Marathi Bible Reading | Friday 26th July 2024 | 16th Week In Ordinary Time

सामान्य काळातील सोळावा  आठवडा

शुक्रवार २६ जुलै  २०२४ 

संसाराची चिंता आणि द्रव्यांचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात 

the worry of the world and the lure of riches choke the word and so it produces nothing. 


 संत जोकिम आणि आन्ना

पवित्र मरियेचे मातापिता (पहिले शतक)

नव्या करारातील शुभवर्तमानांमध्ये धन्य कुमारी पवित्र मरियेचे मातापिता कोण होते ह्याचा उल्लेख आलेला नाही. मात्र दुसऱ्या शतकापासून चालत आलेल्या एका परंपरेनुसार पवित्र मरियेच्या आईचे नाव आन्ना (कृपा) असे होते आणि वडिलांचे नाव जोकिम (देव तयारी करतो) असे होते. मरिया हे या दांपत्याला त्यांच्या म्हातारपणी झालेले अपत्य होते आणि ते त्यांच्या प्रार्थनेचे फळ होते असे मानले जाते. कारण दोघेही वयातीत असून निःसंतान होती. संत आन्ना ही येशूची 'आजी' होती, हे सत्य पौर्वात्य ख्रिस्तसभेत चौथ्या शतकात आणि पाश्चिमात्य ख्रिस्तसभेत आठव्या शतकात लोकांच्या भक्तीचा विषय बनले आणि चौदाव्या शतकात तर ते संपूर्ण जगभरच्या भक्तीमध्ये सामावले गेले. इ. स. १५४८ साली विश्वव्यापी ख्रिस्तसभेत त्यांचा सण समाविष्ट करण्यात आला. प्रसूतीवेदना सहन करणाऱ्या स्त्रियांची ती आश्रयदाती संत म्हटली जाते.

जोकिम हे पवित्र मरियेचे पिता अत्यंत धार्मिक होते. एका प्राचीन दंतकथेनुसार ते मूळचे गालिली येथील होते. तेथून ते येरुशलेम येथे आले आणि तिथेच मरण पावले. त्यांच्या राहत्या घराशेजारीच त्यांना पुरण्यात आले. पुढे हेल्लेना या राणीने (सण १८ ऑगस्ट) त्यांच्या थडग्यावर संत जोकीम व आन्ना ह्यांच्या स्मरणार्थ एक चर्च बांधले. तिथून त्यांची भक्ती फोफावत गेली.

 ख्रिस्तसभा आज धन्य कुमारी मरीयेचे आई-वडिल, संत आत्रा व संत ज्योकिम ह्यांचा सण साजरा करीत आहे. परमेश्वराच्या वचनावर आणि त्याने दिलेल्या दहा आज्ञांवर चिंतन करीत असताना आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या. आई-वडिल ह्या नात्याने आपण आपल्या मुलांना देवप्रीति आणि परस्परप्रीतिची आज्ञा पाळावयास प्रोत्साहन देत आहोत का? संत ज्योकिम आणि संत आना ह्यांनी पवित्र व धन्य कुमारी मरियेला देवप्रीतिच्या महान आज्ञेमध्ये घडविले. आपण आज त्यांचा आदर्श आपल्या कुटुंबात आचरणात आणतो का ? प्रीतिच्या आज्ञांचे पालन कुटुंबातच शिकविले जाते व पाळले जाते.

ज्या कुटुंबात देवाचा शब्द आचरणात आणला जातो व जे कुटुंब एकत्र प्रार्थना करुन देवप्रीति आणि परस्परप्रीतिची आज्ञा आचरणात आणतात तेच खरे ख्रिस्ती कुटुंब होय.


  
पहिले वाचन :यिर्मया ३:१४-१७
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 "मी तुम्हांला माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; सर्व राष्ट्र यरुशलेमात जमा होतील."

परमेश्वर म्हणतो, मुलांनो, मागे फिरा, कारण मी तुमचा स्वामी आहे; मी तुम्हास या शहरातून एक, त्या कुळातून दोघे, असे घेऊन सियोनला आणीन. "मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन, ते तुम्हास ज्ञान आणि अक्कल ह्यांनी तृप्त करतील. परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल त्या काळी "परमेश्वराच्या कराराचा कोश" असे ते यापुढे म्हणणार नाहीत, तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही, त्यांना तो आठवणारही नाही; ते त्याची खंत करणार नाहीत आणि तो
पुन्हा बनवणार नाहीत. त्या काळी येरुशलेमला परमेश्वराचे सिंहासन म्हणतील, त्याच्याकडे सर्व राष्ट्र जमा होतील; कारण परमेश्वराचे नाम येरुशलेमात आहे, यापुढे ती आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


First Reading :Jeremiah 3:14-17

'Come back, disloyal children, Yahweh declares, for I alone am your Master, and I will take you, one from a town, two from a family, and bring you to Zion. I shall give you shepherds after my own heart, who will pasture you wisely and discreetly. Then, when you have increased and grown numerous in the country, Yahweh declares, no one will ever again say: The ark of the covenant of Yahweh! It will not enter their minds, they will not remember it or miss it, nor will another one be made. When that time comes, Jerusalem will be called: The Throne of Yahweh, and all the nations will converge on her, on Yahweh's name, on Jerusalem, and will no longer follow their own stubborn and wicked inclinations.'
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :यिर्मया ३१:१०,११-१२,१३
प्रतिसाद :  प्रभू त्यांची निगा राखील.

१ अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका;
 दूरच्या द्वीपात ते प्रसिद्ध करा 
आणि म्हणा, "ज्याने इस्राएलला विखुरले तो त्याला जमा करील. 
मेंढपाळ आपल्या कळपाची निगा राखतो तशी तो निगा राखील."

२ कारण परमेश्वराने इस्राएलचा उद्धार केला आहे 
आणि त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून त्यांना मुक्त केले आहे. 
ते येऊन सियोनच्या माथ्यावर आनंदाने गातील, 
परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षरस, ताजे तेल 
आणि गुरामेंढरांचे कळप यांकडे लोटतील.

३ त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील, वृद्ध 
आणि तरुण एकत्र आनंद करतील. 
मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन, 
मी त्याचे सांत्वन करीन, 
त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन.


Psalm Jeremiah 31:10, 11-12ab, 13

The Lord will keep us, as a shepherd keeps his flock.R 

Hear the word of the Lord, O nations,
   and declare it in the coastlands far away;
say, ‘He who scattered Israel will gather him,
   and will keep him as a shepherd a flock.’
 For the Lord has ransomed Jacob,
   and has redeemed him from hands too strong for him.

 They shall come and sing aloud on the height of Zion,
   and they shall be radiant over the goodness of the Lord,
over the grain, the wine, and the oil,
   and over the young of the flock and the herd;
their life shall become like a watered garden,
   and they shall never languish again.

 Then shall the young women rejoice in the dance,
   and the young men and the old shall be merry.
I will turn their mourning into joy,
   I will comfort them, and give them gladness for sorrow.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
 माझा जीव परमेश्वराची अपेक्षा करतो, 
मी त्याच्या वचनाची आशा धरतो.
 आलेलुया!

Acclamation: 
 The seed is the word of God, Christ is the sower; all who come to him will live forever.

शुभवर्तमान मत्तय १३:१८-२३
वाचक :  मत्तयलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "जो मनुष्य वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पेरलेला तो हा आहे. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो आणि ते तात्काळ आनंदाने ग्रहण करतो; परंतु त्याला मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता आणि द्रव्यांचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading 

Matthew 13:18-23

Jesus said to his disciples, 'Pay attention to the parable of the sower. When anyone hears the word of the kingdom without understanding, the Evil One comes and carries off what was sown in his heart: this is the seed sown on the edge of the path. The seed sown on patches of rock is someone who hears the word and welcomes it at once with joy. But such a person has no root deep down and does not last; should some trial come, or some persecution on account of the word, at once he falls away. The seed sown in thorns is someone who hears the word, but the worry of the world and the lure of riches choke the word and so it produces nothing. And the seed sown in rich soil is someone who hears the word and understands it; this is the one who yields a harvest and produces now a hundredfold, now sixty, now thirty.

Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनअनेक दाखल्याद्वारे प्रभू येशूने देव राज्याचे रहस्य स्पष्ट केले. दाखला म्हणजे एक छोटीसी गोष्ट. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू पेरणाऱ्याचा दाखला देत आहे. पेरणारा हा येशू आहे. "बी" म्हणजे देवाचा शब्द, "जमीन" म्हणजे देवाचा शब्द ग्रहण करणाऱ्याचे हृदय. "बी"चे भविष्य हे जमिनीवर खूप अवलंबून असते. देवाच्या शब्दाचे फळ हे ऐकणाऱ्याच्या अंतःकरणावर विसंबत असते. ह्या दाखल्यात येशू चार प्रकारच्या जमिनीबद्दल बोलत आहे. १. वाटेवर पडलेले बी : हे अशाप्रकारची माणसे आहेत की त्यांना देवाचा शब्द समजत नाही. ते विधीमध्ये भाग घेतात, देवाचा शब्द ऐकतात, पण न समजल्यामुळे ते लक्ष देत नाहीत. दृष्ट प्रवृत्ती त्यांच्याकडून तो शब्द हिरावून घेते. 
२. खडकाळीवर पडलेले बी ही माणसे देवाचा शब्द ग्रहण करतात व ताबोडतोब आपली जीवन शैली बदलतात. पण हा बदल जास्त काळ राहत नाही. ह्याला कारण त्यांस मुळ नसते. हा बदल फक्त वरवरचा असतो. संकट, विरोध ह्यामुळे ते अडखळतात. 
३. काटेरी झुडपात पडलेले बी : ही माणसे मिस्साला जातात, देवाचा शब्द ऐकतात. त्यापलिकडे काही नाही. त्याचे सारे लक्ष संसाराची चिंता, पैसा हयाकडे असते. ह्यामुळे त्यांची आध्यात्मिक वाढ खुंटते. 
४. चांगल्या जमिनीत पडलेले बी : ही माणसे देवाचा शब्द सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात. ते मनन चिंतन करून देवाचा शब्द समजून आपल्या कृतीत उतरवितात. आपण कोणत्या प्रकारच्या जमिनीत मोडतो ते आपणच पहावे. 

प्रार्थनाहे परमेश्वरा, आमच्या आई-वडिलांबद्दल तुला धन्यवाद देतो. त्यांना तुझी कृपा दे, आमेन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या