Marathi Bible Reading |Tuesday 15th October 2024 | 28th Week in Ordinary Time

सामान्य काळातील २८वा  सप्ताह 

मंगळवार १५ ऑक्टोबर  २०२४

जे आत आहे त्याचा दानधर्म करा आणि पाहा, सर्व काही तुमच्यासाठी आहे." that which remaineth, give alms; and behold, all things are clean unto yo

 ✝️ 


अविलाची संत तेरेजा
- कुमारिका, धर्मपंडिता (१५१५ - १५८२)

 चिंतन : जेव्हा तुम्ही पवित्र ख्रिस्तशरीर स्वीकारता तेव्हा आपल्या शरीराचे डोळे बंद करा आणि आत्म्याचे डोळे उघडा. त्यानंतर आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी प्रभ येशू ख्रिस्त विराजमान झालेला पहा. संत तेरेजा

 ✝️ 

अंतर्मनातील स्वार्थ, अहंकार, द्वेष, राग,  आणि दुष्टपणा भरलेला आहे. त्यांचा शोध घेऊन त्या ठिकाणी प्रेम, क्षमा, शांती व परोपकारी कृती कशी वाढविता येईल ह्यावर चिंतन करण्यास प्रभू आपल्याला आज बोलावित आहे.

आपण केवळ बाह्य कर्मकांडात अडकून न पडता आपल्या अंतर्मनात डोकावून पाहू या. प्रभू येशूचा दिव्य प्रकाश आपल्या अंत:करणात पडावा, सर्व प्रकारच्या दुष्ट व पापी प्रकृतीचा अंधकार दूर व्हावा म्हणून अंतर्मूख बनू या.
✝️   

पहिले वाचन : गलतीकरांस पत्र  ५:१-६
वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे."

स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जोखडाखाली पुन्हा सापडू नका.
पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली तर तुम्हांला ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुंता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्चितार्थाने सांगतो की, तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबध नाहीसा झाला आहे, तुम्ही कृपेला अंतरला आहा, कारण आपण आत्म्याच्याद्वारे विश्वासाने नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहो. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यास किंवा न होण्यास काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्याद्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading Galatians 5: 1-6 Stand fast, and be not held again under the yoke of bondage. Behold, I Paul tell you, that if you be circumcised, Christ shall profit you nothing. And I testify again to every man circumcising himself, that he is a debtor to the whole law. You are made void of Christ, you who are justified in the law: you are fallen from grace. For we in spirit, by faith, wait for the hope of justice. For in Christ Jesus neither circumcision availeth any thing, nor uncircumcision: but faith that worketh by charity.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : ११९:४१,४३-४५, ४७-४८
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो.

१ )हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो. 
तुझ्या वचनानुसार तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो.
तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून 
कधीही नाहीसे होऊ देऊ नकोस, 
कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे.

२) मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन. 
मी राजरोसपणे चालेन, 
कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे.

३) मी तुझ्या आज्ञांत आनंद मानीन, 
त्या मला प्रिय आहेत तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत 
म्हणून मी आदराने आपले हात उंचावीन 
आणि तुझ्या नियमांचे मनन करीन

 Psalms Psalms 119: 41, 43, 44, 45, 47, 48 R. (41a) Let your mercy come to me, O Lord. 41 Let thy mercy also come upon me, O Lord:
thy salvation according to thy word. R. Let your mercy come to me, O Lord.
43 And take not thou the word of truth utterly out of my mouth:
for in thy words have I hoped exceedingly. R. Let your mercy come to me, O Lord. 44 So shall I always keep thy law, for ever and ever.
R. Let your mercy come to me, O Lord.
45 And I walked at large:
because I have sought after thy commandments. R. Let your mercy come to me, O Lord. 47 I meditated also on thy commandments, which I loved. R. Let your mercy come to me, O Lord.
48 And I lifted up my hands to thy commandments,
which I loved: and I was exercised in thy justifications. R. Let your mercy come to me, O Lord.

5 Who is as the Lord our God,
who dwelleth on high: 6 And looketh down on the low things
in heaven and in earth? 7 Raising up the needy from the earth,
and lifting up the poor out of the dunghill: R. Blessed be the name of the Lord forever. or R. Alleluia.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 

मी परमेश्वराची अपेक्षा करतो, मी त्याच्या वचनाची आशा धरतो.
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
The word of God is living and effective, able to discern reflections and thoughts of the heart.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक  ११:३७-४१
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  "दानधर्म करा म्हणजे सर्व काही तुमच्याकरिता कल्याणदायक होईल."
येशू बोलत आहे इतक्यात एका परुश्याने त्याला आपल्याकडे भोजनाला येण्याची विनंती केली, मग तो आत जाऊन भोजनाला बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून परुश्याला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परुशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता, पण तुमचा अंतर्भाग जुलूम आणि दुष्टपणा ह्यांनी भरला आहे. अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग स्वच्छ केला, त्याने अंतर्भागही स्वच्छ केला नाही काय ? तर जे आत आहे त्याचा दानधर्म करा आणि पाहा, सर्व काही तुमच्यासाठी आहे." 
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 11: 37-41
And as he was speaking, a certain Pharisee prayed him, that he would dine with him. And he going in, sat down to eat. And the Pharisee began to say, thinking within himself, why he was not washed before dinner. And the Lord said to him: Now you Pharisees make clean the outside of the cup and of the platter; but your inside is full of rapine and iniquity. Ye fools, did not he that made that which is without, make also that which is within? But yet that which remaineth, give alms; and behold, all things are clean unto you.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:लूकच्या मते संकटांचे दुहेरी कार्य आहे. एकीकडे, ते येशूच्या त्याच्या काळातील धार्मिक अधिकाऱ्यांसोबतच्या संघर्षाचे स्पष्टीकरण देतात आणि दुसरीकडे ते ख्रिस्ती वाचकांना खोट्या धार्मिकतेच्या सापळ्यात न पडण्याची चेतावणी देतात. येथे शास्रपाठात संकटे ज्यांची धार्मिकता भ्रामक आहे, लोभ, भ्रष्ट्राचार आणि आत असलेली अशुद्धता झाकण्यासाठी झगा म्हणून परिधान केलेली खोटी धार्मिकता त्यांच्याबद्दल निर्णय व्यक्त करते. परुश्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की देवाने संपूर्ण व्यक्ती, आतून आणि बाहेरून निर्माण केली आहे. देव केवळ पवित्रतेच्या विधींचे पालन करण्याशी संबंधित नाही तर हृदयाच्या शुद्धतेशी संबंधित आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, अंत:करणापासून तुझा शोध घेण्यास व शुद्धतेचे जीवन  जगण्यास प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या