सामान्य काळातील २८वा सप्ताह
शनिवार १९ ऑक्टोबर २०२४
कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील. For the Holy Ghost shall teach you in the same hour what you must say.
✝️
क्रूसभक्त संत पॉल
वर्तनसाक्षी (१६९४-१७७५)
इटलीतील लोम्बार्डी येथे राजघराण्यात एका श्रीमंत व्यापाराच्या घरी पॉल फ्रान्सिस दानिएल ह्याचा जन्म झाला. सोळा भावंडांमध्ये तो सर्वात मोठा होता. अतिपवित्र साक्रामेंतासमोर तासन्तास प्रार्थना व मनन-चिंतन करण्याची आवड असलेल्या पॉलला वयाच्या २६ व्या वर्षी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिले. त्यामध्ये त्याने आपल्या दुःखसहनाच्या सन्मानार्थ एक व्रतस्थ जीवन जगणाऱ्यांची संस्था स्थापन करण्याची इच्छा प्रकट केली.इ. स. १७२० साली त्याने आपल्या संघासाठी एक नियमावली तयार केली आणि ती आपल्या बिशपांना दाखविली. बिशपांनी त्याला अनवाणी प्रवास करणाऱ्या क्रूसभक्त आणि येशूच्या दु:खसहनाशी एकरूप होऊ इच्छिणाऱ्या धर्मगुरूंचा झगा प्रदान केला. सात वर्षानंतर त्याला प्रत्यक्ष धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली. ऑर्वेटेलो नजिकच्या माऊंट आर्जेंटारिओ येथे एका मठामध्ये त्याने सांघिक जीवन जगायला सुरुवात केली. त्याला बरेच अनुयायी मिळाले. फा. पॉलना संघाचे एकदाचे सुपिरिअर जनरल निवडण्यात आले आणि तेही मरणापर्यंत.
ह्या नवीन संघामध्ये कार्यूसिअन संघाची विरक्ती आणि येशुसंघाची क्रियाशील सेवावृत्ती ह्यांचा संगम झाला होता.. दुःखसहनाशी एकरुप होऊ इच्छिणारे पॅशनिस्ट फादर्स खरोखरच धार्मिक आणि आध्यात्मिक वृत्तीचे होते. येशूच्या दुःखसहनावर ते तासन्तास मननचिंतन करीत आणि त्याद्वारे हरवलेल्या आत्म्यांना ख्रिस्ताकडे आणीत.
संत पॉलच्या कार्यावर देव प्रसन्न झाला आणि त्याच्या हातून अनेक चमत्कार घडू लागले. पाषाणहृदयी आणि परिवर्तनाची कुठलीही आशा नसलेल्या पाप्यांमध्ये बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य संत पॉलला मिळाले होते. ५० वर्षे त्याने खास इंग्लंडच्या परिवर्तनासाठी प्रार्थना केली आणि तशा परिवर्तनाची शाश्वती येशूने त्याला साक्षात्काराकरवी दिली. खरं पाहता कार्डिनल न्यूमन ह्यांनी कॅथलिक चर्चमध्ये प्रवेश केला.
संत पॉल १८ ऑक्टोबर १७७५ रोजी रोम शहरात मरण पावले.
✝️
देवाच्या ज्ञानाचा, शहाणपणाचा व प्रकटीकरणाचा आत्मा आपल्या सर्वांना लाभावा व त्याचे सामर्थ्य आपण जाणावे असा बोध संत पौल आज करीत आहे.
सांप्रत युगात आपण जीवन जगत असताना येण्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात जाणीव करून देत आहे.
आज विशेष रितीने प्रभू येशू आपल्या सर्वांना त्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देताना म्हणत आहे, “अशा प्रसंगी तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा तुम्हांस शिकविल."
✝️
पहिले वाचन :: इफिसकरांस१:१५-२३
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताने सर्वांवर मस्तक असे व्हावे यासाठी परमेश्वराने त्याला मंडळीला दिले, म्हणून हीच मंडळी त्याचे शरीर होय."
तुमच्या ठायी असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून मीही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून मागतो की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. त्यामुळे तुमचे अंत:चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्यांच्या सामर्थ्यांचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, मालकी सांप्रत, आणि भावी युगातील कोणतेही नाम घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्याला मंडळीला दिले, ही मंडळी हेच त्याचे शरीर.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Ephesians 1: 15-23
Wherefore I also, hearing of your faith that is in the Lord Jesus, and of your love towards all the saints,
Cease not to give thanks for you, making commemoration of you in my prayers,
That the God of our Lord Jesus Christ, the Father of glory, may give unto you the spirit of wisdom and of revelation, in the knowledge of him:
The eyes of your heart enlightened, that you may know what the hope is of the glory of his inheritance in the saints. And what is the exceeding greatness of his power towards us, who believe according to the operation of the might of his power, Which he wrought in Christ, raising him up from the dead, and setting him on his right hand in the heavenly places. Above all principality, and power, and virtue, and dominion, and every name that is named, not only in this world, but also in that which is to come.
