सामान्य काळातील पंधरावा आठवडा
गुरुवार १८ जुलै २०२४
“अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.
"Come to me, all who labour and are heavy laden, and I will give you rest.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू सर्वांना आश्वासन पूवर्क सांगत आहे, आपला प्रभू खरोखरच महान परमेश्वर आहे. तो आपल्या सर्वांच्या जीवनातील ओझी हलकी करू इच्छितो. थकलेल्या आणि भारक्रांत झालेल्या सर्वांना प्रभू त्याच्या विसाव्यात म्हणजेच त्याच्या सहवासात येण्यासाठी आमंत्रण देत आहे. प्रभू येशूच्या विसाव्यात व सहवासातच आपल्या सर्व समस्यांचे उत्तर आपल्याला मिळू शकते. त्याच्या मायेच्या पंखाखाली राहिल्यास सर्व दुःखे व कष्ट हलकी होतात. प्रभू येशू आपल्या सर्वांना बोलावित आहे, आपण त्याला शरण जाऊ या. प्रभूच्या ठायीच शांती आणि विसावा आहे. त्याचा सहवास अनुभवण्यासाठी आपण त्याच्या राजासनाजवळ जाऊ या.
पहिले वाचन :यशया २६:७-९,१२,१६-१९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मातीस मिळालेल्यांनो, जागृत व्हा आणि गजर करा.'
धार्मिकाचा मार्ग नीट आहे; तू न्यायपरायण असून तू धार्मिकाची गती सरळ करतोस. हे परमेश्वरा, तुझ्या न्यायमार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करत आहो; तुझ्या नामाची आणि तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जिवाला लागून राहिली आहे. रात्री माझ्या जिवाला तुझी उत्कंठा लागली; मी अगदी अंत:करणपूर्वक तुझा शोध करीन. कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर दृष्टोत्पत्तीस येतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात. हे परमेश्वरा आम्हांसाठी तू शांतता स्थापीत करशील; कारण तू आम्हांसाठी आमची सर्व कार्ये साधली आहेत.
हे परमरेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझ्याकडे दृष्टी फिरवली; त्यांना तुझ्याकडून शिक्षा झाली तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृद्गत तुला कळवले. प्रसूतिकाळ जवळ आलेली गरोदर स्त्री जशी वेणा देते आणि वेदनांनी ओरडते तसे, हे परमेश्वरा, तुझ्या दृष्टीसमोर आम्ही झालो आहे; आम्ही गरोदर होतो, आम्ही वेणा दिल्या, पण आम्ही जसे काय वारा प्रसवलो. आम्ही देशाचा काही उद्धार केला नाही, देशात वस्ती करायला कोणी जन्म पावले नाहीत. तुझे मृतजन जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते उठतील. मातीला मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा; कारण तुझ्यावरील दहिवर, हे प्रभातीचे जीवनदायी दंहिवर आहे; भूमी प्रेते बाहेर टाकील.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Isaiah 26:7-9, 12, 16-19
The path of the righteous is level; you make level the way of the righteous. In the path of your judgments, O Lord, we wait for you; your name and remembrance are the desire of our soul. My soul yearns for you in the night; my spirit within me earnestly seeks you. For when your judgments are in the earth, the inhabitants of the world learn righteousness. O Lord, you will ordain peace for us, for you have indeed done for us all our works. O Lord, in distress they sought you; they poured out a whispered prayer when your discipline was upon them. Like a pregnant woman who writhes and cries out in her pangs when she is near to giving birth, so were we because of you, O Lord; we were pregnant, we writhed, but we have given birth to wind. We have accomplished no deliverance in the earth, and the inhabitants of the world have not fallen. Your dead shall live; their bodies shall rise. You who dwell in the dust, awake and sing for joy! For your dew is a dew of light, and the earth will give birth to the dead
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १०२:१३-२१
प्रतिसाद : परमेश्वराने आपल्या उंच स्थानावरून खाली पाहिले.
