ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ सप्ताह
रविवार २९ डिसेंबर २०२४
पवित्र कुटुंबाचा सण
✝️
तो त्यांना म्हणाला, "तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे ? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ?"
बेनसीराची बोधवचने ह्या पहिल्या वाचनात मुलांची आई बापासंबंधाची कर्तव्ये सांगण्यात आली आहेत. विशेषत: आई-बापास सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्या वृद्धापकाळात त्यांचा सांभाळ करावा आणि आई बापा मुळेच आपले जीवन अस्तित्व आहे ह्याची मुलांनी जाण ठेवावी..
आजच्या शुभवर्तमानात संत योसेफाला देवाचा दूत बालक येशू व आई मरिया ह्यांना घेऊन मिसर देशात जाण्यासाठी आज्ञा करतो. संकट समयी देवाने त्यांचे रक्षण केले व त्यांना नासरेथात परत आणले. त्या कठीण प्रसंगी योसेफाने मरियेची व बाळाची विशेष काळजी घेतली.
ख्रिस्तसभा आज बाळ येशू, मरिया व योसेफ ह्या पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहे. आजच्या तिनही वाचनांच्या संबंधाने आपण आपल्या कौटुंबिक जीवनावर चिंतन करु या.
संत योसेफ, पवित्र मरिया व बाळ येशू ह्या कुटुंबाचा आदर्श आपल्यासमोर आहे. आपण खरे ख्रिस्ती कुटुंब बनावे म्हणून प्रेरणा घेऊ या.
✝️
पहिले वाचन बेन सिरा ३ : २-६,१२-१४
वाचक :बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन
“जो परमेश्वराला भितो तो आईबापाला मान देतो."
प्रभूने बापाला मुलापेक्षा अधिक सन्मान दिला आहे आणि त्याने मुलाबरोबर आईच्या अधिकाराला महत्त्व दिले आहे. जो आपल्या बापाला मान देतो, तो आपल्या पापांची भरपाई करतो आणि जो आपल्या आईचा सन्मान करतो त्याची तुलना धनदौलत जमवणाऱ्याबरोबर करता येते. जो बापाला मान देतो, त्याला त्याची मुले आनंदित करतील आणि जेव्हा तो प्रार्थना करील तेव्हा ती ऐकली जाईल. बापाला मान देणाऱ्याचे आयुष्य दीर्घ होते. जो आईचे समाधान करतो तो परमेश्वराची आज्ञा पाळतो. हे मुला, तुझ्या बापाला त्याच्या म्हातारपणी आधार दे आणि तो जिवंत असेपर्यंत त्याला दुःख देऊ नकोस, त्याची समज कमी झाली तरी त्याला दया दाखव. तुझ्या सामर्थ्यात त्याचा तिरस्कार करू नकोस. बापाला दाखविलेली दया फुकट जाणार नाही. तर तुझ्या पापांच्या भरपाईसाठी तिचा उपयोग होईल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading : Sirach 3:2-6, 12-14
The Lord honoured the father above the children, and he confirmed the judgment of the mother over her sons. Whoever honours his father atones for sins, and whoever glorifies his mother is like one who lays up treasure. Whoever honours his father will be gladdened gladd by his own children, and when he prays he will be heard. Whoever glorifies his father will have long life, and whoever obeys the Lord will refresh his mother, O son, help your father in his old age and do not grieve him as long as he lives; even if he is lacking in understanding, show indulgence; in all your strength do not despise him. For kindness to a father will not be forgotten, and against your sins it will be credited to you.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १२८:१-५
प्रतिसाद :परमेश्वराचे भय धरून चालतो तो धन्य.
१ )धन्य तो पुरुष, जो परमेश्वराचे भय धरतो,
जो त्याच्याच मार्गानी चालतो.
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील.
तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.
२ )तुझ्या घरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या
सफळ वेलीसारखी होईल.
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती
जैतुनाच्या रोपासारखी होतील.
३) पाहा, परमेश्वराचे भय धरणारा पुरुष
याप्रमाणे आशीर्वाद पावेल.
परमेश्वर सियोनतून तुला आशीर्वाद देवो.
आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस
येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.
Psalm 128:1-2, 3, 4-5
'Blessed are all who fear the Lord, and walk in his ways.
Blessed are all who fear the Lord, and walk in his ways!
By the labour of your hands you shall eat.
You will be blessed and prosper. R
Your wife like a fruitful vine in the heart of your house; your children like shoots of the olive around your table. R
Indeed thus shall be blessed the man who fears the Lord.
May the Lord bless you from Sion.
May you see Jerusalem prosper all the days of your life!
दुसरे वाचन पौलचे कलस्सैकरांस पत्र ३ : १२-२२
पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"प्रभूठायी कौटुंबिक जीवन. "
तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा. प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे. तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंत:करणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा आणि बोलणे किंवा करणे जे काही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा, त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा.
पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.
मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा. हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका. आणाल तर ती खित्र होतील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद
Second Reading Colossians 3:12-21
(Or: Hebrews 11:8.11-12.17-19)
Brethren: Put on then, as God's chosen ones, holy and beloved, compassionate hearts, kindness, humility, meekness, and patience, bearing with one another and, if one has a complaint against another, forgiving each other, as the Lord has forgiven you, so you also must forgive. And above all these put on love, which binds everything together in perfect harmony. And let the peace of Christ rule in your hearts, to which indeed you were called in one body. And be thankful. Let the word of Christ dwell in you richly, teaching and admonishing one another in all wisdom, singing psalms and hymns and spiritual songs, with thankfulness in your hearts to God. And whatever you do, in word or deed, do everything in the name of the Lord Jesus, giving thanks to God the Father through him. Wives, submit to your husbands, as is fitting in the Lord. Husbands, love your wives, and do not be harsh with them. Children, obey your parents in everything, for this pleases the Lord. Fathers, do not provoke your children, lest they become discouraged.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो.
आलेलुया!
Acclamation:
Let the peace of Christ rule in your hearts, let the word of Christ dwell in you richly.
शुभवर्तमान लूक २:४१-५२
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशू पंडितांमध्ये बसलेला सापडला.”
येशूचे आईवडील दरवर्षी वल्हांडण सणाला यरुशलेम येथे जात असत. तो बारा वर्षाचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जायला निघाले. तेव्हा तो मुलगा येरुशलेम येथे मागे राहिले, हे त्याच्या आईवडिलांना कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यांत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करीत करीत येरुशलेम येथे परत गेले तीन दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले. त्याला पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, "बाळा तू आम्हांबरोबर असा का वागलास ? पाहा, तुझे वडील व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आली." तो त्यांना म्हणाला, "तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे ? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ?" परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर नाझरेथात गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या व माणसांच्या समोर वाढत गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :
: Luke 2: 41-52
And his parents went every year to Jerusalem, at the solemn day of the pasch, And when he was twelve years old, they going up into Jerusalem, according to the custom of the feast, And having fulfilled the days, when they returned, the child Jesus remained in Jerusalem; and his parents knew it not. And thinking that he was in the company, they came a day’s journey, and sought him among their kinsfolks and acquaintance. And not finding him, they returned into Jerusalem, seeking him. And it came to pass, that, after three days, they found him in the temple, sitting in the midst of the doctors, hearing them, and asking them questions. And all that heard him were astonished at his wisdom and his answers. And seeing him, they wondered. And his mother said to him: Son, why hast thou done so to us? behold thy father and I have sought thee sorrowing. And he said to them: How is it that you sought me? did you not know, that I must be about my father’s business? And they understood not the word that he spoke unto them. And he went down with them, and came to Nazareth, and was subject to them. And his mother kept all these words in her heart. And Jesus advanced in wisdom, and age, and grace with God and men
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:आजचे शुभवर्तमान स्पष्ट संदेश देते की, येशू देवाचा पुत्र असूनही, त्याच्या पृथ्वीवरील पालकांशी आज्ञाधारक होता. तथापि, येशूने त्याच्या आईवडिलांना, आपण देवाच्या मंदिरात का असावे ? याबद्दल विचार व्यक्त केल्याने मरीया आणि योसेफ दोघेही गोंधळले. ते त्याला समजून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरतात. यापूर्वीही मरीयेला गॅब्रियल दुताचा संदेश समजला नव्हता. पण या सगळ्या घटनांवर ती नम्रपणे विचार करत राहिली. जरी येशू देव होता तरी त्याने मरीया आणि योसेफला पूर्णपणे अधीन केले. आई-वडिलांचा कसे आदर केला पाहिजे हे येशूने आपल्या उदाहरणाद्वारे दाखविले. कधीकधी मुले म्हणून, आपल्याला असे वाटते की, आपल्याला पालकांपेक्षा अधिक माहीत आहे. आपण हुशार असू शकतो परंतु आपण हे विसरू नये की, त्यांच्याद्वारे आपण ह्या जगात आलो आणि त्यांनी आपल्यापेक्षा जास्त जीवन पाहिले आहे. त्यांच्या शहाणपणाकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये. त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांच्याबरोबर कसे वागतो? आपण त्यांचा आदर करतो का ? आपण त्यांची प्रेमाने काळजी घेतो का ?
प्रार्थना : -हे प्रभू येशू, बालकांप्रमाणे नम्र व आज्ञाधारक बनण्यास आणि परस्परावर प्रीति करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा -
✝️
0 टिप्पण्या