Marathi Bible Reading | Wednesday 17th July 2024 | 15th Week In Ordinary Time

सामान्य काळातील पंधरावा आठवडा

बुधवार  १७ जुलै  २०२४ 

 माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे 

All things have been handed over to me by my Father, 

संत आलेक्सियस

वर्तनसाक्षी (५ वे शतक)



आज प्रभू येशू प्रामुख्याने तीन महत्त्वाची सत्ये समजावून सांगत आहे.  पहिले म्हणजे ज्ञानी नव्हे तर साध्या, भोळ्या आणि नम्रवृत्तीच्या माणसांनाच  देवाच्या शहाणपणाचा आणि सत्याचा उलगडा होत असतो. दुसरे सत्य म्हणजे  प्रकटीकरण पित्या परमेश्वराने केवळ येशू ख्रिस्ताद्वारेच केलेले आहे आणि सर्वं  अद्भुत कृत्ये करण्याचे सामर्थ्य येशूलाच देण्यात आले आहे. तिसरे सत्य  माणजेच त्याची इच्छा असणाऱ्या निवडलेल्यांनाच देवाचे प्रकटीकरण होत 
असते. आपण आज प्रभू येशूने दिलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टींवर चिंतन करु या.

पहिले वाचन :यशया १०:५-७,१३-१६
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
सोटाआपणास हाती धरणाऱ्याला गरगर फिरवी ल काय?

परमेश्वर म्हणतो, “जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे त्या असिरियाचा धिक्कार असो. मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधाला पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मालमत्तेचा अपहार करावा आणि त्यांना रस्त्यावरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबधाने त्यांना आज्ञा करीन. तथापि त्याचा विचार काही असा नाही; त्यांच्या मनाचा समज असा नाही, कारण केवळ नासधूस करावी, बहुत राष्ट्रांची कत्तल करावी हेच त्याच्या मनात आहे."
परमेश्वर म्हणतो, “माझ्याच बाहुबलाने आणि माझ्या स्वतःच्या अकलेने हे मी केले आहे, मी चतुर आहे; मी राष्ट्रांच्या सीमा फिरवल्या आहेत आणि त्यांची भांडारे लुटली आहेत; बलाढ्य वीराप्रमाणे मी तक्तांवर बसलेल्यांना ओढून काढले आहे. पक्ष्यांच्या कोटराप्रमाणे राष्ट्राचे धन माझ्या हाती लागले आहे; पक्ष्यांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे सर्व पृथ्वी मी हस्तगत केली आहे; तेव्हा कोणी पंख फडफडावले नाहीत, तोंड उघडले नाही, चिवचिव केले नाही."
कुऱ्हाडीने तोडणाऱ्यापुढे कुऱ्हाड घमेंड करील काय? करवत, आपणाला चालवणाऱ्या पुढे, आढ्यता मिरवील काय? सोट्याने, आपणास हाती धरणाऱ्याला गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतराला उचलावे तसा मी आहे. यास्तव प्रभो, सेनाधीश प्रभो, त्याच्या पुष्ट जणांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Isaiah 10:5-7, 13-16

Thus says the Lord: Woe to Assyria, the rod of my anger, the staff in their hands is my fury! Against a godless nation I send him, and against the people of my wrath I commend him, to take spoil and seize plunder, and to tread them down like the mire of the streets. But he does not so intend, and his heart does not so think; but it is in his heart to destroy, and to cut off nations not a few, For he says: "By the strength of my hand I have done it, and by my wisdom, for I have understanding: I remove the boundaries of peoples, and plunder their treasures; like a bull I bring down those who sit on thrones. My hand has found like a nest the wealth of the peoples, and as one gathers eggs that have been forsaken, so I have gathered all the earth; and there was none that moved a wing or opened the mouth or chirped." Shall the axe boast over him who hews with it, or the saw magnify itself against him who wields it? As if a rod should wield him who lifts it, or as if a staff should lift him who is not wood! Therefore the Lord God of hosts will send wasting sickness among his stout warriors, and under his glory a burning will be kindled, like the burning of fire.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९४:५-६, ७-८, ९-१०,१४-१५

प्रतिसाद :   परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.

