सामान्य काळातील बाविसावा सप्ताह
सोमवार ९ सप्टेंबर २०२४
"आपला हात लांब कर" तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला.
"Stretch out your hand." And he did so, and his hand was restored.
संत पीटर क्लेवर
वर्तनसाक्षी (१५८१-१६५४)
✝️
इ. स. १६१० साली तो मध्य अमेरिकेतील कार्ताजेना येथे येऊन पोहोचला. तेथे त्याला धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली आणि त्यानंतरची ४४ वर्षे त्यांनी निग्रो गुलामांमध्ये कार्य करण्यासाठी त्या मिशनच्या प्रमुख केंद्रात घालविली.
त्यावेळी मध्य अमेरिकेमध्ये गुलामांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय जोरात चालत असे. छोटे मोठे व्यापारी कैद्यांना व आपल्या हाताखालच्या गुलामांना वेस्ट इंडिजच्या व्यापाऱ्यांच्या हाती सोपवीत. मात्र ह्या खरेदी विक्रीतील पिळवणूक इतकी विकोपाला गेलेली होती की उपासमार, चेंगराचेंगरी आणि कुपोषण ह्यामुळे बरेचसे गुलाम मरून जात. तरीही उरलेल्या काही गुलामांकडून मात्र व्यापाऱ्यांना मिळणारा नफा काही कमी नव्हता.
संत पीटर क्लेवर हा त्या काळ्या लोकांच्या जीवनात रस घेऊन त्यांच्या सुखदुःखांचा विचार करणारा पहिला गोरा मनुष्य होता. खरेदी विक्रीच्या वेळी तो जातीने बोटीजवळ उभा राही. आजाऱ्यांना व मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या गुलामांना तो रूग्णाभ्यंग संस्कार देई. भीतीने थरथर कापणाऱ्या निग्रो गुलामांना थोडी फळे व शीतपेये देई. व्यापाऱ्यांचा राग आणि आपल्या उच्च अधिकाऱ्यांचा रोष ओढवून घेऊनदेखील फा. पीटर क्लेवर अत्यंत शांत डोक्याने आपली ख्रिस्ती श्रद्धा पसरविण्यासाठी धडपडत असत.
एका भव्य स्नानसंस्कार विधीच्या वेळी खुल्या मैदानात फा. पीटर ह्यांनी हजारो निग्रोंना व्यक्तिश: मरिया- येशूची मेडल भेट म्हणून दिली. त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत ३००,००० लोकांना त्याने रुग्णसंस्कार, प्रायश्चित्त संस्कार व स्नानसंस्कार दिल्याची नोंद आहे. इतकेच करून ते थांबले नाहीत. परिवर्तन झालेल्या लोकांच्या घरोघरी भेट देणे, त्यांचे विवाहसंस्कार साजरे करणे, त्यांच्या मुलांना स्नानसंस्कार देणे अशी आध्यात्मिक कर्तव्ये त्यांनी अत्यंत तत्परतेने पुढे सुरू ठेवली.
फा. पीटर क्लेवर ८ सप्टेंबर १६५४ साली मरण पावले आणि त्यांना त्यांचे परमस्नेही ब्र. अल्फान्सोस रॉड्रिग्ज (सण ३१ ऑक्टोबर) ह्यांच्यासह १८८८ साली संतपद बहाल करण्यात आले. ते कॅथलिक मिशनचे आश्रयदाते मानले जातात.
प्रभू येशू ख्रिस्त नियमांच्या पलिकडे जाऊन शब्बथाचा अर्थ सांगत आहे. शब्बाथ म्हणजे पवित्र दिवस केवळ प्रार्थना व उपवास करण्याचाच नव्हे तर' सत्कृत्ये आणि सेवा करण्याचा दिवस आहे. परमेश्वराने प्रत्येक दिवस चांगला आणि महान बनविलेला आहे.आपल्या सर्वांना तारण मिळवून देणारा प्रभू येशू आपल्यातील सर्व प्रकारचे अपंगत्व, सर्व उणीवा, आजार व दुबळेपणा पासून मुक्त करु इच्छित आहे. त्याच्या प्रेमाचा करुणेचा व मायेचा आनंद देऊ इच्छित आहे. आपले सर्वस्व परमेश्वराच्या चरणी समर्पित करु या आणि त्याच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करू या.
पहिले वाचन : १करिथ ४:६-१५
वाचन :पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन ५:१-८
"जुने खमीर काढून टाका, कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले."
मला अशी बातमी मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की, जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही. म्हणजे तुम्हातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे. तरीही तुम्ही घमेंड बाळगता ! वास्तविक तुम्ही शोक करायला हवा. हे कर्म करणाऱ्याला आपल्यातून घालवून द्या.
मी शरिराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे, आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे. तो असा की, ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्या माणसाला तुम्ही आणि आपल्या प्रभू येशूच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा ह्यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने देहस्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, म्हणजे आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जाईल.
तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगविते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय ? जुने खमीरकाढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने अथवा वाईटपणा आणि दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर सात्त्विकपणा आणि खरेपणा ह्या बेखमीर भाकरींनी तो पाळावा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : 1 Corinthians 5:1-8
Brethren: It is actually reported that there is sexual immorality among you, and of a kind that is not tolerated even among Gentiles, for a man has his father's wife. And you are arrogant! Ought you not rather to mourn? Let him who has done this be removed from among you. For though absent in body, I am present in spirit; and as if present, I have already pronounced judgment on the one who did such a thing. When you are assembled in the name of the Lord Jesus and my spirit is present, with the power of our Lord Jesus, you are to deliver this man to Satan for the destruction of the flesh, so that his spirit may be saved in the day of the Lord. Your boasting is not good. Do you not know that a little leaven leavens the whole lump? Cleanse out the old leaven that you may be a new lump, as you really are unleavened. For Christ, our Passover lamb, has been sacrificed. Let us therefore celebrate the festival, not with the old leaven, the leaven of malice and evil, but with the unleavened bread of sincerity and truth.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : ५:५-६,७,१२
प्रतिसाद : तू मला आपल्या न्यायपथाने ने.
१ तू दुष्टपणाची आवड धरणारा देव नाहीस,
दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही.
तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणारे नाहीत.
२ सर्व कुकर्मे करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे,
असत्य भाषण करणाऱ्यांचा तू नाश करतोस.
खुनी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.
३ तुझा आश्रय धरणारे सारे हर्ष करोत,
त्यांचे तू रक्षण करतोस म्हणून ते सदा गजर करोत.
ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठायी उल्हासोत.
Psalm 5:5-6, 7, 12
Lead me, Lord, in your justice.
You are no God who delights in evil;
no sinner is your guest.
The boastful shall not stand their ground
before your eyes. R
All who do evil you despise;
all who lie you destroy.
The deceitful and those who shed blood,
the Lord detests. R
All who take refuge in you shall be glad,
and ever cry out their joy.
You shelter them; in you they rejoice,
those who love your name.R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुझे नियम मला समजावून दे म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
आलेलुया!
Acclamation:
My sheep hear my voice, says the Lord; and I know them, and they follow me.
शुभवर्तमान लूक ६:६-११
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशू शब्बाथ दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय हे पाहायला ते टपून राहिले."
एका शब्बाथ दिवशी, येशू सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस आला होता. तेव्हा शास्त्री आणि परुशी त्याच्यावर दोष ठेवायला सापडावा म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या माणसाला बरे करतो की काय हे पाहायला टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, "ऊठ आणि मध्ये उभा राहा." मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य ?" मग त्याने सभोवती त्या सर्वाकडे पाहून त्याला सांगितले, "आपला हात लांब कर" तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. तेव्हा ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे ह्याविषयी ते आपसांत विचार करू लागले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 6:6-11
On another Sabbath, Jesus entered the synagogue and was teaching, and a man was there whose right hand was withered. And the scribes and the Pharisees watched him, to see whether he would heal on the Sabbath, so that they might find a reason to accuse him. But he knew their thoughts, and he said to the man with the withered hand, "Come and stand here." And he rose and stood there. And Jesus said to them, "I ask you, is it lawful on the Sabbath to do good or to do harm, to save life or to destroy it?" And after looking around at them all he said to him, "Stretch out your hand." And he did so, and his hand was restored. But they were filled with fury and discussed with one another what they might do to Jesus.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन : देवाला सर्वच दिवस चांगले असतात. चांगले कार्य करण्यासाठी सर्वच दिवस चांगले असतात. आपला दृष्टीकोन मात्र कसा असतो हा एक मनन चिंतनाचा प्रश्न आहे. सर्वच आजार हे शारिरीक आजार आहेत असे नाही. काही आजार हे "मानवी आदर" याने ग्रासलेले आहेत. एखाद्या उपेक्षितांना साहाय्य केल्याने लोक मला काय बोलतील या भितीने या पिडीत व उपेक्षित बांधवांना मदत करण्यापासून आपण दूर राहतो. प्रभू येशूला मानवी आदर यांचा त्रास झाला नाही. कारण तो निर्भयतेने धैर्याने जे लोक अडथळा आणत होते त्यांचा उघडपणे निषेध करतो. येशू मानवी गोष्टी ऐवजी दैवी गोष्टींना अधिक प्राधान्य देतो. म्हणून तो आजच्या शुभवर्तमानात आव्हानात्मक प्रश्न विचारतो, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव घेणे कि जीव वाचविणे योग्य आहे ? आपल्या जीवनात मी कोणाला संतुष्ट करतो. देवाला की मानवाला ?
प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, नियमांच्या बंधनात अडकून न पडता प्रामाणिकपणे तुला अनुसरण्यास व तुझी कृपा अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या