Marathi Bible Reading | 3rd November 2024 |31st Sunday in Ordinary Time

सामान्य काळातील ३१ वा रविवार 

३ नोव्हेंबर २०२४

  ✝️ 
“तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, जिवाने व शक्तिने प्रीती कर."  Hear, O Israel: the Lord thy God is one God. And thou shalt love the Lord thy God,
 ✝️  

 प्रीतिची सर्वोत्कृष्ट व महान अशी आज्ञा परमेश्वराने मोशेद्वारे इस्त्राएली  जनतेला दिली. त्याचबरोबर त्याचे विधी व नियम काटेकोरपणे पाळण्यास सांगितले. परमेश्वराने त्याच्या आज्ञा, नियम व विधी त्यांना त्यांच्या हृदयात साठवून ठेवण्यास सांगितले. 

आज एका शास्त्री माणसाने प्रभू येशूला प्रश्न केला  सर्वात पाहिली आज्ञा कोणती? प्रभू येशूने त्याला उत्तर देताना अनुवाद ग्रंथातून संदर्भ देत म्हटले, 'आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धिने व संपूर्ण शक्तीने प्रीति कर. ' परमेश्वर जो सर्व सृष्टीचा व मानवांचा निर्माता व जीवनदाता आहे. ज्या परमेश्वरेचे सर्व वैभव, सामर्थ्य अनाकलनीय आहे, त्यावर प्रीति करणे रास्त व योग्यच आहे. परमेश्वराने सर्वकाही निर्माण करताना त्याच्या प्रेमाचा अविष्कार केलेला आहे. तर मग त्या परमेश्वराला आपल्या जीवनात अग्रस्थान असणे आवश्यक आहे. 

आपण परमेश्वरावर किती प्रेम करतो? आपले शरीर, आपले मन  आपले हृदय, आपली शक्ती व आपला जीव सर्व काही परमेश्वाचे दिव्य दान आहे. म्हणूनच मनाने, हृदयाने, जिवाने व सर्व शक्तीनीशी परमेश्वरावर प्रेम करणे  महत्त्वाचे आहे. परमेश्वर आपल्या सर्वांवर प्रेम करतो तसे आपण त्यावर प्रेम करणे  रास्त आहे.

आपले जीवन परमेश्वराच्या प्रेमात वाढत असतानाच परस्पर संबंधाने समृद्ध होत असते म्हणूनच देवप्रीतिला परस्पर बंधूप्रीतिची जोड असणे महत्वाचे आहे. परमेश्वर प्रीतिच्या आणि परस्पर प्रीतीच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले आपले जीवन समृद्धपणे जगण्यासाठी सर्वस्वी देवाला शरण जाऊ या. .

✝️

पहिले वाचन : अनुवाद  ६:२-६
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन ६:२-६
"हे इस्त्राएल, ऐक, तू आपला देव पमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने प्रीती कर."
मोशे लोकसमुदायाला म्हणाला, परमेश्वराने जे सर्व विधी आणि आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू आणि तुझे पुत्रपौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून आमरण पाळाव्या म्हणजे तू दीर्घायू होशील. म्हणून हे इस्राएल, ऐक आणि त्या काळजीपूर्वक पाळ म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील.

हे इस्राएल, ऐक: आपला देव परमेश्वर हा एकमेव परमेश्वर आहे, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading : : Deuteronomy 6: 2-6
That thou mayst fear the Lord thy God, and keep all his commandments and precepts, which I command thee, and thy sons, and thy grandsons, all the days of thy life, that thy days may be prolonged. Hear, O Israel, and observe to do the things which the Lord hath commanded thee, that it may be well with thee, and thou mayst be greatly multiplied, as the Lord the God of thy fathers hath promised thee a land flowing with milk and honey. Hear, O Israel, the Lord our God is one Lord. Thou shalt love the Lord thy God with thy whole heart, and with thy whole soul, and with thy whole strength. And these words which I command thee this day, shall be in thy heart:
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  :१८: २-४,४७,५१
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रेम करतो.

१ )हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, 
मी तुझ्यावर प्रेम करतो, 
परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, 
माझा मुक्तिदाता माझा देव, 
माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी घेतो.
 तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, 
माझा उंच बुरूज आहे. 
स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो,
 तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.

२) परमेश्वर जिवंत आहे, 
त्या माझ्या दुर्गाला धन्यवाद असो, 
माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो. 
तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो. 
आणि आपल्या अभिषिक्ताला वात्सल्य दाखवतो.

 Psalms 18: 2-3, 3-4, 47, 51
R. (2) I love you, Lord, my strength.