१ )हे परमेश्वरा,
ते तुझ्या लोकांचा चुराडा करतात.
तुझ्या वतनाला पीडतात. 
ते विधवा आणि उपरी ह्यांचा जीव घेतात, 
अनाथांना ठार मारतात.

२) ते म्हणतात, “परमेश्वर पाहत नाही, 
याकोबचा देव लक्ष देत नाही.” 
अहो, पशुतुल्य लोकहो, लक्ष द्या; 
मूर्खानो, तुम्ही कधी शहाणे व्हाल ?

३) ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही काय ? 
ज्याने डोळा बनवला तो पाहणार नाही काय ? 
जो राष्ट्रांचा शास्ता, मानवांचा ज्ञानदाता, 
तो शासन करणार नाही काय ?

४ )कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही; 
तो आपले वतन सोडून देणार नाही. 
न्याय नीतिमानाकडे वळेल आणि 
सरळ मनाचे सर्व जन त्याला अनुसरतील..

Psalm 94:5-10, 14-15

The Lord will not abandon his people. 
They crush your people, Lord; 
and they humble your inheritance. 
They kill the widow and the stranger, 
and murder the fatherless child. R 

And they say, "The Lord does not see, 
the God of Jacob pays no heed."
Mark this, you senseless people, 
fools, when will you understand? R

Can he who planted the ear not hear? 
Can he who formed the eye not see?
Will he who trains the nations not punish? 
Will he who teaches man not have knowledge? R

The Lord will not abandon his people, 
nor forsake those who are his heritage; 
for judgment shall again be just, 
and all true hearts shall uphold it. R



जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, 
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
 आलेलुया!

Acclamation: 
Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom. 

शुभवर्तमान मत्तय ११:२५-२७
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"ज्ञानी लोकांपासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांस प्रकट केल्या."

येशू बोलू लागला: “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या; खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रावाचून व ज्या कोणाला त्याला प्रकट करावयाची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading 

Matthew 11:25-27


At that time Jesus declared, "I thank you, Father, Lord of heaven and earth, that you have hidden these things from the wise and understanding and revealed them to little children; yes, Father, for such was your gracious will. All things have been handed over to me by my Father, and no one knows the Son except the Father, and no one knows the Father except the Son and anyone to whom the Son chooses to reveal him."

 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनबालकासमान वृत्ती”

प्रभू येशू स्वर्गीय पित्याचे स्तवन करीत आहे. चारही शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू प्रार्थना करताना दाखवलेला आहे. आध्यात्मिक सत्य पित्याने आपल्या जवळ गुप्त ठेवले होते. आध्यात्मिक सत्य समजण्याचा एकच मार्ग होता. तो म्हणजे विश्वासाने देवाकडे येणे. हे साहजिकच आहे की, जो माणूस स्वतःला ज्ञानी व विचारवंत समजतो, व स्वतःवर ज्याचा जास्त भरवसा आहे तो देवापासून दूरच राहणार. संत पॉल म्हणतो, जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवितात. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव करीत नाहीत. त्यांना ज्ञान प्राप्त होत नाही. (रोम १:१८-२२) म्हणून आध्यात्मिक सत्य व देवाची योजना ही ह्या ज्ञानी लोकांपासून गुप्त ठेवण्यात आली. पण ज्यांनीदेवावर भरवसा ठेविला, त्यांना देवाने हे सत्य सांगितले. देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे. ती अशासाठी की, आपण तिचा योग्य तो वापर करावा. जे सत्य आहे ते शोधावे, स्वतःला देवापेक्षा अधिक कधीच समजू नये. आपण देवाकडून आलो आहोत व परत आपण देवाकडे जाणार हा विचार करून नम्रतेने जीवन जगायला हवे.

प्रार्थना : हे प्रभो, नम्रतेने व प्रामाणिकपणे तुला ओळखण्यास व खरे ख्रिस्ती  जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या