रत्येक ख्रिस्ती माणसाचा आत्मा आहे. येशूचे अनुयायी म्हणून होण्यास हे गुण खूप महत्वाचे आहेत.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझ्या प्रेमाचा व सेवेचा अंकूर माझ्या अंतःकरणात वाढीस  लाव आणि तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला कृपा दे, आमेन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या