सामान्य काळातील ३१वा सप्ताह
मंगळवार ५ नोव्हेंबर २०२४
त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखावयास मिळणार नाही.”
I say unto you, that none of those men that were invited, shall taste of my supper.
वाचक : पौलाचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.
जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वत:ला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यप्रकॄतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही क्रुसावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वत:ला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, ह्मात हेतू हा की, स्वर्गात, पॄथ्वीवर आणि पॄथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
0 टिप्पण्या