Marathi Bible Reading |Wednesday 16th October 2024 | 28th Week in Ordinary Time

सामान्य काळातील २८वा  सप्ताह 

बुधवार १६ ऑक्टोबर  २०२४

कारण वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्याला लावत नाही.”you load men with burdens which they cannot bear, and you yourselves touch not the packs with one of your fingers.

 ✝️ 



संत मार्गारेट मेरी अलाकोक
कुमारिका (१६४७-१६९०)

 ✝️  

सतराव्या शतकामध्ये प्रोटेस्टंट पंथ इंग्लंडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला होता की, त्यामुळे ख्रिस्ती श्रद्धा धोक्यात आलेली होती. दुसरीकडे फ्रान्ससारख्या देशात राजा लुई चौदावा हा भौतिकवादी राजा राज्य करीत असल्याने श्रद्धेची ज्योत क्षीण होत होती. ही ज्योत प्रज्वलित करण्यासाठी देवाने फ्रान्समधील एका व्रतस्थ धर्मभगिनीची निवड केली. तिचं नाव होतं मार्गारेट मेरी अलाकोक.ख्रिस्ताने प्रत्यक्ष आज्ञापिल्याप्रमाणे आपले घरदार सोडून १६७१ साली तिने पर ले मोनिअल येथील विझिटेशन कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. तो दिवस होता संत योहानच्या सणाचा! अगदी सुरुवातीलाच तिला येशूचा साक्षात्कार झाला आणि तिला येशूचा जीवलग शिष्य योहानप्रमाणे येशूच्या उराशी (अतिपवित्र हृदयाजवळ) टेकण्याची संमती खुद्द येशूने दिली.

ख्रिस्त तिला म्हणाला, मानवावरील प्रेमापोटी माझ्या हृदयात प्रेमाचा अग्नि  इतका धगधगतो आहे की, त्यामध्ये आता आणखी प्रीतीच्या ज्वाला समाविष्ट करणे केवळ अशक्य आहे. हे प्रेम आता तू इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे. मी तुला प्रकट करीन त्या महान व अतिमौल्यवान गोष्टी तू लोकांना सांग आणि त्यांच्यात देवधर्माविषयी प्रेम उत्पन्न कर. ह्या अतिमौल्यवान गोष्टींमध्ये सैतानाच्या सामर्थ्यापासून लोकांचा बचाव करण्याचे आणि तारण प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य दडलेले आहे.

मी लोकांवर इतकं प्रेम केले परंतु त्या बदल्यात मला काय मिळाले? तिरस्कार, अपमान, अनादर, कटुता आणि कृतघ्नता. म्हणूनच मी तुला आज्ञा करतो की, कॉर्पुस ख्रिस्ती (ख्रिस्ताच्या शरीर व रक्ता) च्या सणानंतरच्या आठवड्यातील शुक्रवार माझ्या अतिपवित्र हृदयाच्या सन्मानार्थ राखून ठेवला जावा. ह्या दिवशी लोकांनी भाल्यांनी विंधिलेल्या माझ्या घायाळ व रक्तबंबाळ हृदयाकडे पाहून पश्चात्ताप करावा, प्रायश्चित्त करावे आणि परिवर्तनासाठी दृढ निश्चय करावा, व आपल्या छोट्या मोठ्या पापांची भरपाई करावी अशा प्रकारे माझ्या अतिपवित्र हृदयाचा सन्मान करणाऱ्यांना मी विशेष कृपादाने देईन, शिवाय तशी भक्ती करण्यास इतरांना प्रोत्साहन देणाऱ्यांना दैवी प्रेमाची अलौकिक देणगी मी देईन.

प्रभू येशू ख्रिस्ताने तिला असे ठामपणे सांगितले की, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी श्रद्धावंतांनी ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारावा तसेच त्या दिवशी संध्याकाळी अतिपवित्र साक्रामेंत आराधनेसाठी वेदीवर खुले ठेवावे.

