Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Friday 19th July 2024 | 15th Week In Ordinary Time

सामान्य काळातील पंधरावा आठवडा

शुक्रवार १९ जुलै  २०२४ 

'मला दया पाहिजे, यज्ञ नको,'

'I desire mercy, and not sacrifice', 



संत उलरिक 
- महागुरू, वर्तनसाक्षी

 जर्मनीच्या ऑग्जबर्ग धर्मप्रांताच्या  इ. स. ९२३ साली महागुरुंचा उत्तराधिकारी म्हणून  उलरिक  ह्यांची नेमणूक करण्यात आली.
आपल्या लोकांच्या आणि धर्मगुरूंच्या जीवनाची आध्यात्मिक पातळीउंचावण्यासाठी बिशप उलरिक स्वतः धर्मगुरूंना व लोकांना खाजगीत भेटत, त्यांच्यासाठी तपसाधना, अधिवेशने, परिषदा आणि खुल्या चर्चेचं आयोजन करीत असत. धर्मग्रामातील प्रशासन कसे सुधारता येईल, ख्रिस्तसभेच्या कायद्याचे होणारे उल्लंघन कसे टाळता येईल त्याविषयी चर्चा घडवून आणत. अपराधी व कायदेभंग करणाऱ्यांवर अगदी प्रेमाने कडक कारवाई करीत.
आपल्या ऑग्जबर्ग धर्मप्रांताचे आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनाचे पुनरुज्जीवन करीत असतानाच बिशप उल्टीक ह्यांनी शहराभोवती भक्कम तटबंदी उभारली. अनेक गावे आणि नगरे ह्यांचे पुनर्वसन केले. गरीब आणि निराश्रित ह्यांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली. राजाला त्याच्या प्रशासनात उदार अंतःकरणाने सहाय्य केले.
.इ. स. ९७३ साली बिशप उल्ीक ह्यांचे देहावसान झाले. त्यानंतर त्यांचे थडगे हे तीर्थयात्रेचे केंद्र बनले. अगदी थोड्याच अवधीत म्हणजे २० वर्षांनी ९९३ साली मोठ्या थाटामाटात बिशप उल्टीक ह्यांना संतपदाचा बहुमान देण्यात आला.
चिंतन : दिव्यातून तेल बाजूला काढले की ज्योत विझलीच म्हणून समजा. आध्यात्मिक जीवनातून प्रार्थना वजा केली की श्रद्धेची वातही हळूहळू मंदावत जाते. - संत उलरिक 


प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आणि त्याची अखंड दया नियमांच्या पलिकडे आहे. देवाने निर्माण केलेला प्रत्येक दिवस चांगलाच आहे. कोणतेही सत्कृत्य करण्यासाठी। काळ, वेळ व दिवस ह्यांचे बंधन पाळता येणार नाही.
आपल्या जीवनातील देवाचा प्रेमळपणा अनुभवायचा असेल आणि 
पावित्र्यता टिकवायची असेल तर देवप्रीति आणि परस्परप्रीतिची आज्ञा पाळणे  महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर प्रार्थना, मनन-चिंतन आणि प्रभू वचनाचे पालन  करणे गरजेचे आहे. आपले जीवन पावन बनवून इतरांच्या भल्यासाठी व देवाच्या गौरवासाठी आपण कृतिशील बनू या.

पहिले वाचन :यशया ३८:१-६, २१-२२,७-८
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझे अश्रू पाहिले आहेत. "

हिज्किया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोसचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस." तेव्हा हिज्कियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने आणि सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे आठव, अशी मी तुला विनंती करतो." असे म्हणून हिज्किया मनस्वी रडला. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला तो असा: "हिज्कियाला जाऊन सांग की, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; पाहा, मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवतो. मी तुला आणि ह्या नगराला अश्शुरच्या राजाच्या हातातून सोडवीन, ह्या नगराचे संरक्षण करीन, "
यशयाने सांगितले होते की, "अंजिरांची एक चांदकी आणून गळवावर बांध म्हणजे त्याला गुण पडेल." हिज्कियाने म्हटले होते, “मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन याचे चिन्ह काय ?"
यशया उत्तरादाखल म्हणाला होता की, परमेश्वर बोलला आहे, ते करीलच, याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे: पाहा, आहाजच्या शंकुयंत्राच्या पायऱ्यांवर छाया सूर्याबरोबर दहा पायऱ्या उतरली आहे, तिला परत दहा पायऱ्यांवर आणतो." तेव्हा छाया सूर्याबरोबर दहा पायऱ्या उतरली होती ती दहा पायऱ्यांमागे सरली.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Isaiah 38:1-6, 21-22, 7-8

In those days, Hezekiah became sick and was at the point of death. And Isaiah the prophet the son of Amoz came to him, and said to him, "Thus says the Lord: Set your house in order, for you shall die, you shall not recover." Then Hezekiah turned his face to the wall and prayed to the Lord, and said, "Please, O Lord, remember how I have walked before you in faithfulness and with a whole heart, and have done what is good in your sight." And Hezekiah wept bitterly. Then the word of the Lord came to Isaiah: "Go and say to Hezekiah, Thus says the Lord, the God of David your father: I have heard your prayer, I have seen your tears. Behold, I will add fifteen years to your life. I will deliver you and this city out of the hand of the king of Assyria, and will defend this city. Now Isaiah had said, "Let them take a cake of figs and apply it to the boil, that he may recover." Hezekiah also had said, "What is the sign that I shall go up to the house of the Lord?" [Isaiah answered,] "This shall be the sign to you from the Lord, that the Lord will do this thing that he has promised: Behold, I will make the shadow cast by the declining sun on the dial of Ahaz turn back ten steps." So the sun turned back on the dial the ten steps by which it had declined.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ३८:१०- १२,१६

प्रतिसाद : हे परमेश्वरा तू माझा जीव (विनाशगर्तेतून मायेने) उद्धरला आहेस.

