Marathi Bible Reading | Monday 4th october 2024| 31st week in ordinary Time |

सामान्य काळातील ३१वा  सप्ताह 

सोमवार ४ नोव्हेंबर  २०२४

तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा गोरगरीब, अपंग, लंगडे आणि आंधळे ह्यांना आमंत्रित करा, when thou makest a feast, call the poor, the maimed, the lame, and the blind;And thou shalt be blessed,

  ✝️ 


 संत चार्ल्स बोरोमियो
• महागुरू, वर्तनसाक्षी (१५३८-१५८४)

 
मिलानमध्ये आर्चबिशप म्हणून कार्य करीत असताना त्याने आपली जीवन पद्धती अत्यंत साधी आणि आर्थिकदृष्ट्या सुव्यवस्थित करून टाकली. दिवसातून एकदाच पाव, पाणी आणि अंजिराचे फळ इतका आहार घेणे. केवळ चार तास झोपणे, मौल्यवान आणि उंची फर्निचर ऐवजी साध्या बैठकांची आखणी करणे अशा गोष्टींची त्यांनी स्वतःला सवय लावून घेतली. ते म्हणत, "मनुष्य किती ऐश्वर्यसंपन्न जगला ह्यापेक्षा तो किती चांगलं जीवन जगला हे महत्त्वाचे आहे. म्हातारा महागुरू म्हणून मरण्यापेक्षा चांगला महागुरू म्हणून थोडा काळ जगणे हे उत्तम !"

आपल्या ऊर्वरित १९ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी सुधारणावादी चळवळीच्या विरोधात उल्लेखनीय कामगिरी करून दाखविली.

चिंतन : ज्याला देवाच्या सेवेत व मनन-चिंतनात प्रगती करण्याची इच्छा आहे त्यांनी दररोज नव्या दमाने देवाच्या सान्निध्यात राहून देवाची सेवा अखंडीतपणे करीत राहिले पाहिजे. आपल्या सर्व आशा आकांक्षा आणि ध्येय केवळ देवाच्या गौरवासाठी असावे ही तीव्र मनीषा त्याने बाळगली पाहिजे.
- संत चार्ल्स बोरोमियो
✝️   

पहिले वाचन : : फिलीप्पैकरांस पत्र  २:१-४
वाचन :पौलचे फिलीप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
  "तुम्ही समचित्त होऊन माझा आनंद पूर्ण करा.”

ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा आणि करुणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा; तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणांपेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : Philippians 2: 1-4
If there be therefore any consolation in Christ, if any comfort of charity, if any society of the spirit, if any bowels of commiseration:
Fulfill ye my joy, that you may be of one mind, having the same charity, being of one accord, agreeing in sentiment.
Let nothing be done through contention, neither by vain glory: but in humility, let each esteem others better than themselves:
Each one not considering the things that are his own, but those that are other men’s.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  : : १३१:१,२, ३
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, तुझ्याठायी माझा समेट घडव.

१) हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, 
माझी दृष्टी उन्मत्त नाही. मोठमोठ्या 
आणि मला असाध्य अशा गोष्टीत मी पडत नाही.

२) खरोखर मी आपला जीव स्वस्थ 
आणि शांत ठेवला आहे.
दूध तुटलेले बालक, आपल्या आईबरोबर असते. 
तसा माझा जीव, दूध तुटलेल्या 
बालकासारखा माझ्याठायी आहे.

३) हे इस्राएल, आतापासून सर्वकाळ तू 
परमेश्वराची आशा धर.

Psalms 131: 1, 2, 3
R. In you, O Lord, I have found my peace.

1 Lord, my heart is not exalted: nor are my eyes lofty. 
Neither have I walked in great matters, 
nor in wonderful things above me.
R. In you, O Lord, I have found my peace.

2 If I was not humbly minded, but exalted my soul: 
As a child that is weaned is towards his mother, 
so reward in my soul.
R. In you, O Lord, I have found my peace.

3 Let Israel hope in the Lord, from henceforth now and for ever.
R. In you, O Lord, I have found my peace.


 जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो, 
आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा. 
 आलेलुया!

Acclamation:  Alleluia, alleluia.
If you remain in my word, you will truly be my disciples, and you will know the truth, says the Lord. rests.  
Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक  १४:१२-१४
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"तुम्ही आपल्या मित्रांना बोलावू नका, तर गोरगरिबांना आमंत्रित करा. "
ज्या परुश्याने येशूला आमंत्रण केले होते त्याला येशू म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची मेजवानी द्याल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका, कारण तेही कदाचित तुम्हांला उलट आमंत्रण करतील आणि तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा गोरगरीब, अपंग, लंगडे आणि आंधळे ह्यांना आमंत्रित करा, म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करायला त्यांच्याजवळ काही नाही. मात्र नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : 
Luke 14: 12-14
And he said to him also that had invited him: When thou makest a dinner or a supper, call not thy friends, nor thy brethren, nor thy kinsmen, nor thy neighbours who are rich; lest perhaps they also invite thee again, and a recompense be made to thee.
But when thou makest a feast, call the poor, the maimed, the lame, and the blind;And thou shalt be blessed, because they have not wherewith to make thee recompense: for recompense shall be made thee at the resurrection of the just.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतनयेशू आपल्याला इतरांचे आदरातिथ्य कसे करावे याचे उदाहरण देत आहे. आजच्या युगात ते खूप कठीण आहे. आपल्या सामाजिक जीवनात आपण आपल्याशी ज्याचं पटतं किंवा आपल्या ज्या जवळच्या व्यक्ती आहेत किंवा आपले म्हणणे ज्यांना पटतं किंवा ज्या आपले म्हणणे ऐकतात त्याच व्यक्तींना आपण आपल्या जीवनात प्राधान्य देत असतो. अशाच व्यक्तींना आपण मदत करतो. आज प्रभू येशूख्रिस्त आपल्याला आपल्या मनाचा हा दृष्टीकोन बदलण्यास सांगत आहे. आपल्याला मानत नसलेल्या लोकांबद्दल आपल्या मनात आदर असला पाहिजे. आपल्या मनातील हा थोटक दृष्टिकोन बदलून आपल्यात बदल घडवून आणला तरच आपल्या शेजाऱ्यांवर आपल्याला योग्य ते प्रेम दाखवता येईल.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहभोजनाचा आस्वाद सर्वांपर्यंत पोहोचवून तुझी सुवार्ता सांगण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या