Marathi Bible Reading |Friday 25th October 2024 | 29th Week in Ordinary Time

सामान्य काळातील २९वा  सप्ताह 

शुक्रवार २५ ऑक्टोबर  २०२४

 न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि शिपाई तुला तुरुगांत टाकील. मी तुला सांगतो, पै न पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणार नाहीस. I tell you, you will never get out until you have paid the very last penny.

 ✝️ 



संत क्रिस्पीन व क्रिस्पीनियन

- रक्तसाक्षी (३०४) ३०४

दुसऱ्या शतकाच्या मध्यंतरी रोम शहरातून फ्रान्समध्ये गॉल शहरात क्रिस्पीन आणि क्रिस्पीनियन हे दोघे बंधू येशूची सुवार्ता सांगण्यासाठी येऊन पोहचले. खरे पाहता ते सरदार सेनापतींच्या खानदानी घराण्यात जन्मलेले होते.
गॉलमध्ये आल्यानंतर सोईसोन्स या ठिकाणी त्यांनी आपला मुक्काम ठोकला आणि दिवसा जाहीरपणे ख्रिस्ताची सुवार्ता पसरू लागले. संत पौलप्रमाणे ते देखील रात्रीच्यावेळी वहाणा तयार करण्याचा चांभारकीचा धंदा करत. तेथील रहिवाश्यांच्या जीवनावर क्रिस्पीन बंधूंच्या प्रेमाचा, उदार मनाचा, त्यागी व विरक्त वृत्तीचा आणि साध्वी जीवनाचा पगडा बसला, त्यामुळे असंख्य लोकांनी तात्काळ ख्रिस्ती श्रद्धेला मिठी मारली.
गॉल या ठिकाणी त्याने अशा प्रकारे बरीच वर्षे सुवार्ता प्रसार केला परंतु एके दिवशी ही गोष्ट सम्राट मॅक्सिमियन ह्यांच्या कानावर गेली. क्रिस्पीन आणि क्रिस्पीनियन ह्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. क्रौर्याचा कळस समजली जाणारी शिक्षा देण्यात कुप्रसिद्ध असलेले रिक्टीयस वारूस ह्या ख्रिस्तद्वेषी माणसाच्या हाती त्यांना सोपविण्यात आले. त्यांना ठार मारण्यासाठी त्यांनी त्यांना नदीच्या खोल पात्रात फेकून दिले. उकळत्या तेलाच्या कढईत त्यांना ढकलून दिले परंतु पाणी किंवा अग्नी त्यांना नष्ट करू शकले नाहीत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतापर्यंत अशा प्राणघातक शिक्षेतून एकही गुन्हेगार सुखरूप बाहेर पडलेला नव्हता. क्रिस्पीन बंधूंच्या बाबतीत घडत असलेली अद्भूतकृत्ये पाहून रिक्टीयस वारूस हा क्रूरकर्मी इतका बिथरून गेला आणि निराश झाला की त्याने स्वतःस क्रिस्पीन बंधूसाठी तयार केलेल्या अग्नीत झोकून दिले.
ही गोष्ट राजा मॅक्सिमियन याला देखील हादरा देणारी होती. पुढचे आणखी काही बरेवाईट होण्याआधी त्यांचा काटा काढावा म्हणून त्यांचा तरवारीने शिरच्छेद करण्यात आला.
चांभार, चामड्याची इतर कामे करणाऱ्यांचे हे दोघे आश्रयदाते संत मानले जातात. संत एलिझियुस (सण १ डिसें.) ह्यांनी त्यांच्या थडग्यावर तीर्थस्थान उभारले.
✝️   
आज आपण आग, शांतता व फूट ह्या प्रभू येशूच्या शब्दावर मनन चिंतन करू या. प्रभू येशू सांगत आहे की, मी पृथ्वीवर आग लावण्यासाठी आले आहे. प्रभू येशूचे हे वाक्य आपल्या मनात एक प्रकारची भीती व शंका निर्माण करणारे आहे. आग ह्या शब्दातच भीती लपलेली आहे आणि प्रभू | येशू कशी काय आग लावणार ही शंका कित्येकांच्या मनात गोंधळ निर्माण करत असते. - परंतु प्रभू येशू ज्या आगी विषयी बोलत आहे ती आग म्हणजे प्रेमाची, शांतीची व सत्याची आग आहे. देव प्रेम आहे. तो शांती आहे आणि तो सत्य आहे. ह्या जगात येण्याअगोदर सर्वत्र वैर, अशांती व असत्याचेच साम्राज्य होते. प्रभू येशू मानव बनून ह्या जगात आला ते केवळ आपल्याला खरे प्रेम व शांती देण्यासाठी आणि आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे तसेच इतरांनाही त्यासाठी मार्गदर्शन करावे. प्रभू येशू आपली हीच इच्छा आज आपणापुढे प्रकट करत आहे. कारण जगात दोन प्रकारचे लोक आहेत, जे देवावर विश्वास ठेवून त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करतात व देवाची सर्वांना ओळख करून देतात. परंतु काही लोक इतरांना वाईट वागणूक देऊन वैर, राग, स्वार्थ ह्याद्वारे जगात अशांती व असत्याचेच साम्राज्य निर्माण करतात. त्याच्या विरोधात प्रभू येशू आपणांस फुटीरतेचा इशारा करतो. आज आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यात जाऊन प्रभू येशूच्या वचनावर थोडा विचार करून आपण आपल्या जीवनाचे परीक्षण करुया की, मी माझ्या कुटुंबात इतरांशी कशाप्रकारे वागतो ? कोणती आग लावतो प्रेमाची, शांतीची अथवा असत्याची ?

