सामान्य काळातील
विसावा रविवार
१८ऑगस्ट २०२४
जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल.
Whoever eats my flesh and drinks my blood
remains in me and I in him.
Thanks be to God
Thanks be to God
"माझे देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे."
येशू लोकसमुदायांना म्हणाला, "स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे."
तेव्हा यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खावयाला कसा देऊ शकतो ?” ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला नक्कीच सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय, तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही, ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल."
0 टिप्पण्या