१ )हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस;
तुझ्या नामाचे स्मरण पिढ्यान्पिढ्या कायम राहील.
तू उठून सियोनवर दया करशील;
कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे.
नेमलेला समय येऊन ठेपला आहे;
तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहेत;
तिची धूळधाण पाहून ते हळहळतात.
२) राष्ट्रे परमेश्वराच्या नावाला,
पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भितील;
कारण परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे,
तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे.
त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे;
त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही.
३) पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल;
पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेश्वराचे स्तवन करील;
कारण परमेश्वराने आपल्या उच्च
पवित्र स्थानावरून खाली पाहिले.
त्याने आकाशातून पृथ्वीकडे पाहून
बंदिवानांचे सासे ऐकले
ज्यांचे मरण ठरले होते त्यांना सोडवले.
Psalm 102:13-14ab and 15, 16-18, 19-21
The Lord looked down from heaven to the earth.
But you, O Lord, are enthroned forever,
and your renown is from age to age.
You will arise and take pity on Sion,
for this is the time to have mercy;
Behold, your servants love her very stones,
are moved to pity for her dust.
The nations shall fear the name of the Lord,
looked down from heaven to the earth,
and all the earth's kings your glory.
When the Lord shall build up Sion,
he will appear in all his glory.
Then he will turn to the prayers of the helpless;
he will not despise their prayers. R
Let this be written for ages to come,
that a people yet unborn may praise the Lord;
The Lord looked down from his sholy place on high
to hear the groans of the prisoners,
and free those condemned to die. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे
आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
आलेलुया!
Acclamation:
Come to me, all who labour and are heavy laden, and I will give you rest, says the Lond
शुभवर्तमान मत्तय ११:२८-३०
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी मनाचा सौम्य आणि लीन आहे."
येशूने म्हटले, “अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या मनाला शांती मिळेल. कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 11:28-30
At that time lesus declared, "Come to me, all who labour and are heavy laden, and I will give you rest. Take my yoke upon you, and learn from me, for I am gentle and lowly in heart, and you will find rest for your souls, for my yoke is easy, and my burden is light
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आमंत्रण"
शुभवर्तमानामध्ये प्रथमच आपण ऐकतो की, येशू सरळ सरळ आपल्याला आमंत्रण देत आहे. हे साधे आमंत्रण पण खूप काही देऊन जाते. येशू ह्या जगात का आला? त्याला एक महत्वाचे कारण म्हणजे कष्टी, भाराक्रांत लोकांचे भार हलके करण्यासाठी त्यांना विसावा देण्यासाठी. "विसावा" म्हणजे कामापासून दूर, आळशी जीवन हा नाही. विसावा म्हणजे आपले मन, शरीर टवटवीत करणे. माणसात एक शक्ती निर्माण करणे की, जेणेकरून भाराखाली न पडता, उठूनआपले काम आनंदाने करणे. येशू हा मनाचा सौम्य व लिन आहे. तो आपली खूप काळजी घेतो. आपल्यापेक्षा जास्त दुःख त्याने सहन केले आहे, मग आपले अश्रू त्याला कळणार नाहीत काय ? त्याच्या नेतृत्वाखाली आपल्याला जीवन जगायचे आहे. तो आपल्याला मार्ग दाखविल व मार्गदर्शन करील. म्हणून आपण त्याच्याकडे जायला हवे. आपण जेव्हा आजारी, संकटात असतो, तेव्हा आपण सर्व ठिकाणी मदतीसाठी जातो. अपयश आले की, शेवटी येशूकडे येतो हे योग्य नाही. म्हणून आमंत्रणाचा स्वीकार करून, आपला भार घेऊन येशूकडे जायला हवे. तो आपल्याला नक्की विसावा देईल.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या विसाव्यात येण्यास व तुझी माया व कृपा | अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या