सामान्य काळातील ३३ वा रविवार
१ ७ नोव्हेंबर २०२४
✝️
“तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने व वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल. "
then shall they see the Son of man coming in the clouds, with great power and glory.
आज वाचनात दानीएल संदेष्टा येणाऱ्या अंत समयाविषयी स्पष्टीकरण देत आहे. चार महत्वाच्या घटना त्यावेळी घडतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. (१) त्या समयी मोठे संकट येईल. (२) ज्यांची नावे वहीत लिहिलेली असतील ते सर्व मुक्त होतील. (३) सर्व मृत माणसे जिवंत होतील. (४) कित्येकांना सर्वकाळचे जीवन मिळेल तर कित्येकांना सर्वकाळचा धिक्कार मिळेल. शेवटी दानीएल सर्वांना सुज्ञतेने धार्मिक जीवन जगण्यासाठी आवाहन करीत आहे.
प्रभू येशू स्वतः परत येणार असून आपल्या निवडलेल्या लोकांना एकत्र करणार आहे. आपली सर्वांची गणना निवडलेल्या लोकांमध्ये व्हावी म्हणून प्रभू येशू आपल्याला जागृत राहण्याचा सल्ला देत आहे. विशेषतः प्रभू येशू त्याची वचने आचरणात आणून सुज्ञतेने धार्मिक जीवन जगण्याचे आवाहन करीत आहे. प्रभू येशू स्पष्टपणे सांगत आहे की, 'आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.'
जागृत राहून प्रभूच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास व शेवटी अनंतकाळच्या जीवनात सहभागी होण्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या. : हे प्रभू येशू, तुझी वचने शाश्वत जीवन देणारी आहेत. त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन..
✝️
पहिले वाचन : दानियल १२ : १-३
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जेव्हा ती वेळ येईल त्यावेळी तुझे सर्व लोक मुक्त होतील.”
तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्यासमयी येईल, तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे दप्तरात लिहिलेली आढळतील, ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा आणि सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील, अनेक लोकांना नीति-मार्गाकडे वळवणारे लोक युगानुयुगे ताऱ्यांप्रमाणे चमकतील.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Daniel 12: 1-3
But at that time shall Michael rise up, the great prince, who standeth for the children of thy people: and a time shall come such as never was from the time that nations began even until that time. And at that time shall thy people be saved, every one that shall be found written in the book. And many of those that sleep in the dust of the earth, shall awake: some unto life everlasting, and others unto reproach, to see it always. But they that are learned shall shine as the brightness of the firmament: and they that instruct many to justice, as stars for all eternity.
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र :१६:५,८-११
प्रतिसाद : हे देवा, माझे रक्षण कर.
१) परमेश्वर माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहे,
माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस,
मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे,
तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.
२) माझे हृदय आनंदित झाले आहे,
माझा आत्मा उल्हासतो,
माझा देहही सुरक्षित राहतो कारण
तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस.
तू आपल्या भक्ताला कुजण्याचा
अनुभव येऊ देणार नाहीस..
३) जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील,
तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे,
तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.
Psalms 16: 5, 8, 9-10, 11
R. (1) You are my inheritance, O Lord!
5 The Lord is the portion of my inheritance and of my cup:
it is thou that wilt restore my inheritance to me.
8 I set the Lord always in my sight:
for he is at my right hand, that I be not moved.
R. You are my inheritance, O Lord!
9 Therefore my heart hath been glad,
and my tongue hath rejoiced:
moreover my flesh also shall rest in hope.
10 Because thou wilt not leave my soul in hell;
nor wilt then give thy holy one to see corruption.
R. You are my inheritance, O Lord!
11 Thou hast made known to me the ways of life,
thou shalt fill me with joy with thy countenance:
at thy right hand are delights even to the end.
R. You are my inheritance, O Lord!
दुसरे वाचन :इब्री १०:११-१४,१८
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
"पवित्र होणाऱ्यांना ख्रिस्ताने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले आहे."
प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत, तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून तो ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले शत्रू आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहेत. पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले आहे. तर मग जेथे पापांची क्षमा झाली तेथे तेथे पापांबद्दल अर्पणाचा प्रश्नच उरत नाही.
