Marathi Bible Reading | 15th September 2024 | 24th Sunday in Ordinary Time

सामान्य काळातील 

चोविसावा रविवार 

१५ सप्टेंबर  २०२४

पेत्र त्याला उत्तर देऊन म्हणाला, “आपण ख्रिस्त आहा.”  
Peter answered him, "You are the Christ." 

 “आपण ख्रिस्त आहा.”

 ✝️ 

 तारणाऱ्या प्रभू येशूविषयी भाकित करताना यशया संदेष्टा म्हणत आहे. की देवाचा सेवक दुःख सहन करून देवाच्या आज्ञेचे पालन करणारा असेल. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आत्मत्यागाचा संदेश देऊन आपल्या भावी दुःखसहन आणि मरणाचा उलगडा शिष्यांसमोर करीत आहे, 
देवपित्याची आज्ञा पाळून आत्मत्याग व  क्रुसवरील मरण स्वीकारूनच प्रभू येशूने आपल्या सर्वांना तारण प्राप्ति मिळवून दिली आहे. ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक माणसाला प्रभू येशू आज   म्हणत आहे, " जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग  करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे.” प्रत्येक  ख्रिस्ती माणसासमोर प्रभू येशूने ठेवलेले हे मोठे आव्हान आहे. तीन महत्वाच्याआपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि प्रभू येशूला अनुसरावे. खरे पाहता  आपल्या सर्वांच्या तारणासाठी देवाने त्यांचा एकुलता पुत्र पाठविला प्रभू येशू  ख्रिस्ताने आपल्या सर्वांच्या पापांचा क्रुस वाहिला आणि आत्मत्याग करून प्राण  समर्पित केला. देवाचा आपल्या सर्वावरील महान प्रीतिचा तो कळस आहे.  आपले जर देवावर प्रेम आहे तर आपण त्याची आज्ञा पाळून गोष्टींची पूर्तता करण्यास प्रभू येशू आपल्याला सांगत आहे. आत्मत्याग करावा,
संत याकोब आज सांगत आहे की क्रियेवाचून  आपला विश्वास व्यर्थ आहे. 

✝️
पहिले वाचन : यशया  ५०:५-:९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"मी मारणाऱ्यांपुढे माझी पाठ केली. "
प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत. मी मारणाऱ्यांपुढे पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले, उपमर्द आणि छिःथू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही, मी आपले तोंड गारगोटीसारखे केले, माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरविणारा जवळ आहे. माझ्याबरोबर वाद कोण करणार? आपण समोरासमोर उभे राहू, माझा प्रतिवादी कोण असेल त्याने माझ्यापुढे यावे. पाहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे, तर मला दोषी का ठरवणार?
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Isaiah 50:5-9a

The Lord God has opened my ear, and I was not rebellious; I turned not backward. I gave my back to those who strike, and my cheeks to those who pullout the beard, I hid not my face from disgrace and spitting. But the Lord God helps me; therefore I have not been disgraced, therefore I have set my face like a flint, and I know that I shall not be put to shame. He who vindicates me is near Who will contend with me? Let us stand up together. Who is my adversary? Let him come near to me. Behold, the Lord God helps me; who will declare me guilty?
This is the word of God 

Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र  ११६ :१-९
प्रतिसाद : जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.
१) परमेश्वराचे स्तवन करा.
मी परमेश्वरावर प्रेम करतो 
कारण तो माझी विनवणी ऐकतो.
त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, 
म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन.

२) मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले,
मला अधोलोकांच्या यातना झाल्या, 
मला उपद्रव आणि क्लेश झाले, 
तेव्हा मी परमेश्वराच्या नामाचा धावा करून म्हणालो, 
हे परमेश्वरा, तुला मी विनवतो की, मला मुक्त कर.

३) परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे, 
आमचा देव कनवाळू आहे. 
परमेश्वर भोळ्या माणसांचे रक्षण करतो. 
मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला.

४) तू माझा जीव मरणापासून, 
माझे डोळे अश्रूंपासून, 
माझे पाय ठेचाळण्यापासून रक्षिले आहेत. 
जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.


 Psalm 116:1-2, 3-4, 5-6, 8-9 (R. 9)
I will walk in the presence of the Lord in the land of the living.

I love the Lord, for he has heard 
my voice, my appeal, 
for he has turned his ear to me 
whenever I call. R

They surrounded me, the snares of death; 
the anguish of the grave has found me; 
anguish and sorrow I found. 
I called on the name of the Lord:
 "Deliver my soul, O Lord!"

