Marathi Bible Reading |Thursday 24th October 2024 | 29th Week in Ordinary Time

सामान्य काळातील २९वा  सप्ताह 

गुरुवार २४ ऑक्टोबर  २०२४

  “मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते! “I came to cast fire on the earth, and would that it were already kindled!

 ✝️ 


 संत अँथनी मेरी क्लॅरेट
-महागुरू, वर्तनसाक्षी (१८०७-१८७०)
 
✝️   
आज आपण आग, शांतता व फूट ह्या प्रभू येशूच्या शब्दावर मनन चिंतन करू या. प्रभू येशू सांगत आहे की, मी पृथ्वीवर आग लावण्यासाठी आले आहे. प्रभू येशूचे हे वाक्य आपल्या मनात एक प्रकारची भीती व शंका निर्माण करणारे आहे. आग ह्या शब्दातच भीती लपलेली आहे आणि प्रभू | येशू कशी काय आग लावणार ही शंका कित्येकांच्या मनात गोंधळ निर्माण करत असते. - परंतु प्रभू येशू ज्या आगी विषयी बोलत आहे ती आग म्हणजे प्रेमाची, शांतीची व सत्याची आग आहे. देव प्रेम आहे. तो शांती आहे आणि तो सत्य आहे. ह्या जगात येण्याअगोदर सर्वत्र वैर, अशांती व असत्याचेच साम्राज्य होते. प्रभू येशू मानव बनून ह्या जगात आला ते केवळ आपल्याला खरे प्रेम व शांती देण्यासाठी आणि आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे तसेच इतरांनाही त्यासाठी मार्गदर्शन करावे. प्रभू येशू आपली हीच इच्छा आज आपणापुढे प्रकट करत आहे. कारण जगात दोन प्रकारचे लोक आहेत, जे देवावर विश्वास ठेवून त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करतात व देवाची सर्वांना ओळख करून देतात. परंतु काही लोक इतरांना वाईट वागणूक देऊन वैर, राग, स्वार्थ ह्याद्वारे जगात अशांती व असत्याचेच साम्राज्य निर्माण करतात. त्याच्या विरोधात प्रभू येशू आपणांस फुटीरतेचा इशारा करतो. आज आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यात जाऊन प्रभू येशूच्या वचनावर थोडा विचार करून आपण आपल्या जीवनाचे परीक्षण करुया की, मी माझ्या कुटुंबात इतरांशी कशाप्रकारे वागतो ? कोणती आग लावतो प्रेमाची, शांतीची अथवा असत्याची ?

पहिले वाचन :: इफिसकरांस ३:१४-२१

वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 "तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून देवाच्या पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.”

स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक वंशाला ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्यांच्या आत्म्याच्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणांमध्ये तुमच्या विश्वासाच्याद्वारे वस्ती करावी, तुम्ही प्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले असे असून तिची लांबी, रूदी, उंची आणि खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह जाणून घ्यायला आणि बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यायला शक्तीमान व्हावे, अशाप्रकारे तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.
जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यापलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे, त्याला मंडळीमध्ये आणि ख्रिस्त येशूच्या ठायी पिढ्यान्पिढ्या युगानुयुगे गौरव असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
phesians 3:14-21

Brethren: I bow my knees before the Father, from whom every family in heaven and on earth is named, that according to the riches of his glory he may grant you to be strengthened with power through his Spirit in your inner being, sc that Christ may dwell in your hearts through faith that you, being rooted and grounded in love, may have strength to comprehend with all the saints what is the breadth and length and height and depth, and to know the love of Christ that surpasses knowledge, that you may be filled with all the fullness of God. Now to him who is able to do far more abundantly than all that we ask or think, according to the power at work within us, to him be glory in the church and in Christ Jesus throughout all generations, for ever and ever. Amen.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : ३२:१-२, ४-५, ११-१२,१८-१९
प्रतिसाद :  परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.

१) अहो, नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा, 
प्रामाणिक स्वभावाच्या माणसांना स्तुतिगान शोभते. 
वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा, 
दशतंतू वाद्यांवर त्याचे गुणगान गा.

२ )कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, 
त्याची सर्व कृती सत्याची आहे. 
त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत, 
परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.

३) परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते, 
त्याच्या मनातील संकल्प पिढ्यान्पिढ्या कायम राहतात. 
ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता 
प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य !

 ४) पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात 
आणि त्याच्या दयेची अपेक्षा करतात, 
त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि 
दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा 
म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.



Psalms   33:1-2, 4-5, 11-12, 18-19 (R. 5b)

R/. The Lord’s merciful love fills the earth.

Ring out your joy to the Lord, O you just;
for praise is fitting for the upright.
Give thanks to the Lord upon the harp;
with a ten-stringed lute sing him songs. R/.

For the word of the Lord is faithful,
and all his works to be trusted.
The Lord loves justice and right,
and his merciful love fills the earth. R/.

The designs of the Lord stand forever,
the plans of his heart from age to age.
Blessed the nation whose God is the Lord,
Yes, the Lord’s eyes are on those who fear him,
who hope in his merciful love,
to rescue their souls from death,
to keep them alive in famine. R/.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात 
मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात..
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
I count everything as loss because of the surpassing worth of knowing Christ Jesus my Lord and be found in him
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक  १२:४९-५३
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “येशू म्हणतो, मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी नव्हे तर फूट पाडण्यासाठी आलो आहे."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते! मला स्नानसंस्कार घ्यायचा आहे आणि तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. मी पृथ्वीवर शांतता देण्यास आलो आहे असे तुम्हांस वाटते काय ? मी तुम्हांस सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास. आतापासून एका घरातील पाच जणांत दोघाविरुद्ध तिघे आणि तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सुन अशी फूट पडेल
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 12:49-53 At that time: Jesus said to his disciples, “I came to cast fire on the earth, and would that it were already kindled! I have a baptism to be baptized with, and how great is my distress until it is accomplished! Do you think that I have come to give peace on earth? No, I tell you, but rather division. For from now on in one house there will be five divided, three against two and two against three. They will be divided, father against son and son against father, mother against daughter and daughter against mother, mother-in-law against her daughter-in-law and daughter-in-law against mother-in-law.”
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतनइफिसकरांच्या पुस्तकातील प्रार्थना अहवाल आपण सर्वांनी समजून घेऊ या. प्रेषित पौलाने दिलेला प्रार्थनेचा अहवाल लोकांना ख्रिस्ती जीवन जगण्यास मदत करतो. प्रार्थना अहवाल प्रेमाची व्याख्या पुन्हा सादर करतो. देवाचे आपल्यावरचे प्रेम, पवित्रतेच्या निवडणुकीत, प्रेमात त्याच्यासमोर पवित्र आणि निर्दोष असणे आवश्यक आहे. प्रार्थनाकृत्याने समाजाची मुळे आणि त्याचा पाया प्रेममय होतो. यहूदी लोक प्रेषित आणि संदेष्टे यांच्या मंदिरात एकत्र वाढतात. हे धैर्य आणि देवाच्या प्रवेशाचे उदाहरण देखील देते. प्रेषित पौलाने देवाच्या कृपेचे कार्य, त्यांच्यासाठी प्रार्थना केल्यामुळे, भक्तगण आशा बाळगून असतात  की, देव त्यांची प्रार्थना विनंती पूर्ण करेल.

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझा तरणदायी प्रकाश आम्हाला दे व तुझ्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यास बळ व प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या