सर्व : देवाला धन्यवाद.
Second Reading:
Hebrews 10: 11-14, 18
And every priest indeed standeth daily ministering, and often offering the same sacrifices, which can never take away sins. But this man offering one sacrifice for sins, for ever sitteth on the right hand of God, From henceforth expecting, until his enemies be made his footstool. For by one oblation he hath perfected for ever them that are sanctified.Now where there is a remission of these, there is no more an oblation for sin.
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा
आलेलुया!
Acclamation:
Alleluia, alleluia.
Be vigilant at all times and pray that you have the strength to stand before the Son of Man.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क १३:२४-४३२
वाचक :मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मनुष्याचा पुत्र चार दिशांकडून आपल्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातून तारे गळून पडतील आणि आकाशातील शक्ती डळमळतील. तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने आणि वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल. त्या वेळेस तो देवदूतांना पाठवून चार दिशांकडून, अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील.”“अंजिराच्या झाडावरून दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल झाली आणि तिला पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे, हे तुम्हाला कळते. त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील, तेव्हा तो जवळ अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा. मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो की, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश आणि पृथ्वी ही नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत."
“आणखी त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे."
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Mark 13: 24-32
But in those days, after that tribulation, the sun shall be darkened, and the moon shall not give her light. And the stars of heaven shall be falling down, and the powers that are in heaven, shall be moved.
And then shall they see the Son of man coming in the clouds, with great power and glory. And then shall he send his angels, and shall gather together his elect from the four winds, from the uttermost part of the earth to the uttermost part of heaven. Now of the fig tree learn ye a parable. When the branch thereof is now tender, and the leaves are come forth, you know that summer is very near. So you also when you shall see these things come to pass, know ye that it is very nigh, even at the doors. Amen I say to you, that this generation shall not pass, until all these things be done. Heaven and earth shall pass away, but my word shall not pass away. But of that day or hour no man knoweth, neither the angels in heaven, nor the Son, but the Father.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन :
रविवार किंवा सोहळ्याच्या मिस्सा- बलीदानात विश्वासूगण श्रद्धाप्रकटीकरण ही प्रार्थना म्हणतात. इथे, 'तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल' तसेच 'पापांची क्षमा व देहाचे पुनरुत्थान' असे प्रार्थनेत म्हटले जाते. पवित्र मिस्सेत ही प्रार्थना म्हणून आपण केवळ सत्य घोषित करीत नाही तर आपली अंतिम आशा व ध्येय प्रकट करतो. युगाच्या समाप्तीसाठी घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना आजचे शुभवर्तमान व वाचनाद्वारे आपल्याला मिळते.
१) येशू न्यायीपणाने व दयाळूपणाने जगाचा न्याय करील : परमेश्वर आपल्या प्रजेवर निस्सिम व बिनशर्त प्रेम करतो. न्यायाच्या वेळी नितीमान ताऱ्याप्रमाणे चमकतील असे पहिले वाचन सांगते.
२) येशूचे न्यायासन हे त्याच्या बलिदानावर उभारलेले आहे : पुष्कळाच्या खंडणीसाठी येशूने आपले रक्त सांडले. मानव जातीचे तारण करण्यासाठी तो येणार आहे.
३) येशूचे आगमन अकस्मात असेल ती वेळ आणि घटना कोणालाही ठाऊक नसल्याने माणसाने सतत जागृत असावे असा इशारा शुभवर्तमानात देण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळेला आपण प्रभू येशूचे त्यागमय बलिदान विसरतो आणि कमकुवत विश्वासू माणसाचे जीवन जगतो. आपल्याला येशूच्या बलिदानावरील विश्वासाला धरून ठेवण्यासाठी बोलावण्यात आलेले आहे. येशूने दिलेल्या वचनावर विश्वास ठेवून आशादायी जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्नशील असावे म्हणून दररोज स्वतःला तयार करू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वचने शाश्वत जीवन देणारी आहेत. त्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन..
0 टिप्पण्या