Marathi Bible Reading | Thurstday 10th October 2024 | 27th Week in Ordinary Time

सामान्य काळातील २७वा  सप्ताह 

गुरुवार १० ऑक्टोबर  २०२४

तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती उदारहस्ते पवित्र आत्मा देईल ?"how much more will your Father from heaven give the good Spirit to them that ask him?

 ✝️ 



संत फ्रान्सिस बोर्जिया

वर्तनसाक्षी (१५१०-१५७२) )

 ✝️ 

येशुसंघामध्ये राहून संत फ्रान्सिस बोर्जिया ह्याने बरीच प्रगती केली. संत इग्नेशिअसने त्याला प्रथम खडतर मिशन भागात पाठविले. तिथे आपली पात्रता सिद्ध केल्यानंतर त्याला स्पेन, पोर्तुगाल, ईस्ट व वेस्ट इंडिज भागात (कार्यकारी) कमिशनर जनरल म्हणून नियुक्त केले. ह्या कार्यासाठी पुढील सात वर्षे त्याला बराच प्रवास करावा लागला. त्याने बरीच महाविद्यालये उघडली. वीस नवशिष्यालये बांधली आणि सर्वत्र येशूसंघियांसाठी नवनवे मित्र जमविले. येशूसंघियांचे दुसरे जनरल फा. लायनेझ ह्यांनी फ्रान्सिसला १५६१ साली विकर जनरल ही पदवी दिली. चार वर्षानंतर फा. लायनेस ह्यांच्या मृत्यूनंतर फ्रान्सिस जगभरच्या येशूसंधियांचे तिसरे फादर जनरल म्हणून निवडले गेले.त्याच वेळी पोप पायस पाचवे हे संत पीटरच्या आसनावरून ख्रिस्तसभेचा कारभार पाहात होते. धार्मिक सुधारणावादी चळवळीच्या त्या काळात संत चार्ल्स बोरोमियो, संत फिलीप नेरी आणि संत पीटर कनेशिअस सारखे ख्रिस्तसभेचे सरदार पोपमहाशयांना आधार देत होते. त्यात आता फ्रान्सिस बोर्जिया ह्यांची भर पडली.येशूसंघियांचे जनरल या नात्याने संत फ्रान्सिस बोर्जिया ह्यांनी अलिकडेच स्थापन झालेला येशूसंघ नावारूपाला आणला, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम आणि पोलंडसारख्या देशात त्यांनी ३१ नवीन महाविद्यालये स्थापन केली. त्यांच्या  कारकीर्दीत येशुसंघाचे कार्य फ्लोरिडा, मेक्सिको, पेरू आणि क्रेतसारख्या बेटांपर्यंत जाऊन पोहचले. तसेच जपानसारख्या देशात ६६ येशूसंघीय मिशनऱ्यांनी ख्रिस्तसभेच्या वाढत्या वेलीला आपल्या रक्तसाक्षित्वाने सिंचन घातले. 

पोप महाशयांच्या आदेशानुसार स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्ससारख्या देशांशी बोलणी करण्यासाठी जात असताना १० ऑक्टो. १५७२ साली संत फ्रान्सिस बोर्जिया ह्यांना देवाज्ञा झाली. पोप क्लेमेंट दहावे ह्यांनी १६७० साली त्यांना संताच्या मालिकेमध्ये समाविष्ट केले. देऊळमातेने त्यांना पोर्तुगालचा आश्रयदाता संत म्हणून गौरविले आहे.

चिंतन : लोकांनी आपल्याला कसेही वागविले तरी आपण मात्र सत्पथावरील आपला प्रवास थांबविता कामा नये. विशेषत: देवाला प्रसन्न करण्यासाठी आवश्यक तो अभ्यास करीतच राहावे. - संत फ्रान्सिस बोर्जिया

✝️
पहिले वाचन : गलतीकरांस पत्र  ३:१-५
वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला, की, विश्वासपूर्वक श्रवणाने मिळाला ?"

अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, क्रुसावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे ? तुम्हांला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला, की विश्वासपूर्वक श्रवणाने मिळाला, इतकेच मला तुम्हांपासून समजून घ्यावयाचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहा काय ? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर 
आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळून पाहत आहा का ? तुम्ही इतकी दुःखे सोसली हे व्यर्थ झाले का ? ह्याला व्यर्थ कसे म्हणावे? जो तुम्हांला पवित्र आत्मा पुरवतो आणि तुम्हांमध्ये चमत्कार घडवून आणतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक श्रवणाने ?
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Galatians 3: 1-5

O senseless Galatians, who hath bewitched you that you should not obey the truth, before whose eyes Jesus Christ hath been set forth, crucified among you? This only would I learn of you: Did you receive the Spirit by the works of the law, or by the hearing of faith? Are you so foolish, that, whereas you began in the Spirit, you would now be made perfect by the flesh? Have you suffered so great things in vain? If it be yet in vain. He therefore who giveth to you the Spirit, and worketh miracles among you; doth he do it by the works of the law, or by the hearing of the faith?