How gracious is the Lord, and just; 
our God has compassion. 
The Lord protects the simple; 
I was brought low, and he saved me. R

He has kept my soul from death, 
my eyes from tears, and my feet from stumbling. 
I will walk in the presence of the Lord in the land of the living. R

दुसरे वाचन याकोब २:१४-१८
वाचक : याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन
“विश्वासाबरोबर जर कृती नाही तर तो विश्वास निर्जीव आहे."
माझ्या बंधूंनो, माझ्या ठायी विश्वास आहे, असे कोणी म्हणत असून तो कृती करत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारायला समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुम्हामधील कोणी त्यांना म्हणतो, “सुखाने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा," पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर कृती नाही तर तो विश्वास निरर्थक आहे. 
कोणी म्हणेल, तुझ्याठायी विश्वास आहे आणि माझ्याठायी कृती आहेत, कृतीवाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या कृतींनी तुला दाखवीन.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second reading : James 2:14-18

What good is it, my brothers, if someone says he has faith but does not have works? Can that faith save him? If a brother or sister is poorly clothed and lacking in daily food, and one of you says to them, "Go in peace, be warmed and filled," without giving them the things needed for the body, what good is that? So also faith by itself, if it does not have works, is dead. But someone will say, "You have faith and I have works." Show me your faith apart from your works, and I will show you my faith by my works.
This is the word of God 

Thanks be to God 


जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
 स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
 आलेलुया!
Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 Far be it from me to boast except in the cross of our Lord Jesus Christ, by which the world has been crucified to me, and I to the world.

R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मार्क :२७-३५
वाचक: मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी हे अटळ आहे."
येशू आणि त्याचे शिष्य फिलिप्पीमधील कैसरियाच्या आसपास असलेल्या खेड्यापाड्यांत जायला निघाले, तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात ?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “स्नानसंस्कार करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक संदेष्ट्यांतील एक असे म्हणतात.” तेव्हा त्याने त्यांना विचारले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?” पेत्र त्याला उत्तर देऊन म्हणाला, “आपण ख्रिस्त आहा.” तेव्हा माझ्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्याने ताकीद दिली.
तो त्यांना असे शिक्षण देऊ लागला की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलजन, मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, हे अटळ आहे. ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन ते नाकारू लागला. तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो पेत्रला स्पष्ट म्हणाला, "सैताना, माझ्यापुढून चालता हो, कारण तुझा दृष्टिकोन परमेश्वराचा नव्हे तर मनुष्याचा आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:  Mark 8:27-35

At that time: Jesus went on with his disciples to the villages of Caesarea Philippi. And on the way he asked his disciples, "Who do people say that I am?" And they told him, "John the Baptist, and others say, Elijah; and others, one of the prophets." And he asked them, "But who do you say that I am?" Peter answered him, "You are the Christ." And he strictly charged them to tell no one about him. And he began to teach them that the Son of Man must suffer many things and be rejected by the elders and the chief priests and the scribes and be killed, and after three days rise again. And he said this plainly. And Peter took him aside and began to rebuke him. But turning and seeing his disciples, he rebuked Peter and said, "Get behind me, Satan! For you are not setting your mind on the things of God, but on the things of man." And calling the crowd to him with his disciples, he said to them, "If anyone would come after me, let him deny himself and take up his cross and follow me. For whoever would save his life will lose it, but whoever loses his life for my sake and the gospel's will save it.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनयेशू कोण आहे ? हा आजच्या चिंतनाचा विषय आहे. जीवनात सर्वतोपरि एकच मुलभूत प्रश्न आहे. येशू कोण आहे ? किंवा माझ्यासाठी येशू कोण आहे ? यावर आपण काय उत्तर देतो. यावर आपले सार्वकालिक भवितव्य अवलंबून आहे. प्रभू येशूने शिष्यांना दोन प्रश्न विचारले. 
१) लोक मला कोण म्हणून म्हणतात ? 
२) तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? 
पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना शिष्यांनी लोकांची येशूबद्दलची जी मते आहेत ती पाहिली होती. सेवाकार्यात येशूचे अद्भूत चमत्कार व त्यांची शिकवणूक त्यांनी पाहिली होती. आपण एक संदेष्टा आहात. एलिया आहात याबद्दल त्याचे विचार जनमताला एकत्र घेऊन जाणारे होते. दुसऱ्या प्रश्नाला पेत्राने दिलेले उत्तर - "आपण ख्रिस्त आहात.” हा पेत्राला उमगलेला आध्यात्मिक शोध आहे. "ख्रिस्त” हा शब्द "ख्रिस्तॉस” ह्या ग्रीक शब्दापासून मिळालेला आहे. याचा अर्थ अभिषेक केलेला. पेत्राने दिलेला प्रतिसाद म्हणजे आतापर्यंत लोकांची मसीहा बद्दलची जी कल्पना आहे ती केवळ पार्थिव अभिधाने पूरती मर्यादित आहे. पेत्र ही पायरी मागे सोडून त्याही पलीकडे जात आहे. बऱ्याच वेळेला येशूबद्दल आपल्याला केवळ मानवी ज्ञानातून माहीती असते. परंतू मानवी ज्ञान हे पुरेसे नाही. त्यासाठी पेत्राप्रमाणे आध्यात्मिक किंवा ईशज्ञान आवश्यक असते. बऱ्याच वेळेला आपण सुखद अनुभवातून व सर्वकाही आपल्या संकल्पनेनुसार घडले की, येशूची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो. येशूची ओळख मला झाली आहे का ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व तुझे खरे अनुयायी बनण्यास आम्हाला प्रेरणा व बळ दे, आमेन.
✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या