पहिले वाचन :इफिसकरांस ४:१-६
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
“एकच शरीर, एकच प्रभू, एकच विश्वास, एकच स्नानसंस्कार.”

जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणाला शोभेल असे चाला, पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखायला झटत जा. तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे तसे शरीरही एकच आहे, आत्माही एकच आहे, प्रभू एकच, विश्वास एकच, स्नानसंस्कार एकच, सर्वांच्यावर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Ephesians 4:1-6

Brethren: I, a prisoner for the Lord, urge you to walk in a manner worthy of the calling to which you have been called, with all humility and gentleness, with patience, bearing with one another in love, eager to maintain the unity of the Spirit in the bond of peace. There is one body and one Spirit—just as you were called to the one hope that belongs to your call—one Lord, one faith, one baptism, one God and Father of all, who is over all and through all and in all.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :स्तोत्र : २४:१-६
प्रतिसाद :  प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत

१. )पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, 
जग आणि त्यात राहणारे सारे लोकही परमेश्वराचेच आहेत. 
कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला,
त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले.

२ )परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल ? 
त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील ? 
ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, 
जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो.

३ )त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. 
आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. 
त्याला शरण जाणारे हेच लोक होत, 
हे याकोबच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले ते हेच.


Psalm 24:1-2, 3-4ab, 5-6 (R. see 6)
R/. These are the people who seek your face, O Lord.

The Lord’s is the earth and its fullness,
the world, and those who dwell in it.
It is he who set it on the seas;
on the rivers he made it firm. R/.

Who shall climb the mountain of the Lord?
Who shall stand in his holy place?
The clean of hands and pure of heart,
whose soul is not set on vain things. R/.

Blessings from the Lord shall he receive,
and right reward from the God who saves him.
Such are the people who seek him,
who seek the face of the God of Jacob. R/.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, 
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत 
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
. Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक १२:५४-५९
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, मग या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही."

येशू लोकसमुदायांना म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, पावसाची सर येत आहे आणि तसे घडते, दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल, असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हांस पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही ?
आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही ? तू आपल्या वादयाबरोबर न्यायाधीशाकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न कर, नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि शिपाई तुला तुरुगांत टाकील. मी तुला सांगतो, पै न पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणार नाहीस.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 12:54-59 At that time: Jesus said to the crowds, “When you see a cloud rising in the west, you say at once, ‘A shower is coming’, and so it happens. And when you see the south wind blowing, you say, ‘There will be scorching heat’, and it happens. You hypocrites! You know how to interpret the appearance of earth and sky, but why do you not know how to interpret the present time? And why do you not judge for yourselves what is right? As you go with your accuser before the magistrate, make an effort to settle with him on the way, lest he drag you to the judge, and the judge hand you over to the officer, and the officer put you in prison. I tell you, you will never get out until you have paid the very last penny.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:
जर गर्दीने हवामानातील बदलाच्या थोड्याशा चिन्हाकडे लक्ष दिले. मग त्यांनी सध्याच्या काळाकडे आणखी लक्ष दिले पाहिजे. सध्याचा काळ देवराज्य जवळ आल्याची चिन्हे म्हणून येशूच्या कार्याचा आणि इशाऱ्यांचा संदर्भ देतो. आपण येशूकडे लक्ष देत आहोत की आपले जीवन देवाशी समेट करत आहे ?
प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, परस्परप्रीतिने सहभागितेचे व प्रेमाचे जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन. '


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या