Marathi Bible Reading | Tuesday 1st October 2024 | 26th Week in Ordinary Time

सामान्य काळातील सविसावा सप्ताह 

मंगळवार १ ऑक्टोबर  २०२४

तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गराज्यात तुमचा प्रवेश कदापि होणार नाही.
Whoever humbles himself like this child is the greatest in the kingdom of heaven. 


बाळ येशूची संत तेरेझा Therese of Lisieux

- कुमारिका (१८७३-१८९७)

खरे मोठेपण मोठमोठ्या गोष्टी करण्यात नसून छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मनाने करण्यात आहे हे तिने आपल्या जीवनाद्वारे दाखवून दिले व साध्याभोळ्या लोकांसमोर एक आगळावेगळा आदर्श उभा केला. "एका आत्म्याची कहाणी" या आत्मचरित्रात्मक लिखाणात तिने ही सत्ये नमूद केलेली आहेत. कोणत्याही गोष्टीविषयी चिंता करू नये, कुरकूर करू नये, आपण सहन करीत असलेले दुःख मुकाट्याने सोसावे, जे आपल्याशी तुसडेपणाने वागतात त्यांना विशेष प्रेम दाखवावे, हसत खेळत सर्वांशी मिळून मिसळून वागावे हे तिच्या जीवनातील काही महत्त्वाचे मूलमंत्र होते.

ख्रिस्तसभा आज विनम्र, बालसदृश्य मनोवृत्ती व प्रीतिने ओतप्रोतभरलेली बाळ येशूची संत तेरेजा हिचा सन्मान करीत आहे. देवावरील निखळ  प्रेम व बाळ येशूविषयी महान भक्ती ह्यामुळे संत तेरेजाचे जीवन प्रार्थनामय  बनले. मिशन विभागात कार्यकरणाऱ्या सर्व धर्मगुरुंना आणि मिशनऱ्यांना  त्यांचे सेवाकार्य करण्यास प्रेरणा व बळ मिळावे म्हणून संत तेरेजाने आपले संपूर्ण जीवन प्रार्थना व त्याग करण्यात घालविले. संत तेरेजाचा आदर्श समोर  ठेवून, नम्र, प्रेमळ आणि प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी आपण मध्यस्थी करु  या.


पहिले वाचन :यशया ६६:१०-१४
वाचन :यशया  या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जशी एखाद्याची आई त्याचें सांत्वन करितें तसें मी तुमचें सांत्वन करीन; "
यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिजवर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिजमुळें उल्लासा; तिजसाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिजबरोबर अत्यंत हर्षित व्हा; म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोखून तृप्त व्हाल, सांत्वन पावाल व तिचें विपुल वैभव भोगून संतुष्ट व्हाल. कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, नदीप्रमाणें शांति व पाण्याच्या पुराप्रमाणें राष्ट्रांचे वैभव मी तिजकडे वाहवितों; तुम्ही स्तनपान कराल, तुम्हांस कडेवर वागवितील, मांडीवर खेळवितील.  जशी एखाद्याची आई त्याचें सांत्वन करितें तसें मी तुमचें सांत्वन करीन; यरुशलेमेंत तुमचे सांत्वन करीन. तें पाहून तुमचें हृदय आनं दित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडें तरतरीत होतील; परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायीं प्रगट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूंवर होईल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Isaiah 66:10-14c "Rejoice with Jerusalem, and be glad for her, all you who love her; rejoice with her in joy, all you who mourn over her; that you may nurse and be satisfied from her consoling breast; that you may drink deeply with delight from her glorious abundance." For thus says the Lord: "Behold, I will extend peace to her like a river, and the glory of the nations like an overflowing stream; and you shall nurse, you shall be carried upon her hip, and bounced upon her knees. As one whom his mother comforts, so I will comfort you; you shall be comforted in Jerusalem. You shall see, and your heart shall rejoice; your bones shall flourish like the grass; and the hand of the Lord shall be known to his servants."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ::१३१:१-३
प्रतिसाद  हे इस्राएला, आतांपासून सर्वकाळ तूं परमेश्वराची आशा धर.

१) हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही,
 माझी दृष्टि उन्मत्त नाहीं आणि 
मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टींत मी पडत नाहीं.

२) खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेविला आहे;
दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असतें
तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बाळका सारखा माझ्या ठायीं आहे.

३) हे इस्राएला, आतांपासून सर्वकाळ तूं परमेश्वराची आशा धर.

 Psalm 131:1, 2, 3 Keep my soul in peace at your side, O Lord. O Lord, my heart is not proud,
nor haughty my eyes.
I have not gone after things too great,
nor marvels beyond me. R Truly, I have set my soul in tranquillity and silence.
As a weaned child on its mother,
as a weaned child is my soul within me.

O Israel, wait for the Lord, both now and forever. R.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
जो कोणी माझ्या नांवाने अशा एखाद्या 
बाळकाला जवळ करतो तो मला जवळ करतो.
 आलेलुया!

Acclamation: 
  Alleluia, alleluia.
Blessed are you Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom.

R. Alleluia, alleluia.
 
शुभवर्तमान  मत्तय १८ : १-५
वाचक :   मत्तयलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 "तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गराज्यात तुमचा प्रवेश कदापि होणार नाही. "
शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “स्वर्गराज्यात सर्वात मोठा कोण ?” तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, “मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गराज्यात तुमचा प्रवेश कदापि होणार नाही. म्हणून जो कोणी स्वतःला ह्या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गराज्यात सर्वात मोठा होय.”आणि जो कोणी माझ्या नांवाने अशा एखाद्या बाळकाला जवळ करतो तो मला जवळ करतो.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Matthew 18:1-5
At that time the disciples came to Jesus, saying, "Who is the greatest in the kingdom of heaven?" And calling to him a child, he put him in the midst of them and said, "Truly, I say to you, unless you turn and become like children, you will never enter the kingdom of heaven. Whoever humbles himself like this child is the greatest in the kingdom of heaven. Whoever receives one such child in my name receives me."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन :
महानता बहुतेक वेळा शक्ती, स्थिती, परिस्थितीशी संबंधीत असते. बाळ येशूच्या संत तेरेजाने व्यक्त केल्याप्रमाणे लहान मार्गाने जगण्यातच खरी महानता आहे. दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यात या प्रकारची महानता येशूने आपल्या सेवाकार्यात सुंदरपणे अधोरेखित केली आहे. फक्त थोडासा द्राक्षरस शिल्लक आहे हे कळविण्यात मरिया मातेची दक्षता पहा. हरवलेल्या एक मेंढराचा शोध घेतला जातो. त्याबद्दलचा दाखला पहा. दहा कुमारीकांचा दाखला पहा. विधवा बाईने आपल्या जवळील दान केलेली दोन नाणी ह्याविषयी दाखला पहा. तरूण मुलाने आपल्याजवळील दिलेल्या पाच भाकरी व दोन मासे हा दाखला पहा. प्रभू येशूच्या वस्रांना स्पर्श केला तरी मी बरी होईन ही प्रबळ इच्छा असलेल्या त्या पिडीत स्त्रीचा दाखला पहा. असे एक ना अनेक छोटे दाखले आपल्या दररोजच्या जीवनात आनंदाने आणि विश्वासूपणे देवाच्या प्रेमात आणि विश्वासात बदलण्यास मदत करते.

प्रार्थना : प्रभू येशू, आमच्याठायी नम्र हृदय निर्माण कर. नि:स्वार्थीपणे तुझी सेवा करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या