2 I will love thee, O Lord, my strength:
3ab The Lord is my firmament, 
my refuge, and my deliverer.
R. I love you, Lord, my strength.

3cd My God is my helper, and in him will I put my trust. My protector and the horn of my salvation, and my support.
4 Praising I will call upon the Lord: and I shall be saved from my enemies.
R. I love you, Lord, my strength.

47 The Lord liveth, and blessed be my God, and let the God of my salvation be exalted:
51 Giving great deliverance to his king, and shewing mercy to David his anointed: and to his seed for ever.
R. I love you, Lord, my strength.


दुसरे वाचन :इब्री  ७:२३-२७

वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

"ख्रिस्त युगानुयुगे राहणारा असल्यामुळे त्याचे याजकपण अढळ आहे."

जुन्या कराराचे पुष्कळ याजक होऊन गेले, कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे. पण ख्रिस्त युगानुयुगे राहणारा असल्यामुळे त्याचे याजकपण अढळ आहे. ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारायला हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा आणि आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याची गरज नाही, कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. खरोखर नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते, पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन युगानुयुगे परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading:  
Hebrews 7: 23-28
And the others indeed were made many priests, because by reason of death they were not suffered to continue: But this, for that he continueth for ever, hath an everlasting priesthood, Whereby he is able also to save for ever them that come to God by him; always living to make intercession for us. For it was fitting that we should have such a high priest, holy, innocent, undefiled, separated from sinners, and made higher than the heavens; Who needeth not daily (as the other priests) to offer sacrifices first for his own sins, and then for the people’s: for this he did once, in offering himself. For the law maketh men priests, who have infirmity: but the word of the oath, which was since the law, the Son who is perfected for evermore.
This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                             

आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. 
 आलेलुया!

Acclamation: 
  Alleluia, alleluia.
Whoever loves me will keep my word, says the Lord; and my father will love him and we will come to him.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मार्क    १२:२८-३४
वाचक :मार्कलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  
   "तू आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर संपूर्ण मनाने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर."

शास्त्र्यांपैकी एकजण पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, “पहिली ही की, हे इस्रायल, ऐक, आपला देव परमेश्वर हा एकमेव परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही." तो शास्त्री म्हणाला, "गुरुजी, आपण ठीक आणि खरे बोलतात. परमेश्वर एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यांवर प्रीती करणे, हे सर्व होमार्पण आणि यज्ञ ह्यांपेक्षा अधिक आहे." त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून त्याला आणखी काही प्रश्न विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Mark 12: 28b-34
And there came one of the scribes that had heard them reasoning together, and seeing that he had answered them well, asked him which was the first commandment of all. And Jesus answered him: The first commandment of all is, Hear, O Israel: the Lord thy God is one God. And thou shalt love the Lord thy God, with thy whole heart, and with thy whole soul, and with thy whole mind, and with thy whole strength. This is the first commandment. And the second is like to it: Thou shalt love thy neighbour as thyself. There is no other commandment greater than these. And the scribe said to him: Well, Master, thou hast said in truth, that there is one God, and there is no other besides him. And that he should be loved with the whole heart, and with the whole understanding, and with the whole soul, and with the whole strength; and to love one’s neighbour as one’s self, is a greater thing than all holocausts and sacrifices. And Jesus seeing that he had answered wisely, said to him: Thou art not far from the kingdom of God. And no man after that durst ask him any question.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन :जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा असे प्रभू येशूख्रिस्त आपल्याला सांगत आहे. ह्यामध्ये देवावरील प्रेम व शेजाऱ्यावरील प्रेम ह्या दोन गोष्टी संक्षिप्त रूपात आपल्याला दिसून येतात. बहुतेक वेळा आपण एकच गोष्ट साधून आणतो. आपण फक्त धार्मिक कृती किंवा प्रार्थनेने देवावरील प्रेम व्यक्त करतो परंतु आपल्या शेजाऱ्यांवर गरजेच्या वेळेला मदत करण्यास कमी पडतो. देवावरील प्रेम व्यक्त करणे सोपे आहे. काही व्यक्ती फक्त शेजाऱ्यांवरील प्रेम व्यक्त करतात कारण त्यांचा असा समज आहे की, देव अस्तित्वात नाही. शेजाऱ्यांवरील व देवावरील प्रेम ह्या दोन्ही गोष्टी देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आज आपल्याला देवप्रेम व शेजारप्रेम आत्मसात करण्यास बोलावले आहे.
प्रार्थना हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रीतित वाढण्यास व परस्पर प्रीति करण्यास प्रेरणा दे, आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या