१) मी म्हटले, "माझ्या आयुष्याच्या सुखावस्थेत 
मी अधलोकांच्या द्वारात प्रवेश करीन; 
माझ्या आयुष्याची उतरलेली वर्षे 
माझ्यापासून हिरावून घेतली आहेत."

२ ) मी म्हटले, "मला परमेश्वराचे, 
जिवंतांच्या भूमीवर असता 
परमेश्वराचे दर्शन होणार नाही; 
मी जगातील रहिवाशांसह राहून 
मनुष्य माझ्या दृष्टीस इतः पर पडणार नाही.

३)“माझे घर मोडले आहे, 
ते धनगराच्या राहुटीसारखे उखडून नेण्यात आले आहे.
 कोष्ट्याप्रमाणे मी आपले जीवित आटोपले आहे; 
तो मागाच्या ताण्यातून मला तोडणार आहे.

४ "हे प्रभो, ह्या गोष्टींच्या योगे लोक जीव धरून राहतात. 
त्यातच सर्वस्वी माझ्या आत्म्याचे जीवित आहे; 
म्हणून तूच मला बरे कर आणि जिवंत ठेव.”


Isaiah 38:10, 11, 12abcd, 16

O Lord, you have delivered my soul lest it perish. 

I said, In the middle of my days 
I must depart;
 I am consigned to the gates of Sheol
 for the rest of my years. R

I said, I shall not see the Lord, 
the Lord in the land of the living; 
I shall look on man no more 
among the inhabitants of the world. R 

My dwelling is plucked up 
and removed from me
like a shepherd's tent; 
like a weaver I have rolled up my life; 
he cuts me off from the loom. R

O Lord, by these things men live, 
and in all these is the life of my spirit.
Oh restore me to health and make me live! R


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड, 
आणि तुझे नियम मला शिकव.
 आलेलुया!

Acclamation: 
My sheep hear my voice, says the Lord; and I know them, and they follow me. 

शुभवर्तमान मत्तय १२:१-८
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  "मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे."
एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात असता त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून परुशी त्यांना म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत." त्याने त्यांना म्हटले, "दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले ? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत, तर याजकांनी मात्र  खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय ? किंवा याजक मंदिरात शब्बाथ दिवशी शब्बाथ मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय ? तरीपण मी तुम्हांला सांगतो की, मंदिरापेक्षा थोर असा कोणीएक येथे आहे. 'मला दया पाहिजे, यज्ञ नको,' ह्यांचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोष्याला दोष लावला नसता. कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading 

Matthew 12:1-8


At that time: Jesus went through the cornfields on the Sabbath. His disciples were hungry, and they began to pluck ears of corn and to eat. But when the Pharisees saw it, they said to him, "Look, your disciples are doing what is not lawful to do on the Sabbath." He said to them, "Have you not read what David did when he was hungry, and those who were with him: how he entered the house of God and ate the bread of the Presence, which it was not lawful for him to eat nor for those who were with him, but only for the priests? Or have you not read in the Law how on the Sabbath the priests in the temple profane the Sabbath and are guiltless? I tell you, something greater than the temple is here. And if you had known what this means, 'I desire mercy, and not sacrifice', you would not have condemned the guiltless. For the Son of Man is lord of the Sabbath."

 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन"खरा धर्म"

येशू हाच मसिहा आहे. लोकांना योग्य तो मार्ग दाखविण्यासाठी, तो ह्या जगात आला, त्यामुळे त्याची प्रत्येक कृती ही खऱ्या धर्माला धरून होती. शिष्यांनी कणसे तोडून खाल्ली. हा यहुद्यासाठी गुन्हा नव्हता. पण त्यांनी ते शब्बाथ दिवशी केले, हा गुन्हा होता. यहुदी धर्माप्रमाणे शब्बाथाचे पालन न करणे हा फार मोठा अपराध मानला जातो. यहुदी लोक हे नियम, कायदे ह्यामध्ये फार गुरफटून गेले होते. दया, प्रेम ह्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. येशू त्यांना सांगतो की, माणूस हा शब्बाथापेक्षा मोठा आहे. माणसाची गरज ही धर्मापेक्षा मोठी न आहे. दाविद राजाने नियम मोडला ते त्याची प्रामाणिक भूक भागविण्यासाठी. येशूचा धर्म हा ' दयेने व प्रेमाने भरलेला आहे. येशू शब्बाथाचा धनी आहे. ते अशासाठी की त्याला खऱ्या धर्माची ओळख होती. त्याची आज्ञाच तशी होती की, संपूर्ण मनाने देवावर प्रिती करणे व तशीच न आपल्या शेजाऱ्यावर सुद्धा. शेजाऱ्यांच्या गरजाकडे कानडोळा करून आपण देवावर प्रिती कधीच करू शकत नाही. देव व मानव खऱ्या धर्माच्या दोन बाजू आहेत

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझे सर्व नियम पाळण्यास व गरजवंतांची सेवा  करण्यास मला कृपा दे, आमेन.