सामान्य काळातील पंधरावा आठवडा
मंगळवार १६ जुलै २०२४
मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमाला तुझ्यापेक्षा सोपे जाईल.
I tell you that it will be more tolerable on the day of judgment for the land of Sodom than for you."
कार्मेलाईट संस्थेचा संस्थापक संत सायमन स्टॉक (सण १६ मे) ह्यांनी आपल्या संस्थेचा चाललेला छळ रोखण्यासाठी पवित्र मरियेकडे संरक्षणाचे साकडे घातलेले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इ. स. १२५१ साली इंग्लडमधील केंब्रिज ह्या ठिकाणी पवित्र मरियेने या वृद्ध सत्पुरुषाला दर्शन दिले आणि त्यांना तपकिरी रंगाची बेंतीण दिली. त्यावरून ख्रिस्तसभेत पवित्र मरिया ही “बेंतीणीची राणी ” म्हणून ओळखली जाऊ लागली व बेंतीण हा ख्रिस्ती परंपरेचा एक भाग बनली. प्रथम ख्रिस्तशरीर स्वीकारणाऱ्या मुलांचे सर्व वाईटांपासून रक्षण व्हावे म्हणून त्यांना बेंतीण देण्यात येते.
संत सायमन स्टॉक ह्यांना पवित्र मरियेने बेंतीण देतेवेळी अशी शाश्वतीदेखील दिली की, जो कोणी ही बेंतीण अत्यंत श्रद्धेने आणि मातेच्या वात्सल्याने आपल्याकडे बाळगील त्या व्यक्तीला पवित्र मरियेच्या मध्यस्थीचा विशेष लाभ होईल. तसेच मरणाच्या वेळी त्याला खास असे संरक्षण देण्यात येईल आणि अनंत यातनांपासून त्यांचे रक्षण करण्यात येईल.
एलिया संदेष्ट्याने कार्मेल नावाच्या पर्वतावर प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन जगाला घडविले ती कथा १ राजे अध्याय १८ मध्ये वर्णन करण्यात आलेली आहे. शिवाय पॅलेस्टाईनमधल्या या कार्मेल पर्वतावर अनेक प्राचीन मठवासियांचे वास्तव्य होते, त्यामुळे हा पर्वत पवित्र भूमी म्हणून गौरविला गेला आहे. १३ व्या शतकात सारासीन लोकांनी मोठे हत्याकांड घडवून आणल्यामुळे सायमन स्टॉक ह्यांच्या मठवासियांनी कार्मेल पर्वतावरून पलायन केले आणि एकांतवासाऐवजी लोकांतवासाची परंपरा अंगिकारली. काही उपासतापासाचे आणि मौनाचे कडक कायदे त्यांनी शिथिल केले.
चिंतन: पवित्र मरियेने या जगासाठी मध्यस्थी केली नसती तर हे जग कधीच नष्ट झाले असते. - संत फ्रुमेन्शिअस यूड्स
पहिले वाचन ::यशया ७:१-९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तुम्ही भाव ठेवला नाही, तर तुमचा निभाव लागणार नाही. "
यहुदाचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जिया याच्या काळी असे झाले की, अरामचा राजा रसीन अणि इस्राएलचा राजा पेकह बिन रमाल्या हे येरुशलेम बरोबर लढायला चढाई करून गेले; परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही. “अरामची एफ्राइमशी जूट झाली आहे." असे दावीदच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे त्याचे मन आणि त्याच्या लोकांची मने कंपित झाली.
तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, "तू आपला पुत्र शआरयाशूब (अवशेष परत येईल) याला बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जेथे संपतो तेथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजला भेटावयास जा आणि त्याला सांग की, 'सावध हो आणि शांत राहा, भिऊ नकोस; ह्या दोन कोलितांच्या उरलेल्या धुमसणाऱ्या शेपटांमुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन आणि रमाल्याचा पुत्र याच्यामुळे तुझे मन खचू देऊ नकोस.' अराम, एफ्राईम आणि रमाल्याचा पुत्र यांनी तुझ्याविरूद्ध दुष्ट संकल्प केला आहे की, “आपण यहुदावर चालून जाऊन त्यांस धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू, " प्रभू परमेश्वर म्हणतो, हे सफळ व्हावयाचे नाही, हे घडावयाचे नाही. अरामचे शीर दिमिष्क आणि दिमिष्कचे शीर रसीन. (पासष्ट वर्षे झाली नाहीत तोच एफ्राइम भंग पावेल आणि त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही) एफ्राईमचे शीर शोमरोन आणि शोमरोनचे शीर रमाल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवला नाही, तर तुमचा निभाव लागणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Isaiah 7:1-9
In the days of Ahaz the son of Jotham, son of Uzziah, king of Judah, Rezin the king of Syria and Pekah the son of Remaliah the king of Israel came up to Jerusalem to wage war against it, but could not yet mount an attack against it. When the house of David was told, "Syria is in league with Ephraim," the heart of Ahaz and the heart of his people shook as the trees of the forest shake before the wind. And the Lord said to Isaiah, "Go out to meet Ahaz, you and Shear-jashub your son, at the end of the conduit of the upper pool on the highway to the Washer's Field. And say to him, 'Be careful, be quiet, do not fear, and do not let your heart be faint, because of these two smouldering stumps of firebrands, at the fierce anger of Rezin and Syria and the son of Remaliah. Because Syria, with Ephraim and the son of Remaliah, has devised evil against you, saying, "Let us go up against Judah and terrify it, and let us conquer it for ourselves, and set up the son of Tabeel as king in the midst of it," thus says the Lord God: "It shall not stand, and it shall not come to pass. For the head of Syria is Damascus, and the head of Damascus is Rezin. And within sixty-five years Ephraim will be shattered from being a people. And the head of Ephraim is Samaria, and the head of Samaria is the son of Remaliah. If you are not firm in faith, you will not be firm at all."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ४८:२-८
प्रतिसाद : "देव त्याचे नगर सर्वकाळ स्थिर राखील."
१ परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात,
त्याच्या पवित्र पर्वतावर,
तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे;
उच्चतेमुळे सुंदर आणि सर्व पृथ्वीचा आनंद आहे.
२)उत्तर सीमेवरील सियोन डोंगर,
राजाधिराजाचे नगर !
देव त्याच्या प्रासादांमध्ये
आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे.
३ )कारण पाहा, राजे एकत्र झाले
आणि एकजुटीने चढाई करून आले.
हे नगर पाहताच ते विस्मित झाले
आणि घाबरे होऊन पळत सुटले.
४ )तेथे त्यांना कंप सुटला;
त्यांना प्रसुतिवेदनांप्रमाणे वेदना झाल्या.
पूर्वेच्या वाऱ्यांने तार्शिशची गलबते तू. फोडतोस.
Psalm 48:2-3ab, 3c-4, 5-8
God establishes his city forever.
Great is the Lord and highly to be praised
in the city of our God.
His holy mountain rises in beauty,
the joy of all the earth. R
Mount Sion, in the heart of the North,
the city of the Mighty King!
God, in the midst of its citadels,
has shown himself its stronghold.
Behold! The kings assembled;
together they advanced.
They saw; at once they marvelled;
dismayed, they fled in fear. R
A trembling seized them there, anguish,
like pangs in giving birth,
as when the east wind shatters
the ships of Tarshish. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास
माझे अंतःकरण वळव
आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
Today, harden not your hearts, but listen to the voice of the Lord.
शुभवर्तमान मत्तय ११:२०-२४
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“न्यायाच्या दिवशी सोर, सिदोन आणि सदोमास तुमच्यापेक्षा सोपे जाईल. "
ज्या ज्या नगरांमध्ये येशूच्या पराक्रमाची कृत्ये घडली होती. तेथील लोकांनी पश्चात्ताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला : “हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांमध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट आणि राख अंगावर घेऊन पश्चात्ताप केला असता. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. हे कफर्णहूम, तू आकाशापर्यंत चढवला जाशील काय? नव्हे अधोलोकापर्यंत उतरशील. कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सदोमाला तुझ्यापेक्षा सोपे जाईल.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Matthew 11:20-24
At that time Jesus began to denounce the cities where most of his mighty works had been done, because they did not repent. "Woe to you, Chorazin! Woe to you, Bethsaida!For if the mighty works done in you had been done in Tyre and Sidon, they would have
repented long ago in sackcloth and ashes. But I tell you, it will be more bearable on the day of judgment for Tyre and Sidon than for you. And you, Capernaum, will you be exalted to heaven? You will be brought down to Hades. For if the mighty works done in you had been done in Sodom, it would have remained until this day. But I tell you that it will be more tolerable on the day of judgment for the land of Sodom than for you."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: पश्चात्ताप”
पश्चात्ताप न करणाऱ्या खोराजिना व - बेथसैदा ह्या दोन महान शहराविषयी येशू दुःख - व्यक्त करतो. ह्याला एक महत्वाचे कारण - म्हणजे, ख्रिस्त त्यांच्या नगरात होता. देवाचा शब्द येशू त्यांना सांगत होता. पण त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. ख्रिस्ताला स्वीकारण्याची व त्याच्या शिकवणूकीप्रमाणे चालण्याची चांगली संधी त्यांनी गमावली. न्याय केवळ वाईट कृत्य करणाऱ्यावरच असतो असे नाही. तर चांगले न करणाऱ्यावरसुद्धा असतो. सोर व सिदोन ह्यांना ख्रिस्ताचे दर्शन झाले नाही. येशूच्या तोंडातून निघणारे शब्द देखील त्यांना ऐकायला मिळाले नाहीत. ख्रिस्त व त्याची शिकवणूक ह्यांचा स्वीकार करून त्याप्रमाणे चालणे, हे आपले कर्तव्य आहे. देव प्रेमळ आहे. तो आपल्या पापांची क्षमा करतो. उधळ्या - पुत्राप्रमाणे पश्चात्ताप करून देवाकडे वळल्यास तो आपल्याला आलिंगन देण्यास तयार - असतो.
प्रार्थना : हे आमच्या स्वर्गीय पित्या, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला प्रलोभनात पडू देऊ नकोस, तर सर्व प्रकारच्या पापापासून आम्हाला सोडव, आमेन.
0 टिप्पण्या