सामान्य काळातील २८वा रविवार
१३ऑक्टोबर २०२४
"मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही, देवाला सर्व काही शक्य आहे."With men it is impossible; but not with God: for all things are possible with God.
✝️
देवाच्या सहवासात सर्वकाळचा आनंद, शांती आणि प्रीति वसते. सार्वकालिक जीवन म्हणजे तेथे यातना, दुःख, मरण नाही तर अमरत्वाचे जीवनआहे. देवाच्या शाश्वत आनंदापुढे सर्व काही नगण्य आहे, म्हणूनच शलमोन राजाने देवाकडे विवेक शक्ती आणि देवाचे ज्ञान मागितले. दैवी ज्ञान हे पृथ्वीवरील सर्व धनदौलत, आनंद, सौंदर्य व प्रकाशापेक्षा महान आहे, कारण देवाठायी सर्व गोष्टी शक्य आहेत.
अत्यंत श्रीमंत माणूस देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करीत होता, मात्र जागतिक आणि नाशवंत अशा वैभवाचा त्याग करायला तो तयार नव्हता. ह्या प्रसंगी प्रभू येशूने आपल्या शिष्यांना जागतिक वैभव सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी अडथळा बनू शकते. ह्याची जाणीव करून दिली. जागतिक वैभव केवळ पैसा व धनसंपत्तीच नव्हे, आपले आई वडील, नातलग, मुले, आपले घर-दार, आपली बुध्दीमत्ता, शहाणपण, अधिकार, मान सन्मान अशा सर्व गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या असतात. प्रभूला अनुसरणे कठीण आहे मात्र अशक्य नाही, हे प्रभू आपल्याला सांगत आहे.
प्रभूचे वचन आपल्याला शाश्वती देत आहे की त्याग करणाऱ्या सर्वांना सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.
✝️
0 टिप्पण्या