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  लूक १:६९-७०, ७१-७२, ७३-७५ 
प्रतिसाद   इस्राएलचा देव प्रभू धन्यवादित असो,

१) देवाने आपल्यासाठी आपला सेवक दावीद
 ह्याच्या घराण्यात बलवान उद्धारक
 प्रस्थापित केला आहे. 
हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या
 पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते.

२) आपल्या शत्रूंच्या आणि आपला द्वेष
 करणाऱ्या सर्वाच्या हातून सुटका करावी. 
अशासाठी की, आपल्या पूर्वजांवर 
त्याने दया करावी आणि त्याने आपला पवित्र करार स्मरावा.

३) जी शपथ आपला पूर्वज आब्राहाम
 ह्याच्याशी त्याने वाहिली, ती स्मरावी. 
ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून
 सुटून माझ्यासमोर पवित्रतेने आणि 
नीतीने आयुष्यभर माझी सेवा
 निर्भयपणे कराल, असे मी करीन

 Psalms Luke 1: 69, 70-71, 72, 73-75
R. (68) Blessed be the Lord, the God of Israel; he has come to his people.

And hath raised up an horn of salvation to us,
in the house of David his servant:
R. Blessed be the Lord, the God of Israel; he has come to his people.

As he spoke by the mouth of his holy prophets,
who are from the beginning:
Salvation from our enemies,
and from the hand of all that hate us.
R. Blessed be the Lord, the God of Israel; he has come to his people.

To perform mercy to our fathers,
and to remember his holy testament,
R. Blessed be the Lord, the God of Israel; he has come to his people.

The oath, which he swore to Abraham our father,
he would grant to us,
That being delivered from the hand of our enemies,
we may serve him without fear,
In holiness and justice before him, all our days.

R. Blessed be the Lord, the God of Israel; he has come to his people.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंत:करण वळव. 
आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
Open our hearts, O Lord, to listen to the words of your Son.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक   ११:५-१३
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  "मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुमच्यामधला कोणी एक आपल्या मित्राकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, 'मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही.' पण मित्र आतून उत्तर देईल, 'मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही.' मी तुम्हांला सांगतो, "तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल." मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाते. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो, आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती उदारहस्ते पवित्र आत्मा देईल ?
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 11: 5-13
And he said to them: Which of you shall have a friend, and shall go to him at midnight, and shall say to him: Friend, lend me three loaves, Because a friend of mine is come off his journey to me, and I have not what to set before him. And he from within should answer, and say: Trouble me not, the door is now shut, and my children are with me in bed; I cannot rise and give thee. Yet if he shall continue knocking, I say to you, although he will not rise and give him, because he is his friend; yet, because of his importunity, he will rise, and give him as many as he needeth. And I say to you, Ask, and it shall be given you: seek, and you shall find: knock, and it shall be opened to you. For every one that asketh, receiveth; and he that seeketh, findeth; and to him that knocketh, it shall be opened. And which of you, if he ask his father bread, will he give him a stone? or a fish, will he for a fish give him a serpent? Or if he shall ask an egg, will he reach him a scorpion? If you then, being evil, know how to give good gifts to your children, how much more will your Father from heaven give the good Spirit to them that ask him?
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:पौलाचा भर देवाच्या हस्तक्षेपावर आणि पुढाकारावर आहे. देव जो मुक्तपणे आत्मा देतो. तोराह सुंता पाळण्याने देवाची कृती कशीतरी प्रवृत्त केली गेली पाहिजे ही कल्पना गलतीकर लोकांसमोर स्पष्टपणे हास्यास्पद आहे. कारण प्रतिस्पर्धी मिशनरी त्यांच्या शुभवर्तमानासह घटनास्थळावर येण्यापूर्वीच गलतीकर लोकांनी त्यांच्या जीवनात देवाच्या कार्याचा पुरावा अनुभवला होता. सुंता केवळ आनंदायी विधी पूर्ण करण्यावर आणि लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या जीवनात देवाच्या कृती आणि पुढाकाराला महत्त्व देतो का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याला आम्हामध्ये पाठव, आणि तुला अनुसरण्यास योग्य ती कृपा दे, आमेन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या