सामान्य काळातील विसावा सप्ताह
सोमवार १९ ऑगस्ट २०२४
"पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून गरिबांना दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये."
"If you wish to be perfect, go and sell your possessions and give the money to the poor, and you will have treasure in heaven: then come, follow me
संत जॉन यूड्स- वर्तनसाक्षी (१६०१-१६८०)
इतरांशी कसलाही व्यवहार करण्यापूर्वी त्यांच्या रक्षकदुतांकडे आणि आश्रयदात्या संताकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, ते करीत असलेल्या कार्याद्वारे देवाचा गौरव व्हावा. -संत जॉन यूड्स
सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी जीवनात त्याग हवा. त्याचबरोबर प्रभूच्या मागे जाण्याची म्हणजेच त्याच्या शिकवणूकीचे अनुकरण करण्याची गरज आहे.
✝️
पहिले वाचन : यहेज्केल २४:१५-२४
वाचन :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"यहेज्केल तुम्हांला चिन्हवत होईल. त्याने केले आहे त्याप्रमाणे तुम्ही कराल."
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, "मानवपुत्रा, पाहा, मी तुझ्या नेत्रांना जे प्रिय ते झपाट्यासरशी तुझ्यापासून काढून घेतो, तरी तू शोक करणार नाहीस, रडणार नाहीस, अश्रू गाळणार नाहीस. उसासा मुकाट्याने टाक, मृतांसाठी शोक करू नकोस, डोक्याला शिरोभूषण घाल, पायात जोडा घाल, आपले ओठ झाकू नकोस, सुतकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस." सकाळी मी लोकांत हे म्हणालो आणि संध्याकाळी माझी बायको मेली. तेव्हा मला आज्ञा झाली होती, तसे मी दुसऱ्या दिवशी सकाळी केले.
यावरून लोक मला म्हणाले, "तू हे करतोस त्याचा आम्हाशी काय संबंध आहे ते आम्हाला सांगशील काय ?" मी त्यांना म्हणालो, "परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले आहे की, इस्स्राएल घराण्याला असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जिवाचा जिव्हाळा, असे जे माझे पवित्रस्थान ते मी भ्रष्ट करीन आणि तुम्ही मागे ठेवलेले तुमचे कन्यापुत्र तरवारीने पडतील. मग मी केले आहे तसे तुम्ही कराल. तुम्ही ओठ झाकणार नाही आणि सुतकात लोक अन्न पाठवतात ते तुम्ही खाणार नाही. तुम्ही आपल्या डोक्यांना शिरोभूषण घालाल, पायात जोडा घालाल, तुम्ही शोक करणार नाही, रडणार नाही, तर आपल्या अधर्माने झुराल आणि एकमेकांना पाहून उसासे टाकाल. या प्रकारे यहेज्केल तुम्हांला चिन्हांकित होईल, त्याने केले त्याप्रमाणे तुम्ही कराल. हे घडून येईल तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे."
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Ezekiel 24:15-24
The word of Yahweh was addressed to me as follows, "Son of man,
at a blow I am about to deprive you of the delight of your eyes. But you are not to lament, not to weep, not to let your tears run down. Groan in silence, do not go into mourning for the dead, knot your turban round your head, put your sandals on your feet, do not cover your beard, do not eat the usual food. I told this to the people in the morning, and my wife died in the evening, and the next morning I did as I had been ordered. The people then said to me, 'Will you not explain what meaning these actions have for us?" I replied. The word of Yahweh has been addressed to me as follows, "Say to the House of Israel, the Lord Yahweh says this: I am about to profane my sanctuary, the pride of your strength, the delight of your eyes, the joy of your hearts. Your sons and daughters whom you have left behind will fall by the sword. Then you will do as I have done: you will not cover your beards or eat the usual food; you will keep your turbans on your heads and your sandals on your feet; you will not lament or weep but will waste away for your crimes, groaning among yourselves. Thus Ezekiel is a sign for you. You will do exactly what he has done. And when this happens, you will learn that I am the Lord Yahweh."
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र :अनुवाद ३२:१८-१९,२०,२१
प्रतिसाद : तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास.
१ तुला जन्माला घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाही.
आणि तुला जन्म देणाऱ्या देवाला तू विसरलास.
