Marathi Bible Reading | Saturday 20th July 2024 | 15th Week In Ordinary Time

सामान्य काळातील पंधरावा आठवडा

शनिवार २० जुलै  २०२४ 

"पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; 

"Behold, my servant whom I have chosen, my beloved with whom my soul is well pleased. 




संत एलायस आणि फ्लेवियन 
- जेरुसलेम आणि अंत्युखियाचे पेट्रिआर्क (५१८)

 केवळ कर्मकांड आणि नियमशास्त्र म्हणजे धर्माचरण नाही. तर  त्याच्याहि पलिकडे जाऊन माणसांच्या मुलभूत गरजा, अडचणी, आजार, दु:खे, व संकटे ह्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी कार्यरत बनणे. प्रभू येशूने तात्कालीन धर्मपंडितातांचे आव्हान स्वीकारुन देवराज्याची सुवार्ता पसरविली.

प्रभू येशू सर्वांचा उद्धारक व मुक्तीदाता परमेश्वर आहे. आपण केवळ कर्मकांडाच पालन न करता श्रद्धेने प्रभू येशूच्या वचनावर आणि आज्ञांवर चिंतन  करु या. आपले आध्यात्मिक सामाजिक जीवन तपासून पाहू या, प्रेम, त्याग,  सेवा, परोपकार व दयाळूपणा ह्यांना आपल्या जीवनात अग्रस्थान देऊन, आपले जीवन परिवर्तन घडवून आणू या. ख्रिस्तामध्ये एकरुप होऊन इतरांना ख्रिस्ताच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्नशील बनू या. 

पहिले वाचन ::मिखा २:१-५
वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ते शेताचा लोभ धरतात आणि घरे हस्तगत करतात."

जे अनर्थाचा संकल्प करतात आणि बिछान्यावर पडल्यापडल्या दुष्टतेची योजना करतात त्यांना धिक्कार असो! सकाळ उजाडताच ते आपला बेत सिद्धीस नेतात, कारण हे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे. ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर आणि त्याच्या घरावर, माणसावर आणि त्याच्या वतनावर बलात्कार करतात. म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे. त्याच्या जोखडाखालून तुम्हांला आपली मान काढता येणार नाही, तुम्हांला मान वर करून चालता येणार नाही; कारण प्रसंग वाईट आहे. त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील आणि म्हणतील, “सर्व आटोपले, आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र फितुरांना त्याने वाटून दिले आहे." ह्यामुळे चिठ्ठी टाकून सुत्राने जमीन मापण्यास परमेश्वराच्या मंडळीत तुझ्यामध्ये कोणी राहावयाचा नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Micah 2:1-5

Woe to those who devise wickedness and work evil on their beds! When the morning dawns, they perform it, because it is in the power of their hand. They covet fields and seize them, and houses, and take them away; they oppress a man and his house, a man and his inheritance. Therefore thus says the Lord: behold, against this family I am devising disaster, from which you cannot remove your necks, and you shall not walk haughtily, for it will be a time of disaster. In that day they shall take up a taunt song against you and moan bitterly, and say, "We are utterly ruined; he changes the portion of my people; how he removes it from me! To an apostate he allots our fields." Therefore you will have none to cast the line by lot in the assembly of the Lord.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १० :१- ४,७-८,१४

प्रतिसाद : हे परमेश्वरा, गरिबाला विसरू नकोस,

१) हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस ? 
आणि संकटसमयी दृष्टिआड का होतोस? 
दुर्जनांच्या गर्वामुळे गरीब माणूस दुःखाने होरपळून जातो; 
ज्या क्लुप्त्या ते योजतात त्यातच ते सापडोत..

२) कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो; 
लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो. 
दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही. 
देव नाही." असाच त्याच्या सर्व विचांराचा सार असतो.

३) त्याच्या तोंडी शाप, कपट आणि जुलूम सदैव आहेत,
 त्याच्या जिभेवर उपद्रव आणि दुष्टाई आहेत. 
गावातील दडण्याच्या ठिकाणी तो दबा धरून बसतो; 
गुप्त स्थळी तो निरपराध्याचा घात करतो. 