शेवटी येशू तिला म्हणाला, “अतिपवित्र हृदयाच्या प्रिय शिष्ये, तू हे सर्व करशील तेव्हा तुला बराच अपमान आणि टीकानिंदा सहन करावी लागेल आणि माझ्या नावासाठी तुला रक्तदेखील सांडावे लागेल" आणि खरेच तिच्या कॉन्व्हेंटमधील इतर भगिनींना वाटले हिला दुष्टात्म्याने पछाडलेले आहे की काय म्हणून त्या तिच्यावर पवित्र पाणी शिंपडत असत.

हळूहळू संत मागरिट मेरी हिचे आध्यात्मिक गुरू धन्यवादित क्लॉड डे ल कोलुम्बीएरे ह्या येशूसंघीय धर्मगुरूंनी तिच्या साक्षात्कारांना अधिकृत मान्यता मिळविण्याचा प्रयत्न केला व अशा प्रकारे येशूच्या अतिपवित्र हृदयाची भक्ती व आराधना पसरली व ख्रिस्तसभेच्या महान परंपरेचा ती एक भाग बनली.

संत मागरिट मेरी हिचा मृत्यू १७ ऑक्टोबर १६९० साली झाला आणि पोप बेनेडिक्ट पंधरावे ह्यांनी तिला १९२० साली संतपदाचा बहुमान दिला.

आपल्या सर्वांना श्रद्धेत टिकून राहण्यासाठी व आव्हानांना सामोरे  जाण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रेरणा व सामर्थ्य लाभावे, व पवित्र आत्म्यानुसार आपले जीवन आपण जगावे म्हणून प्रभूची व पवित्र आत्म्याची आराधना करु  या.


 ✝️ 

संत पौल आपल्याला देहाची कर्मे त्यागून पवित्र आत्म्याची फळे ह्या विषयी बोध करीत असताना म्हणत आहे, “आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालावे" पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व प्रेरणेने जीवनात प्रीति, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासुपणा व इंद्रियदमन ही फळे अनुभवण्यास मिळतात.

प्रभू येशू आज अन्यायी व ढोंगी शास्त्री - परुश्यांचा  निषेध करीत म्हणत आहे,  आपण आपल्या जीवनावर चिंतन करू या की खरोखरच आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने व येशूच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो का ? शास्त्री व परुशी आपल्यामध्ये कुठे दडलेला आहे का ते शोधून काढू या. आपण इतरांच्या जीवनात अडथळा तर निर्माण करीत नाही ना ? आपण खूप धार्मिक व नीतिमान असल्याचा देखावा करतो का ? 
✝️   

पहिले वाचन : गलतीकरांस पत्र  ५:१८-२५ 

वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

" जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार आणि वासना ह्यांच्यासह आपला देहस्वभाव क्रुसावर खिळला आहे."

तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहा तर मग तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, ती हीः जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपुजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा इत्यादी. ह्याविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता परत सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आंनद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार आणि वासना ह्यांच्यासह आपला देहस्वभाव क्रुसावर खिळला आहे.
आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Galatians 5: 18-25
But if you are led by the spirit, you are not under the law. Now the works of the flesh are manifest, which are fornication, uncleanness, immodesty, luxury, Idolatry, witchcrafts, enmities, contentions, emulations, wraths, quarrels, dissensions, sects, Envies, murders, drunkenness, revellings, and such like. Of the which I foretell you, as I have foretold to you, that they who do such things shall not obtain the kingdom of God. But the fruit of the Spirit is, charity, joy, peace, patience, benignity, goodness, longanimity, Mildness, faith, modesty, continency, chastity. Against such there is no law. And they that are Christ’s, have crucified their flesh, with the vices and concupiscences. If we live in the Spirit, let us also walk in the Spirit.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : १:१-४,६
प्रतिसाद :   प्रभो, जो कोणी तुला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.

१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याने चालत नाही,
 पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही 
आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, 
तर तो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो,
 त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. 

२) जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते. 
जे आपल्याला हंगामी फळ देते.
 ज्याची पाने कोमेजत नाहीत. अशा झाडासारखा तो आहे 
आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.

