Marathi Bible Reading | Monday 30th December 2024 | Christmas Weekday

ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ सप्ताह 

सोमवार ३०  डिसेंबर २०२४ 

  ✝️ 


ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले. त्याच्यावर देवाची कृपा होती.
 And the child grew and became strong, filled with wisdom. And the favour of God was upon him.


संत सॅबिनस
महागुरू रक्तसाक्षी (३७३) 
✝️   

तिसऱ्या शतकाच्या शेवटी शेवटी संत सॅबिनस हे इटलीमधील असिसी ह्या धर्मप्रांताचे बिशप होते. डायक्लोशिअन राजाच्या काळात जेव्हा ख्रिस्ती धर्मियांचा छळ सुरू झाला, तेव्हा इतुरियाच्या राज्यपालाने सॅबिनस ह्यांच्या हाती ज्युपिटर ह्या ग्रीक देवताची मूर्ती दिली व तिची पूजा करण्याचा आदेश त्यांना दिला. बिशप व सॅबिनस ह्यांनी सात्त्विक संतापाने ती मूर्ती जमिनीवर फेकून दिली त्यामुळे ती मूर्ती फुटली. राज्यपालाने तात्काळ बिशप सॅबिनस ह्यांचे हात तोडण्याचा हुकूम सोडला. राज्यपालांचा हुकूम तो! ताबडतोब अंमलात आणण्यात आला.
काही काळानंतर हात नसलेल्या केवळ बाहूने बिशप सॅबिनस ह्यांनी एका आंधळ्याला आशीर्वाद दिला, म्हणून त्याला दृष्टी प्राप्त झाल्याचा चमत्कार घडल्याचे राज्यपालाच्या कानावर आले. लागलीच राज्यपालाने बिशपांना बोलावून घेतले व स्वतःच्या दृष्टीमध्ये असलेला दोष काढून टाकण्याकरिता प्रार्थना करण्याची विनंती केली. बिशपांच्या प्रार्थनेमुळे राज्यपालाला नवीन दृष्टी प्राप्त झाली, त्यामुळे राज्यपाल आणि त्याचे कुटुंब आणि संपूर्ण घराणे ख्रिस्ती झाले.
परंतु ह्या दोन्ही अद्भूत कृत्यांचा डायक्लोशियन राजावर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याने रागाने संत सॅबिनस, राज्यपाल आणि त्याच्या कुटुंबियांना मरेपर्यंत बदडून काढले.

✝️   
.
पहिले वाचन १योहान २:१२-१७
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो."

मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे. बापांनो, मी तुम्हांला लिहितो, जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. बापांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहा, तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.
जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका, जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :1 John 2:12-17

I am writing to you, little children, because your sins are forgiven for his name's sake. I am writing to you, fathers, because you know him who is from the beginning. I am writing to you, young men, because you have overcome the evil one. I write to you, children, because you know the Father. I write to you, fathers, because you know him who is from the beginning. I write to you, young men, because you are strong, and the word of God abides in you, and you have overcome the evil one. Do not love the world or the things in the world. If anyone loves the world, the love of the Father is not in him. For all that is in the world the desires of the flesh and the desires of the eyes and pride of life is not from the Father but is from the world, And the world is passing away along with its desires, but whoever does the will of God abides for ever.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९६:७-१४
प्रतिसाद :आकाश हर्ष करो. पृथ्वी आनंदित होवो.

१) मानवकुलांनो प्रभूचे गुणगौरव करा.
 प्रभूचे गौरव व पराक्रम यांची महती वर्णन करा.
प्रभूच्या नामाचा महिमा गा.

२) अर्पण आणा आणि त्याच्या मंदिरातल्या चौकात या. 
मंगलस्वरूप प्रभूची आराधना. करा. 
सारी पृथ्वी त्याच्यापुढे थरथर कापो.

३) सगळ्या राष्ट्रांना जाहीर करा,
 “प्रभू राजा आहे." 
तो मानवजातीचा यथार्थ न्याय करील.


Psalm   96:7-8a, 8b-9, 10

Let the heavens rejoice and earth be glad.

Give the Lord, you families of peoples, 
give the Lord glory and power; 
give the Lord the glory of his name. R 

Bring an offering and enter his courts; 
worship the Lord in holy splendour. 
O tremble before him, all the earth.

Say to the nations, "The Lord is king." 
The world he made firm in its place; 
he will judge the peoples in fairness.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
आमच्यावर पवित्र दिवस उजाडला आहे. राष्ट्रांनो या, प्रभूला नमन करा. कारण आज जगावर महातेज पसरले आहे..
  आलेलुया!

Acclamation: 
A holy day has dawned upon us.
 Come, you nations, and adore the Lord. 
Today a great light has come upon the earth.

शुभवर्तमान  लूक :३६-४०
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले." 
 एक संदेष्टी होती. ती आशेरच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ सात वर्षे राहिली होती. आता ती चैऱ्याऐंशी वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करुन रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे येरुशलेमच्या मुक्ततेची वाट पाहात होते त्या सर्वांना ती येशूविषयी सांगू लागली.नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर योसेफ, मरिया व बाळ येशू गालिलात आपले गाव नाझरेथ येथे परत गेले. ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले. त्याच्यावर देवाची कृपा होती
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 2:36-40

At that time: There was a prophetess, Anna, the daughter of Phanuel, of the tribe of Asher. She was advanced in years, having lived with her husband seven years from when she was a virgin, and then as a widow until she was eighty-four. She did not depart from the temple, worshiping with fasting and prayer night and day. And coming up at that very hour she began to give thanks to God and to speak of him to all who were waiting for the redemption of Jerusalem. And when they had performed everything according to the Law of the Lord, they returned into Galilee, to their own town of Nazareth. And the child grew and became strong, filled with wisdom. And the favour of God was upon him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, ज्यांना जगाची आवड आहे त्यांच्यामध्ये देवाचे प्रेम नाही. कारण आपल्या सांसारिक इच्छा देवाकडून येत नाहीत. जर आपण जगाच्या गोष्टींशी संलग्न झालो तर निश्चितपणे आपण देवाचे प्रेम अनुभवणार नाही. एकाच वेळी देव आणि जगावर प्रेम करणे शक्य नाही. आपण एकतर एकाचा द्वेष करू किंवा दुसऱ्यावर प्रेम करू. आज आपले जीवन इतके भौतिकवादी बनले आहे की, आपल्याला अधिकाधिक हवे असते. आम्हाला आराम आणि आनंद मिळवून देणाऱ्या नवीनतम उपकरणाने आपल्याला आकर्षित केले आहे. नाव, प्रसिद्धी आणि सत्ता मिळवणे ही अनेकांची महत्वाकांक्षा बनली आहे. मी आणि केवळ माझे हे मोठ्या प्रमाणावर लोकांचे मंत्र बनले आहे. आपल्या समाजात दुसऱ्यांबद्दलची काळजी आणि प्रेम कमी होताना दिसत आहे. माझ्याबद्दल काय ? मीही जगाच्या मागे धावतो का?

प्रार्थना : हे देवा परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनांप्रमाणे व आज्ञाप्रमाणे जीवन आचरण करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

✝️      

नाताळ  सणाच्या हार्दिक शुभेच्छा  -

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या