And he hath subjected all things under his feet, and hath made him head over all the church,
Which is his body, and the fulness of him who is filled all in all.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :: ८:२- ७
प्रतिसाद : आपल्या हातच्या कलाकृतींवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस.
१ )हे प्रभो, आमच्या स्वामी,
साऱ्या भूतलावर तुझे नाव कितीतरी थोर आहे!
तुझ्या ऐश्वर्याची कीर्ती गगनापर्यंत पोहोचली आहे.
बालके व तान्ही बाळे तुझे गुणगान गातात.
२ )आकाश जे तुझे अंगुलीकार्य,
तू नियोजित केलेला तो चंद्र, ते तारे, हे सगळे मी पाहतो.
तू मर्त्य मानवाची आठवण करावीस,
यत्किंचित मानवजातीची तू पर्वा करावीस तू असा तो कोण ?
३) तरी पण देवापेक्षा तू त्याला किंचित कनिष्ठ केले आहेस.
त्याला गौरव आणि सन्मान यांनी अलंकृत केले आहेस...
आपल्या हातच्या कलाकृतींवर तू त्याला सत्ता दिली आहेस,
सारे काही त्याच्या चरणांपाशी ठेवले आहेस.
Psalms Psalms 8: 2-3ab, 4-5, 6-7
R. You have given your Son rule over the works of your hands.
2 O Lord our Lord, how admirable is
thy name in the whole earth!
For thy magnificence is elevated above the heavens.
3 Out of the mouth of infants and of sucklings thou hast perfected praise, because of thy enemies.
R. You have given your Son rule over the works of your hands.
4 For I will behold thy heavens, the works of thy fingers:
the moon and the stars which thou hast founded.
5 What is man that thou art mindful of him?
or the son of man that thou visitest him?
R. You have given your Son rule over the works of your hands.
6 Thou hast made him a little less than the angels,
thou hast crowned him with glory and honour:
7 And hast set him over the works of thy hands.
R. You have given your Son rule over the works of your hands.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
मी तुझे स्तवन करतो,
हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो,
कारण ह्या गोष्टी तू बालकांना प्रकट केल्या.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
The Spirit of truth will testify to me, says the Lord, and you also will testify.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान लूक १२:८-१२
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा तुम्हांस शिकवील.”
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर स्वीकारतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर स्वीकारील; तसेच जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरूद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरूद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हांला सभा, सरकार, आणि अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे आणि काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्याविषयी काळजी करू नका. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 12: 8-12
And I say to you, Whosoever shall confess me before men, him shall the Son of man also confess before the angels of God. But he that shall deny me before men, shall be denied before the angels of God. And whosoever speaketh a word against the Son of man, it shall be forgiven him: but to him that shall blaspheme against the Holy Ghost, it shall not be forgiven. And when they shall bring you into the synagogues, and to magistrates and powers, be not solicitous how or what you shall answer, or what you shall say; For the Holy Ghost shall teach you in the same hour what you must say.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:पौलाचे इफिसच्या लोकांना संबोधित केलेले आभारप्रदर्शन तीन विभागांमध्ये समजू शकते. प्रथमतः औपचारिक आभार आणि प्रार्थना अहवाल. प्रार्थनेद्वारे संपूर्ण समुदायाची एकता प्रतिबिंबीत करते. दुसरे म्हणजे पौलाच्या मध्यस्थीतील सामग्री. कृपा आणि आशीर्वाद प्रतिबिंबीत करते. ज्यासाठी सर्वांनी देवाकडे मागणे आवश्यक आहे. तिसरे म्हणजे देवाची ऊर्जा देणारी शक्ती उदात्त ख्रिस्तामध्ये प्रकट होत आहे. प्रत्येक गोष्ट येशू ख्रिस्ताच्या जीवनात कशी रुजलेली आहे हे प्रतिबिंबीत करते जे आपल्याला जीवन आणते आणि देवाच्या दैवी योजनेत आपल्याला एकत्र जोडते. पौलाने चित्रीत केल्याप्रमाणे आपण या आभारप्रदर्शनामध्ये विश्वासूपणे भाग घेत आहोत का ?
प्रार्थना :हे पवित्र आत्म्या, ये आणि आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर,
आम्हाला सामर्थ्य बहाल कर, आमेन.

0 टिप्पण्या