३) दुर्जन तसे नाहीत, 
ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. 
कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, 
पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.

 Psalms 1: 1-2, 3, 4 and 6 R. (Jn 8:12) Those who follow you, Lord, will have the light of life.
1 Blessed is the man who hath not
walked in the counsel of the ungodly,
nor stood in the way of sinners, nor sat in the chair of pestilence. 2 But his will is in the law of the Lord,
and on his law he shall meditate day and night. R. Those who follow you, Lord, will have the light of life.
3 And he shall be like a tree which
is planted near the running waters,
which shall bring forth its fruit, in due season.
And his leaf shall not fall off:
and all whatsoever he shall do shall prosper. R. Those who follow you, Lord, will have the light of life.
4 Not so the wicked, not so:
but like the dust, which the wind driveth from the face of the earth. 6 For the Lord knoweth the way of the just:
and the way of the wicked shall perish. R. Those who follow you, Lord, will have the light of life.


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
प्रभू आपल्या वचनाला जागतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. 
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
My sheep hear my voice, says the Lord; I know them, and they follow me
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक  ११:४२-४६
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
  "तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार !"
येशू परुश्यांना म्हणाला, “तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार आहे कारण तुम्ही पुदिना, सताप, आणि प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय आणि देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करता. ह्या गोष्टी करायच्या होत्या आणि त्या सोडायच्या नव्हत्या. तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार आहे कारण सभास्थानात श्रेष्ठ आसने आणि बाजारात नमस्कार घेणे तुम्हांला आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार आहे कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरीसारखे आहा, त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात."तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणाएकाने त्याला म्हटले, "गुरुजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता.” तो म्हणाला, “तुम्हां शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार आहे कारण वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्याला लावत नाही.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :: Luke 11: 42-46 But woe to you, Pharisees, because you tithe mint and rue and every herb; and pass over judgment, and the charity of God. Now these things you ought to have done, and not to leave the other undone. Woe to you, Pharisees, because you love the uppermost seats in the synagogues, and salutations in the marketplace. Woe to you, because you are as sepulchres that appear not, and men that walk over are not aware. And one of the lawyers answering, saith to him: Master, in saying these things, thou reproachest us also. But he said: Woe to you lawyers also, because you load men with burdens which they cannot bear, and you yourselves touch not the packs with one of your fingers.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:आज आपण शुभवर्तमानात पाहतो की, परुशी न्याय आणि देवावरील प्रेम ह्याबद्दल वाचतो. देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा ह्या दोन महान गोष्टीवर दुर्लक्ष करतात. न्याय आणि देवाच्या प्रेमाकडे दुर्लक्ष करून बाह्य आज्ञाधारकेतेचे निरीक्षण करणाऱ्या धर्मनिष्ठेवर येशूची टीका प्रतिध्वनीत होते. परमेश्वराला तुमच्याकडून न्याय, दयाळूपणा आणि नम्रपणे चालण्याशिवाय काय हवे आहे ? तुझा देव, खरी धार्मिकता इतरांकडून प्रशंसा शोधत नाही. शास्त्री आणिपरुशी हे शुभ्र धुतलेल्या थडग्यांसारखे आहेत. बाहेरून स्वच्छ पण आतमधून भ्रष्ट आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाने येथे समजून घेणे आवश्यक आहे की, हे आपले स्वतःचे प्रेम नाही तर आपल्या जीवनातून देवाचे प्रेम आहे. आपण ते स्वीकारले पाहिजे. त्यातून न्याय मिळतो. ते प्रेम दयाळूपणाकडे नेत आहे. हे आपल्या देवासोबत नम्रपणे चालण्यास प्रवृत्त करते. तीच खरी धार्मिकता.

प्रार्थना :हे पवित्र आत्म्या, आमच्या प्रेरणा व सांत्वनकर्त्या ये आणि आम्हाला 
तुझ्या कृपा वर्षावाने भरून टाक, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या