Marathi Bible Reading | Wednesday 9th October 2024 | 27th Week in Ordinary Time

सामान्य काळातील २७वा  सप्ताह 

बुधवार ९ ऑक्टोबर   २०२४

तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणाः 'हे पित्या,तुझे नाम पवित्र मानले जावो.तुझे राज्य येवो.Father, may your name be held holy, your kingdom come; 

 ✝️ 


संत जॉन लिओनार्ड

-रक्तसाक्षी (१५४१-१६०९)

 ✝️ 

इटलीतील तुस्कानी शहरात जन्मलेला जॉन अगदी बालपणापासून चिंतनशील आणि प्रार्थनामय जीवन जगत होता. त्यासाठी त्याला एकांतवासाची आवड होती. लुक्का ह्या ठिकाणी एका औषधाच्या दुकानात शिकाऊ कामगार म्हणून काम करीत असतानाच त्याने धर्मगुरुपदाचा अभ्यास पूर्ण केला. गुरुदीक्षेआधीच त्याने मानवी आत्म्याचे तारण व्हावे म्हणून बरेच परिश्रम घेतले. वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांना गुरुदीक्षा देण्यात आली.गुरुदीक्षेनंतर फा. जॉन ह्याने मोठ्या जोमाने व उत्साहाने आपले कार्य सुरू केले. इस्पितळे, तुरुंग, आणि जिथे जिथे शक्य झाले तिथे तिथे तो देवाची सुवार्ता सांगत फिरत असे. धर्मशिक्षण देणे, लोकांना प्रायश्चित्त संस्कार देणे, ह्या सर्व गोष्टी तो मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने करीत असे. मदर ऑफ गॉड धर्मगुरूंच्या संस्थेचा तो संस्थापक मानला जातो.

सुरुवातीला ही संस्था फक्त निवडक प्रापंचिकांची होती. संत जॉनच्या पावित्र्याकडे हे लोक आकर्षिले गेले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली राहणे, त्याला हवे ते सहाय्य देणे आणि विशेषत: पाप्यांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी कार्य करणे ही कामे हे लोक करत होते. त्याचे समकालीन संत फिलीप नेरी, आणि संत जोसेफ कालासान्झ ह्या तिघांची मैत्री अतूट होती.

मिशनकार्य करणाऱ्या धर्मगुरूंच्या (तत्त्वज्ञान व ईशज्ञान) प्रशिक्षणासाठी रोममध्ये रोमन कॉलेज ऑफ प्रोपोगान्डा फिडे (श्रद्धा प्रसार) नावाची मोठी संस्था आहे, ह्या संस्थेच्या स्थापनेमध्ये संत जॉनचा सिंहाचा वाटा आहे, संत जॉनचे कार्य इतके महान होते की पोप लिओ तेरावे ह्यांनी त्याचे नाव रोमनरक्तसाक्ष्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले आणि त्याच्या सन्मानार्थ मिस्साबली अर्पण करण्याची आणि दैनंदिन प्रार्थना म्हणण्याची आज्ञा आपल्या धर्मगुरूंना दिली. अशा प्रकारचा सन्मान फक्त संतपदाला पोहोचलेल्या पोपमहाशयांसाठीच राखून ठेवण्यात आलेला आहे.

. जो माणूस गरजवंतांना आणि संकटात व अडचणीत असलेल्यांना | सर्वतोपरी सहाय्य करतो व त्यांची काळजी वाहतो तो खरा शेजारी होय. आपण | कुणाचेही चांगले शेजारी बनू शकतो. समोरचा माणूस अत्यंत बिकट | परिस्थितीत असताना त्याचे नाव, गाव, जात, पात ह्याविषयी जाणून न घेता त्याला मदत करायची. तो अनोळखी किंवा ओळखीचा पण असू शकतो.

✝️
पहिले वाचन :  गलतीकरांस पत्र  २:१-२,७-१४
वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
"देवाने मला दिलेले कृपादान परराष्ट्रीयांनी ओळखले. "

चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा येरुशलेमला गेलो, मी आपल्याबरोबर तीतलाही घेतलेले होते. मल प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयात घोषणा करत असतो, ती मी त्यांना निवेदन केली, (परंतु जे प्रतिष्ठीत होते त्यांना एकान्ती केली,) नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. तर उलट, जसे सुंता झालेल्या लोकांना सांगण्याचे काम पेत्रकडे सोपवले आहे, तसे सुंता न झालेल्या लोकांना सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे असे त्यांनी पाहिले (कारण ज्याने पेत्राला सुंता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयात प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली) आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा आणि योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर आणि बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. आपण देवाच्या कार्यात सहभागी आहो हे दर्शवावे आणि आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे, मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी अशी त्यांची इच्छा होती आणि मी तर तीच गोष्ट करण्यास उत्कंठित होतो. पुढे केफा अंत्युखियाला आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. कारण याकोबाकडील कित्येकजण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीला बसत असे, परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहुद्यांनीही ढोंग केले, ते इतके की बर्णबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे मी पाहिले तेव्हा सर्वासमक्ष मी केफाला म्हटले, "तू यहुदी असताही परराष्ट्रीयासारखा वागतोस, यहुद्यासारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहुद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे ?”
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Galatians 2:1-2, 7-14
 It was not until fourteen years had gone by that I travelled up to Jerusalem again, with Barnabas, and I took Titus with me too.
 My journey was inspired by a revelation and there, in a private session with the recognised leaders, I expounded the whole gospel that I preach to the gentiles, to make quite sure that the efforts I was making and had already made should not be fruitless.
On the contrary, once they saw that the gospel for the uncircumcised had been entrusted to me, just as to Peter the gospel for the circumcised
 (for he who empowered Peter's apostolate to the circumcision also empowered mine to the gentiles),
 and when they acknowledged the grace that had been given to me, then James and Cephas and John, who were the ones recognised as pillars, offered their right hands to Barnabas and to me as a sign of partnership: we were to go to the gentiles and they to they to the circumcised.
 They asked nothing more than that we should remember to help the poor, as indeed I was anxious to do in any case.
However, when Cephas came to Antioch, then I did oppose him to his face since he was manifestly in the wrong.
Before certain people from James came, he used to eat with gentiles; but as soon as these came, he backed out and kept apart from them, out of fear of the circumcised.
And the rest of the Jews put on the same act as he did, so that even Barnabas was carried away by their insincerity.
When I saw, though, that their behaviour was not true to the gospel, I said to Cephas in front of all of them, 'Since you, though you are a Jew, live like the gentiles and not like the Jews, how can you compel the gentiles to live like the Jews?'
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ११७:१,३
प्रतिसाद   सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.

१) अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, 
अहो सर्व लोकांनो, त्याचे स्तवन करा.

२) त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे 
आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे.


 Psalms 117:1, 2
R. Go out to all the world, and tell the Good News.

1 O praise the Lord, all ye nations: praise him, all ye people.

R. Go out to all the world, and tell the Good News.

2 For his mercy is confirmed upon us: and the truth of the Lord remaineth for ever.

R. Go out to all the world, and tell the Good News.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास 
आणि ते मनापासून पाळल्यास मला शिकव.
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
Blessed are those who hear the word of God and observe it.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक  ११:१-४
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"प्रभो, आम्हांला प्रार्थना करायला शिकवा. "

येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता, ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, "प्रभो, जसे योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणाः 'हे पित्या,
तुझे नाम पवित्र मानले जावो.
तुझे राज्य येवो.
आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे
आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर,
कारण आम्हीही आपल्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 11:1-4
Now it happened that he was in a certain place praying, and when he had finished, one of his disciples said, 'Lord, teach us to pray, as John taught his disciples.' He said to them, 'When you pray, this is what to say: Father, may your name be held holy, your kingdom come; give us each day our daily bread, and forgive us our sins, for we ourselves forgive each one who is in debt to us. And do not put us to the test.'
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतनक्षमा ही तारणाच्या दिवसाच्या अपेक्षित आशीर्वादापैकी एक होती आणि ज्यु शिकवणीप्रमाणे अठरा आशीर्वादापैकी क्षमा सहावी प्रार्थना होती. शिवाय इतरांना क्षमा करण्याच्या गरजेला क्षमा मिळवण्याच्या क्षमतेशी जोडले आहे. "तुझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल शेजाऱ्याला क्षमा कर, म्हणजे तू प्रार्थना करशील तेव्हा तुला क्षमा होईल." (बेनसिरा २८ : २) जो क्षमा करू शकणार नाही तो क्षमा प्राप्त करू शकणार नाही. दया त्याच वाहिनीतून वाहते. क्षमा करण्याची क्षमता हा त्याच भेटवस्तूचा भाग आहे. आपल्याला केवळ दैनंदिन पोषणाचीच नव्हे तर सतत क्षमा करण्याची देखील गरज आहे. आपण या गरजा देवाकडे पूर्ण करू शकतो कारण आपण स्वतःला क्षमा न करण्याचा निर्णय घेतला तरीही क्षमा करणारा पिता म्हणून आपण देवाचा अनुभव घेतला पाहिजे

प्रार्थना : हे आमच्या स्वर्गीय पित्या .... ही प्रार्थना सावकाश व चिंतन करून करावी, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या