Marathi Bible Reading |Saturday 12th October 2024 | 27th Week in Ordinary Time

सामान्य काळातील २७वा  सप्ताह 

शनिवार १२ ऑक्टोबर  २०२४

“पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य होत."

Yea rather, blessed are they who hear the word of God, and keep it.

 ✝️ 


धान्य. कार्लो अकुतीस 
 वर्तनसाक्षी 

३ मे १९९१ - १२ ऑक्टोबर २०२० 

 ✝️ 

एका स्त्रिने प्रभू येशूच्या मातेला धन्य  म्हटले होते, मात्र प्रभूने आपल्या मातेचा जणू त्याहिपेक्षा मोठा सन्मान केलेला दिसून येतो. कारण मरिया मातेने खरोखरच देवाचे वचन ऐकले, त्याला प्रतिसाद दिला आणि त्याप्रमाणे ती जीवन जगली. आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा पाया पवित्र शास्त्रातील देवाच्या वचनांवर उभारलेला आहे. देवाची वचने संकटात धीर देतात, बहकलेल्यास सन्मार्गावर आणतात, अंधारात प्रकाश देतात, प्रेम,दया, क्षमा व परोपकार करण्यास प्रेरणा देतात. देवाची वचने ज्ञान, शहाणपण व विवेक शिकवतात. देवाच्या वचनात सामर्थ्य व कृपा आहे. देवाच्या वचनात  तारण आहे.आपणा प्रत्येकाला पवित्र शास्त्र वाचन करण्यास व देवाचा शब्द ग्रहण  करुन त्याप्रमाणे आचरण करण्यास प्रेरणा लाभावी म्हणून प्रार्थना करू या.

✝️
पहिले वाचन : गलतीकरांस पत्र  ३:२२-२९
वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
"तुम्ही सर्व विश्वासाद्वारे देवाचे पुत्र आहात."
शास्त्राने सर्वांना पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ह्यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. हा जो विश्वास प्रकट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे पहाऱ्यात ठेवले होते. ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचविणारे बालरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे, म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही, तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे देवाचे पुत्र आहात, कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये स्नानसंस्कार झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी आणि हेल्लेणी, गुलाम आणि स्वतंत्र, पुरुष आणि स्त्री, हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एक आहा आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर आब्राहामचे संतान आणि अभिवचनाच्याद्वारा वारस आहा.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Galatians 3: 22-29 But the scripture hath concluded all under sin, that the promise, by the faith of Jesus Christ, might be given to them that believe. But before the faith came, we were kept under the law shut up, unto that faith which was to be revealed. Wherefore the law was our pedagogue in Christ, that we might be justified by faith. But after the faith is come, we are no longer under a pedagogue. For you are all the children of God by faith, in Christ Jesus. For as many of you as have been baptized in Christ, have put on Christ. There is neither Jew nor Greek: there is neither bond nor free: there is neither male nor female. For you are all one in Christ Jesus. And if you be Christ’s, then are you the seed of Abraham, heirs according to the promise.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १०५:२-७
प्रतिसाद :प्रतिसाद परमेश्वर आपला करार सर्वकाळ आठवतो.

१.) त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, 
त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा, 
परमेश्वराला शरण जाऊ पहाणारांचे मन आनंदित होवो.

२) परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा, 
त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. 
त्याने केलेली अद्भुतकृत्ये, त्याचे चमत्कार 
आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.

३) त्याचा सेवक आब्राहाम ह्याचे वंशजहो, 
त्याचे निवडलेले याकोबचे वंशजहो, 
तो परमेश्वर आमचा देव आहे: 
साऱ्या  जगावर त्याची सत्ता चालते.

 Psalms 105: 2-3, 4-5, 6-7 R. (8a) The Lord remembers his covenant for ever. or R. Alleluia. 2 Sing to him, yea sing praises to him:
relate all his wondrous works. 3 Glory ye in his holy name:
let the heart of them rejoice that seek the Lord. R. The Lord remembers his covenant for ever. or R. Alleluia. 4 Seek ye the Lord, and be strengthened:
seek his face evermore. 5 Remember his marvellous works which he hath done;
his wonders, and the judgments of his mouth. R. The Lord remembers his covenant for ever. or R. Alleluia. 6 O ye seed of Abraham his servant;
ye sons of Jacob his chosen. 7 He is the Lord our God:
his judgments are in all the earth. R. The Lord remembers his covenant for ever. or R. Alleluia.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे 
आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. 
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
Blessed are those who hear the word of God and observe it.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक   ११:२७-२८
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ज्या उदराने तुझा भार वाहिला ते धन्य, पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात ते अधिक धन्य होत. "
येशू ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, "ज्या उदराने तुझा भार वाहिला आणि ज्या स्तनातून तू स्तनपान केलेस ती धन्य." परंतु तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य होत."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 11: 27-28 And it came to pass, as he spoke these things, a certain woman from the crowd, lifting up her voice, said to him: Blessed is the womb that bore thee, and the paps that gave thee suck. But he said: Yea rather, blessed are they who hear the word of God, and keep it.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:आपल्या मालमत्तेचे रक्षण करणारा बलवान माणूस पराभूत आणि लुटला जाऊ शकतो. परंतु देवाच्या वचनाचे रक्षण करणारा विश्वासू शिष्य आशीर्वादित होईल. माझे शरीर शुद्ध, माझे मन प्रामाणिक आणि माझे हृदय खुले व असुरक्षित ठेवण्याच्या इच्छेने मी देवाच्या वचनाचे निष्ठेने रक्षण करत आहे का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, सार्वकालिक जीवन देणाऱ्या अमर वचनांची गोडी आम्हास लागावी व त्याप्रमाणे आचरण करता यावे म्हणून आम्हाला कृपा दे,  आमेन..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या