४ )तू हे पाहिलेच आहे, उपद्रव आणि दुःख 
ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी 
त्यांच्याकडे तू नजर लावतोस. 
लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; 
पोरक्यांचा सहाय्यकर्ता तू आहेस


Psalm 10:1-2, 3-4, 7-8b, 14
Do not forget the poor, O Lord!

O Lord, why do you stand afar off, 
and hide yourself in times of distress?
The poor are devoured 
by the pride of the wicked; 
they are caught in the schemes
that others have made. R

For the wicked boasts of his soul's desires;
 the covetous blasphemes and spurns the Lord. 
The wicked says in his pride, 
"God will not punish.
There is no God." Such are his thoughts. R

His mouth is full of cursing,
guile, oppression;
under his tongue are deceit and evil.
He sits in ambush in the villages;
in hidden places, he murders the innocent. R

But you have seen the trouble and sorrow.
You note it; you take it in your hands.
The helpless one relies on you, 
for you are the helper of the orphan. R

जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
माझा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करतो. 
मी त्याच्या वचनावर अवलंबून राहतो.
 आलेलुया!

Acclamation: 
In Christ, God was reconciling the world to himself, and entrusting to us the message of reconciliation.

शुभवर्तमान मत्तय १२:१४-२१
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  
“जे आजारातून बरे झाले होते त्यांना येशूने यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून ताकीद दिली की, मला प्रकट करू नका."

परुश्यांनी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा अशी त्याच्याविरूद्ध मसलत केली.पण हे ओळखून येशू तेथून निघाला. तेव्हा बरेच लोक त्याच्यामागून चालले आणि त्या सर्वांना त्याने बरे केले आणि यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे; म्हणून मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली. यशयाद्वारे सांगितले होते, "पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे. त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. तो भांडणार नाही आणि ओरडणार नाही आणि रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही; चेपलेला बोरू तो मोडणार नाही आणि मिणमिणती वात विझवणार नाही; तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading 

Matthew 12:14-21


At that time: The Pharisees went out and conspired against Jesus, how to destroy him. Jesus, aware of this, withdrew from there. And many followed him, and he healed them all and ordered them not to make him known. This was to fulfil what was spoken by the 

prophet Isaiah: "Behold, my servant whom I have chosen, my beloved with whom my soul is well pleased. I will put my Spirit upon him, and he will proclaim justice to the Gentiles. He will not quarrel or cry aloud, nor will anyone hear his voice in the streets; a bruised reed he will not break, and a smouldering wick he will not quench, until he brings justice to victory; and in his name the Gentiles will hope."

 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतननिवडलेला सेवक”

जुन्या करारात यशया संदेष्टाद्वारे तारणाऱ्या विषयी भाकीत सांगितले होते की, तो कोण आहे व त्याचे कार्य काय आहे. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, यशया संदेष्ट्याने केलेले भाकीत प्रभू येशू पूर्ण करीत आहे. ह्या ठिकाणी दोन प्रकारची माणसे आपणांस पाहावयास मिळतात. १) धार्मिक नेते - जे येशूचा घात कसा करायचा ह्याचा विचार करतात. २) येशूवर विश्वास ठेवून त्याच्या मागे चालणारे लोक. त्यांचा विश्वास पाहून येशूने त्यांना बरे केले. येशू लोकांना सांगतो, मला प्रगट करू नका. असे बोलण्यामागे येशूचे कारण काय असावे? - येशूचा जे घातपात करण्यास टपलेले होते त्यांच्यापासून त्याला दूर राहावयाचे होते. कारण त्यांची वेळ अजून आलेली नव्हती. दुसरे कारण म्हणजे लोकांना प्रभू येशू यहुद्यांचा राजा व्हावा, असे वाटत्त होते. पण प्रभू येशूला लोकांपेक्षा स्वर्गीय पित्याच्या इच्छेला जास्त प्राधान्य द्यायचे होते. प्रभू येशू हा निवडलेला देवाचा सेवक होता. देवाची आज्ञा पाळण्यासाठी तो स्वतः नम्र झाला. प्रभू येशूच्या आज्ञा पाळणासाठी मी नम्र होऊ इच्छितो का? मी येशूवर कितपत विश्वास ठेवतो ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला जाणण्यास व तुझी वचने श्रद्धेने कृतीत उतरविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या