हे पाहून परमेश्वराला त्याचा वीट आला,
कारण त्याचे पुत्र आणि कन्या ह्यांनी त्याला चीड आणली.
२ मग तो म्हणाला, "मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन.
त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहीन.
कारण ही पिढी अतिशय कुटील आहे,
ही मुले अविश्वसनीय आहेत."
३ त्याच्या तथाकथित देवामुळे त्यांनी मला
ईष्र्येस पेटवले, व्यर्थ वस्तूंच्या योगे त्यानी मला चिडवले,
म्हणून ज्यांचे राष्ट्र नव्हे अशांच्या योगे मी त्यांना ईष्र्येस पेटवीन,
एका मूढ राष्ट्रांच्या योगे त्यांना चिडवीन
Deuteronomy 32:18-19, 20, 21
You forget the God who fathered you.
1 You deserted the Rock, who fathered you;
you forgot the God who gave you birth.
The LORD saw this and rejected them
because he was angered by his sons and daughters.
2. “I will hide my face from them,”
he said, “and see what their end will be; for they are a perverse generation, children who are unfaithful.
3. They made me jealous by what is no god
and angered me with their worthless idols.
I will make them envious by those who are not a people;
I will make them angry by a nation that has no understanding.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, बोल तुझा दास ऐकत आहे, सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
Acclamation:
Blessed are you, Father, Lord of heaven and earth,
that you have revealed to little children
the mysteries of the kingdom.
शुभवर्तमान मत्तय १९:१६-२२
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तूझे असेल नसेल ते विकून गरिबांना दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल.
एकजण येऊन येशूला म्हणाला, "गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे ?" तो त्याला म्हणाला, "मला चांगल्याविषयी का विचारतोस ? चांगला असा एकच आहे. तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ." तो त्याला म्हणाला, "कोणत्या ?” येशू म्हणाला, "खून करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजांऱ्यावर प्रीती कर." तो तरूण त्याला म्हणाला, "मी हे सर्व पाळले आहे, माझ्या ठायी अजून काय उणे आहे?" येशू त्याला म्हणाला, "पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून गरिबांना दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये." पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता बरीच होती.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: Matthew 19:16-22
Now a man came to jesus and asked, 'Master, what good deed must I do to possess eternal life?" Jesus said to him, "Why do you ask me about what is good! There is one alone who is good. But if you wish to enter into lide, keep the commandments. He said, 'Which ones?" Jesus replied, "These: You shall not kill. You shall not commit adultery. You shall not steal. You shall not give false witness. Honour your father and your mother. You shall love your neighbour as yourself. The young man said to him, I have kept all these. What more do I need to dol" Jesus said, "If you wish to be perfect, go and sell your possessions and give the money to the poor, and you will have treasure in heaven: then come, follow me. But when the young man heard these words he went away sad, for he was a man of great wealth.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: मार्ग, सत्य आणि जीवन येशू आहे. जो मरेपर्यंत येशूचा साथ सोडत नाही त्याला येशू सार्वकालिक जीवनाचे वरदान देतो. सार्वकालिक जीवनू येशूकडूनच मिळते. कारण तो जीवनदाता आहे. म्हणून भौतिक सुखांच्या मागे न लागता येशूच्या मागे चालण्यास शिका. सर्व सुखे आपोआप तुमच्या पदरात पडतील. जे येशूचे शिष्य होऊ पाहातात त्या सर्वांस हा संदेश आहे. आज लोक विविध मार्गाने जीवनात परिपूर्णता शोधतात, आनंद शोधतात, समाधान शोधतात. पण येशूच आपल्याला परिपूर्णतेकडे घेऊन जातो याचा आपल्याला विसर पडतो. शुभवर्तमानातील श्रीमंत तरुणाला जीवनात परिपूर्णता प्राप्त करण्याची तीव्र इच्छा होती परंतु येशूच्या मागे जाण्याची त्याची इच्छा नव्हती. येशू ख्रिस्त आपली खरी संपत्ती आहे, खरा खजिना आहे यावर त्याचा विश्वास नव्हता म्हणून तो जीवनात निराश होता. परिपूर्णता आणि सार्वकालीन जीवन देणाऱ्या येशूच्या मागे जाण्यास आपण तयार आहोत का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी शिकवण व तुझी आज्ञा पाळून तुला अनुसरण्यास । आम्हाला कृपा व प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या