Marathi Bible Reading |Wednesday 23rd October 2024 | 29th Week in Ordinary Time

सामान्य काळातील २९वा  सप्ताह 

बुधवार २३ ऑक्टोबर  २०२४

 ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल 

whomsoever much is given, of him much shall be required:

 ✝️ 


संत जॉन कॅपिस्ट्रान

वर्तनसाक्षी (१३८६-१४५६)

 
✝️   

पहिले वाचन :: इफिसकरांस ३:२-१२
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"ख्रिस्ताचे रहस्य आता प्रकट करून दाखवले आहे आणि तेच अभिवचन परराष्ट्रीय लोकांनाही दिले आहे.'

देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल असे मी पौल गृहीत धरून चालतो. म्हणजे प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे, ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेष्ट्यांना प्रकट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानांस कळवण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की, परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एकशरीर आणि आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत.
    देवाच्या सामर्थ्यांचे करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्याद्वारे मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे. जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व हमीपूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. म्हणून मी विनंती करतो की, तुम्हाप्रीत्यर्थ मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हांला भूषणावह आहेत.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
: Ephesians 3: 2-12
If yet you have heard of the dispensation of the grace of God which is given me towards you:How that, according to revelation, the mystery has been made known to me, as I have written above in a few words; As you reading, may understand my knowledge in the mystery of Christ, Which in other generations was not known to the sons of men, as it is now revealed to his holy apostles and prophets in the Spirit: That the Gentiles should be fellow heirs, and of the same body, and co-partners of his promise in Christ Jesus, by the gospel: Of which I am made a minister, according to the gift of the grace of God, which is given to me according to the operation of his power: To me, the least of all the saints, is given this grace, to preach among the Gentiles, the unsearchable riches of Christ, And to enlighten all men, that they may see what is the dispensation of the mystery which hath been hidden from eternity in God, who created all things: That the manifold wisdom of God may be made known to the principalities and powers in heavenly places through the church, According to the eternal purpose, which he made, in Christ Jesus our Lord: In whom we have boldness and access with confidence by the faith of him.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : यशया १२:२- ३, ४, ५-६
प्रतिसाद : तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल.

१) पाहा, देव माझे तारण आहे, 
मी विश्वास ठेवतो, भीत नाही कारण 
प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे. 
तो मला तारण झाला आहे.
तेव्हा तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल.

२) परमेश्वराला धन्यवाद द्या,
 त्याच्या नावाचा जयघोष करा. 
राष्ट्रांमध्ये त्याची महत्कृत्ये जाहीर करा 
त्याचे नाव थोर आहे अशी वाखाणणी करा. 
परमेश्वरापुढे गायन करा.

३) कारण त्याच्या कृती प्रतापमय आहेत, 
हे साऱ्या जगभर जाहीर होवो. 
अहो सियोननिवासी लोकहो, जयघोष करा, 
गजर करा, कारण इस्राएलचा 
पवित्र प्रभू तुमच्याठायी थोर आहे.


Psalms  Isaiah 12: 2-3, 4bcd, 5-6
R.  You will draw water joyfully from the springs of salvation.

 Behold, God is my saviour, I will deal confidently, 
and will not fear: O because the Lord is my strength, 
and my praise, and he is become my salvation.
 You shall draw waters with joy out of the saviour’s fountains:
R. You will draw water joyfully from the springs of salvation.

 Praise ye the Lord, and call upon his name:
 make his works known among the people: 
remember that his name is high.
R. You will draw water joyfully from the springs of salvation.

Sing ye to the Lord, for he hath done great things: 
shew this forth in all the earth.
Rejoice, and praise, O thou habitation of Sion: 
for great is he that is in the midst of thee, the Holy One of Israel.
R. You will draw water joyfully from the springs of salvation.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, 
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
Stay awake! For you do not know when the Son of Man will come.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक  १२:३९-४८
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल.  "

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. तेव्हा पेत्राने म्हटले, प्रभो, हा दाखला आपण आम्हालाच सांगता की, सर्वांना? तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमील असा विश्वासू आणि विचारशील कारभारी कोण ? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हांस खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात ठरवून तो दास चाकरांना आणि चाकरिणींना मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल. मग तो वाट पाहत नाही अशा दिवशी आणि त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याची जागा नेमील. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील, व ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अपेक्षिले जाईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 12: 39-48 But this know ye, that if the householder did know at what hour the thief would come, he would surely watch, and would not suffer his house to be broken open. Be you then also ready: for at what hour you think not, the Son of man will come. And Peter said to him: Lord, dost thou speak this parable to us, or likewise to all? And the Lord said: Who (thinkest thou) is the faithful and wise steward, whom his lord setteth over his family, to give them their measure of wheat in due season? Blessed is that servant, whom when his lord shall come, he shall find so doing. Verily I say to you, he will set him over all that he possesseth. But if that servant shall say in his heart: My lord is long a coming; and shall begin to strike the menservants and maidservants, and to eat and to drink and be drunk: The lord of that servant will come in the day that he hopeth not, and at the hour that he knoweth not, and shall separate him, and shall appoint him his portion with unbelievers. And that servant who knew the will of his lord, and prepared not himself, and did not according to his will, shall be beaten with many stripes. But he that knew not, and did things worthy of stripes, shall be beaten with few stripes. And unto whomsoever much is given, of him much shall be required: and to whom they have committed much, of him they will demand the more.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतनदेवाची दया ज्यांना माहित नाही आणि त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे ते जाणवत नाही त्यांच्यासाठी भत्ते देते. परंतु सलोखा अशा व्यक्तींसाठी राखीव आहे ज्यांना मोठ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. जे नंतर बेजबाबदारपणे इतरांशी गैरवर्तन करतात आणि त्यांच्या प्रभूने त्यांना दिलेला विश्वास चुकवतात. आजच्या दयाळूपणा, सहिष्णुता आणि चर्चमधील अनैतिकतेच्या दैनंदिन स्मरणपत्रांच्या काळात, अविश्वासू गुलामाची बोधकथा अजूनही ख्रिस्ती लोकांना त्यांच्या नैतिक वचनबद्धतेच्या गांभीर्याची आठवण करून देते

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, मला लाभलेल्या सर्व कृपादानांबद्दल मी तुझे आभार मानतो, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या