सामान्य काळातील ३२वा सप्ताह
शनिवार १६ नोव्हेंबर २०२४
✝️
देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा न्याय करणार नाही काय ?And will not God revenge his elect who cry to him day and night: and will he have patience in their regard?
स्कॉटलंडची संत मार्गारेट
राणी (१०४६-१०९३)
संत मागरिट तासन् तास प्रार्थनेमध्ये दंग असे. भोजनानंतर तिने रचलेली प्रार्थना कितीतरी शतके " संत मागरिटचा आशीर्वाद" ह्या नावाने प्रसिद्ध होती. गरिबांची ती व्यक्तिशः सेवा करीत असे. स्कॉटलंडचा राजा आणि राणी मागरिट दिवसाला ३०० भिकाऱ्यांना व गरिबांना अन्न पुरवीत. तेही आपल्या राजवाड्यातील भव्य सभागृहामध्ये !
तिच्या आठ मुलांपैकी दोघे व्रतस्थ जीवन जगणारे भिक्षूक बनले तर इतरांनी आपल्या देशाचे समर्थपणे नेतृत्व केले. तिची मुलगी संत मॅटिल्डा हिचा इंग्लंडचा राजा हेन्री पहिला ह्याच्याशी विवाह झाला. पुढे ती उत्तम राणी मॉड या नावाने इतिहासप्रसिद्ध झाली.
संत मागरिट १६ नोव्हेंबर १०९३ साली मरण पावली. पोप इनोसेंट चौथे ह्यांनी तिला संतपद दिले. ती स्कॉटलंडची आश्रयदाती संत मानली जाते.
चिंतन : हे सर्वसमर्थ परमेश्वरा, माझ्या आयुष्यातील अखेरच्या क्षणी माझ्यावर मोठा कठीण प्रसंग व यातना पाठवून तू आपल्या दयेने मला माझ्या पापांपासून शुद्ध केलेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते. - स्कॉटलंडची संत मार्गारेट
✝️
प्रभू येशू आज म्हणतो की, 'देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात'. आपण सर्वजण देवाची निवडलेली मुले आहोत. देव आपल्यावर प्रेम करतो म्हणूनच रात्रंदिवस त्याचे स्मरण करणे गरजेचे आहे.
पहिले वाचन : : योहानचे तिसरे पत्र १: ५-८
वाचन :योहानचे तिसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“आपण आपल्या भावंडांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.”
प्रिय गायस, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस
ते विश्वासूपणाने करतोस. त्यांनी मंडळींसमोर तुझ्या प्रीतीविषयी
साक्ष दिली. देवाला आवडेल अशा रितीने तू त्यांना वाटेस
लावशील तर बरे करशील. कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून
काहीएक न घेता ख्रिस्ताच्या नामाखाली बाहेर पडले आहेत.
म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :: Third John 1: 5-8
Dearly beloved, thou dost faithfully whatever thou dost for the brethren, and that for strangers, Who have given testimony to thy charity in the sight of the church: whom thou shalt do well to bring forward on their way in a manner worthy of God. Because, for his name they went out, taking nothing of the Gentiles. We therefore ought to receive such, that we may be fellow helpers of the truth.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : ११२:१- ६
प्रतिसाद :परमेश्वराचे भय धरतो तो मनुष्य धन्य !
१) परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो.
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य !
त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल.
सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.
२) धनसंपदा त्याच्या घरी असते,
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते.
सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो.
त्याच्या ठायी कृपा, दया आणि न्याय ही आहेत.
३) जो मनुष्य दया करतो आणि
उसने देतो त्याचे कल्याण होते.
तो न्यायाने आपले व्यवसाय करील,
तो कधीही ढळणार नाही,
नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.
Psalms 112: 1-2, 3-4, 5-6
R. (1a) Blessed the man who fears the Lord.
1 Blessed is the man that feareth the Lord:
he shall delight exceedingly in his commandments.
2 His seed shall be mighty upon earth:
the generation of the righteous shall be blessed.
R. Blessed the man who fears the Lord.
3 Glory and wealth shall be in his house:
and his justice remaineth for ever and ever.
4 To the righteous a light is risen up in darkness:
he is merciful, and compassionate and just.
R. Blessed the man who fears the Lord.
5 Acceptable is the man that sheweth mercy and lendeth:
he shall order his words with judgment:
6 Because he shall not be moved for ever.
R. Blessed the man who fears the Lord.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
आलेलुया!
Acclamation: Alleluia, alleluia.
God has called us through the Gospel, to possess the glory of our Lord Jesus Christ.
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान लूक १८:१-८
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“देवाचे जे निवडलेले लोक त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करील."
त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये, ह्याविषयी येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला, “एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भित नसे आणि माणसाला जुमानत नसे. त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन सांगत असे की, माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण बराच काळापर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील.” तेव्हा प्रभूने म्हटले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा न्याय करणार नाही काय ? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय ? मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. मात्र मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय ?"
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :
Luke 18: 1-8
And he spoke also a parable to them, that we ought always to pray, and not to faint, Saying: There was a judge in a certain city, who feared not God, nor regarded man. And there was a certain widow in that city, and she came to him, saying: Avenge me of my adversary. And he would not for a long time. But afterwards he said within himself: Although I fear not God, nor regard man, Yet because this widow is troublesome to me, I will avenge her, lest continually coming she weary me. And the Lord said: Hear what the unjust judge saith. And will not God revenge his elect who cry to him day and night: and will he have patience in their regard? I say to you, that he will quickly revenge them. But yet the Son of man, when he cometh, shall he find, think you, faith on earth?
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आपण सातत्याने प्रार्थना करावी व आपण कधीही खचून जाऊ नये म्हणून प्रार्थना आपला विश्वास बळकट करत असते. जशी विधवा बाई सातत्याने न्यायाची मागणी करत असते व तिची मागणी पूर्णत्वास जाते तसेच आपण जर, सातत्याने प्रार्थना केली तर आपल्याला देवाच्यायोग्य त्या देणग्या मिळतील. तो न्यायाधीश जसा त्या विधवेचा प्रश्न सोडवतो तसेच आपल्या सततच्या प्रार्थनेने आपली योग्य ती भरभराट होईल. त्या विधवेनूसार आपला विश्वास दृढ होऊन नेहमी प्रार्थनेचे साहाय्य आपण घ्यावे. आपला विश्वास दृढ करण्यास आपल्याला प्रेरणा मागू या.
प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या अस्तित्वाची व प्रेमाची जाणीव सदैव आम्हास व्हावी व तुझ्या सहवासाचा अनुभव यावा म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन...

0 टिप्पण्या